Mangal Gochar 2025 : अवघ्या दोन दिवसांत मंगळ ग्रहाचं महासंक्रमण; 'या' 5 राशींच्या जीवनात होणार उलथापालथ, धनहानीचे मिळतील संकेत
Mangal Gochar 2025 : मंगळ ग्रहाचं हे राशी परिवर्तन फार खास मानलं जाणार आहे. कारण मंगळ ग्रहाचं स्वत:च्याच राशीत प्रवेश होणार आहे.

Mangal Gochar 2025 : वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, ग्रहांचा सेनापती मंगळ ग्रह (Mangal Gochar) येत्या 27 ऑक्टोबर 2025 रोजी वृश्चिक राशीत संक्रमण करणार आहे. मंगळ ग्रहाचं हे राशी परिवर्तन फार खास मानलं जाणार आहे. कारण मंगळ ग्रहाचं स्वत:च्याच राशीत प्रवेश होणार आहे. मंगळ ग्रहाला साहस, पराक्रम, ऊर्जा, शक्ती, जमीन, संपत्ती आणि युद्धाचा कारक ग्रह मानला जातो.
जेव्हा कुंडलीत मंगळ ग्रहाची स्थिती शुभ असते ती व्यक्ती निडर आणि साहसी असते. तर, जर कुंडलीत मंगळ ग्रहाची स्थिती अशुभ असेल तर व्यक्तीला रक्तासंबंधित समस्यांचा समस्यांचा तसेच, जीवनात कठीण समस्यांचा सामना करावा लागतो. तर, 27 ऑक्टोबर रोजी मंगळ ग्रहाचं संक्रमण कोणत्या राशींना सावधान राहण्याची गरज आहे ते जाणून घेऊयात.
मेष रास (Aries Horoscope)
मंगळ ग्रहाचं संक्रमण मेष राशीच्या लोकांचा आत्मविश्वासाबरोबर तुमचा अहंकार देखील वाढलेला दिसेल. या काळात तुम्हाला तुमच्या रागावर नियंत्रण ठेवण्याची गरज आहे. कामाच्या ठिकाणी वादविवाद होण्याची शक्यता आहे. तसेच, या काळात वाहन चालवताना काळजी घ्या.
वृषभ रास (Taurus Horoscope)
या राशीच्या लोकांसाठी देखील मंगळ ग्रहाचं संक्रमण धोकादायक ठरणार आहे. या काळात तुमच्या खर्चात वाढ होण्याची शक्यता आहे. तसेच, जुन्या गुंतवणुकीतून तुमचं नुकसान होण्याची शक्यता आहे. तसेच, कुटुंबात देखील वादविवाद होण्याची शक्यता आहे.
कर्क रास (Cancer Horoscope)
मंगळ ग्रहाच्या संक्रमणाने कामाच्या ठिकाणी तुम्हाला सावधानता बाळगण्याची गरज आहे. तसेच, सहकाऱ्यांचे देखील वादविवाद होण्याची शक्यता आहे. तुमचा मानसिक ताण वाढू शकतो. तुमच्या घरातील जबाबदाऱ्या वाढू शकतात. तसेच, या काळात तुम्हाला खर्चावर नियंत्रण ठेवण्याची शक्यता आहे.
तूळ रास (Libra Horoscope)
मंगळ ग्रहाचं संक्रमण तूळ राशीच्या लोकांचा आत्मविश्वास वाढू शकतो. नकारात्मक ऊर्जेचा प्रभाव वाढू शकतो. तसेच, तुमच्या उत्पन्नात घट होण्याची शक्यता आहे. या काळात तुमच्या व्यवसायात चढ-उतार होऊ शकतात. घरात मतभेद होण्याची शक्यता आहे.
धनु रास (Saggitarius Horoscope)
धनु राशीसाठी मंगळ ग्रहाचं संक्रमण धोकादायक ठरणार आहे. या काळात तुमच्या खर्चात वाढ होऊ शकते. तसेच, पैशांशी संबंधित तुम्हाला जपून व्यवहार करावा लागेल. जुन्या गुंतवणुकीतून तुमचं नुकसान होण्याची शक्यता आहे. तसेच, मित्र-मैत्रीणींत भेदभाव निर्माण होऊ शकतात.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा :




















