Mahashivratri 2024 : महाशिवरात्रीला बनले दुर्मिळ योग; महादेवाच्या कृपेने 'या' 5 राशींचे लोक होणार समृद्ध; कमावणार बक्कळ पैसा
Mahashivratri 2024 : यंदा महाशिवरात्री अतिशय शुभ अशा सर्वार्थ सिद्धी योगात साजरी होणार आहे. एवढंच नाही, तर यंदा महाशिवरात्रीला शिवयोग, सिद्धी योग आणि श्रवण नक्षत्र यांचा अतिशय शुभ संयोग देखील झाला आहे. यंदा शुक्रवार, 8 मार्च रोजी महाशिवरात्री साजरी होणार आहे. शुक्रवारी सर्वार्थ सिद्धी योग असणं खूप शुभ मानलं जातं. अशा स्थितीत, 5 राशींसाठी महाशिवरात्र लाभदायी ठरणार आहे, या राशींवर शिव शंकराची विशेष कृपा राहणार आहे.

Mahashivratri 2024 : हिंदू धर्मात महाशिवरात्रीला विशेष महत्त्व आहे. महाशिवरात्री (Mahashivratri 2024) हा सण भगवान शिव आणि माता पार्वतीचा विवाह सोहळा म्हणून साजरा केला जातो. या दिवशी भोलेनाथ शिव शंकर आणि माता पार्वतीची विधीपूर्वक पूजा केली जाते. यंदा महाशिवरात्री 8 मार्च 2024 रोजी, शुक्रवारी येत असून या दिवशी ग्रहांचे अत्यंत दुर्मिळ योगही तयार होत आहेत.
यंदा महाशिवरात्रीला सर्वार्थ सिद्धी योग आणि शिव योगासोबतच आणखी दोन अतिशय शुभ योगही तयार झाले आहेत. या योगांमुळे वृषभ राशीसह 5 राशींचं भाग्य उजळेल. या राशीच्या लोकांचं अनेक दिवसांपासून रखडलेले काम या दरम्यान पूर्ण होईल आणि शिव शंकराच्या आशीर्वादाने त्यांना प्रत्येक कामात यश मिळेल. आर्थिक स्थिती मजबूत राहील आणि व्यवसायात प्रगती होईल. या भाग्यवान 5 राशी नेमक्या कोणत्या आहेत ते पाहूया.
यंदाची महाशिवरात्र या राशींसाठी ठरणार खास
वृषभ रास (Taurus)
महाशिवरात्रीला बनत असलेल्या शुभ योगांमुळे वृषभ राशीच्या लोकांना करिअर आणि व्यवसायात अनपेक्षित यश मिळेल. तुमची प्रगतीची दारं खुली होतील. तुम्ही जे काही काम हाती घ्याल, त्यात तुम्हाला शंकराच्या आशीर्वादाने यश मिळेल. तुम्हाला कुठूनतरी तुमचा अडकलेला पैसा मिळेल. समाजात तुमचा मान आणि प्रतिष्ठा वाढेल. तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होतील. तुम्हाला तुमच्या आवडीचा जोडीदार मिळण्याची शक्यता आहे.
सिंह रास (Leo)
सिंह राशीच्या लोकांना महाशिवरात्रीला तयार झालेल्या सर्वार्थ सिद्धी योगाच्या प्रभावामुळे इच्छित नोकरी मिळण्याची शक्यता आहे. कामाच्या ठिकाणी तुमचा मान आणि प्रतिष्ठा वाढेल. भौतिक सुखसोयी वाढतील. तुम्हाला व्यवसायात चांगला नफा मिळेल आणि तुमच्यासाठी उत्पन्नाचे एकापेक्षा जास्त स्त्रोत निर्माण होतील. सिंह राशीच्या लोकांच्या वैवाहिक सुखात वाढ होईल आणि त्यांना पैशाशी संबंधित योजनांमध्ये चांगला परतावा मिळेल.
तूळ रास (Libra)
तूळ राशीच्या लोकांना महाशिवरात्रीला तयार झालेल्या शुभ योगांमुळे आर्थिक बाबतीत यश मिळेल आणि सर्वांशी तुमचे संबंध दृढ होतील. आर्थिक स्थिती पूर्वीपेक्षा मजबूत होईल. व्यवसायात अपेक्षित यश मिळाल्यास तुमचा आत्मविश्वास वाढेल. जे अविवाहित आहेत, त्यांचं लवकरच लग्न ठरेल. जर तुम्ही याआधी कधी शेअर्समध्ये पैसे गुंतवले असतील तर त्यात तुम्हाला चांगला परतावा मिळू शकेल. कुटुंबात सर्वांशी तुमचे चांगले संबंध राहतील.
मकर रास (Capricorn)
महाशिवरात्रीला होत असलेल्या शुक्र आणि शनीच्या शुभ संयोगाचा विशेष लाभ मकर राशीच्या लोकांना होईल. तुमच्या वडिलांसोबत तुमचं नातं अधिक घट्ट होईल आणि शुक्राच्या शुभ प्रभावामुळे तुमच्या जीवनात चांगल्या गोष्टी घडतील. तुम्हाला तुमच्या पसंतीची नोकरी मिळू शकते किंवा तुम्हाला पदोन्नती देखील मिळू शकते. तुम्ही तुमच्या कुटुंबासोबत कुठेतरी छान सहलीला जाण्याचा विचार करू शकता. तुम्ही घरात काही नवीन वस्तूंची खरेदी करू शकता.
कुंभ रास (Aquarius)
कुंभ राशीच्या लोकांचं जीवन आनंदाने बहरेल. तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतील. गुंतवणुकीत तुम्हाला चांगला परतावा मिळेल. शुभ योगांमुळे तुमचं वाहन आणि घर खरेदी करण्याचं स्वप्न पूर्ण होऊ शकतं. तुमच्या मुलाला परदेशात जाण्याच्या अप्रतिम संधी मिळू शकतात. जे अजूनही अविवाहित आहेत त्यांना भोलेनाथांच्या आशीर्वादाने चांगला जोडीदार मिळू शकतो. मुलांकडूनही आनंद मिळेल.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा :
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
