Makar Sankranti 2025 : नवीन वर्षाची सुरुवात झाली आहे. नवीन वर्षात येणारा पहिलाच आणि महत्त्वाचा सण म्हणजे मकर संक्रांत (Makar Sankranti). यंदाची मकर संक्रांती 14 जानेवारी रोजी साजरी केली जाणार आहे. मात्र, याचा शुभ मुहूर्त नेमका कोणता? तसेच, विधी आणि तिथी काय असणार आहे या संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात.
मकर संक्रांती नेमकी कधी आहे?
हिंदू धर्मग्रंथात सांगितल्याप्रमाणे, जेव्हा सूर्याचा मकर राशीत प्रवेश होतो तेव्हा त्या दिवसाला मकर संक्रांतीचा सण साजरा केला जातो. त्यानुसार, यंदा मकर संक्रांतीचा सण 15 जानेवारीला नसून 14 जानेवारीला म्हणजेच मंगळवारी आहे. सूर्याचं संक्रमण 14 जानेवारी रोजी सकाळी 09 वाजून 03 मिनिटांनी मकर राशीत होणार आहे.14 जानेवारीला मकर संक्रांत देशभरात साजरी करणं शास्त्रानुसार शुभ मानलं जाणार आहे.
मकर संक्रांती 2025 शुभ मुहूर्त कधी? (Makar Sankranti Shubh Muhurta 2025)
14 जानेवारी रोजी मकर संक्रांतीचा पुण्यकाळ मुहूर्त सकाळी 09:03 ते 05:46 पर्यंत आहे. मकर संक्रांतीचा महापुण्यकाळ सकाळी 09:03 ते 10:48 पर्यंत आहे. महा पुण्यकाल 1 तास 45 मिनिटांपर्यंत आहे, तर पुण्यकाळ 8 तास 42 मिनिटांपर्यंत आहे.
मकर संक्रांती तिथी आणि मुहूर्त
मकर संक्रांतीच्या दिवशी पुनर्वसु नक्षत्र आणि विश्वकुंभ योगाचा योगायोग तयार होतोय. 14 जानेवारीच्या दिवशी सूर्य मकर राशीत प्रवेश करणार आहे. तेव्हा खरमासाचा काळ संपेल. वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, दरवर्षी सूर्य मकर राशीत 20 मिनिटं उशिरा प्रवेश करतो. दर तीन वर्षांनी सूर्य एक तासांनंतर आणि दर 72 वर्षांनी एका दिवसाच्या विलंबाने मकर राशीत प्रवेश करतो. या दिवशी सूर्य सकाळी 8 वाजून 45 मिनिटांनी मकर राशीत प्रवेश करणार आहे.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा :