Mahashivratri: एकादशीचा उपवास तर केला पण महाशिवरात्रीला उपवास सोडताना काय करायचं? काय सांगतात पंचागकर्ते दाते गुरूजी
Mahashivratri: यंदा एकादशी 7 मार्चला आणि लगेच दुसऱ्या दिवशी महाशिवरात्री (Mahashivratri) 8 मार्चला आहे. त्यामुळे एकादशीचा उपवास सोडायचा की नाही, महाशिवरात्रीचा उपवास कसा करायचा? या संदर्भात पंचागकर्ते मोहन दाते यांनी मार्गदर्शन केले आहे,
Mahashivratri: भगवान विष्णूला प्रसन्न करण्यासाठी एकादशीचं (Ekadashi) व्रत केलं जातं. या दिवशी उपवास करतात, विष्णू देवाची पूजा करतात. एकादशीला ठेवलेला उपवास दुसर्या दिवशी उपवास सोडला जातो. यंदा एकादशी 7 मार्चला आणि लगेच दुसऱ्या दिवशी महाशिवरात्री (Mahashivratri) 8 मार्चला आहे. त्यामुळे एकादशीचा उपवास सोडायचा की नाही, महाशिवरात्रीचा उपवास कसा करायचा? असे अनेक संभ्रम लोकांमध्ये आहे. आज आम्ही तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे देणार आहे. या संदर्भात पंचागकर्ते मोहन दाते यांनी मार्गदर्शन केले आहे.
महाशिवरात्रीच नाही तर कोणतेही व्रत किंवा उपवास सुरु केल्यानंतर जोपर्यंत आपण उपवास सोडत नाही तोपर्यंत ते व्रत पूर्ण होत नाही. पहिला उपवास न सोडता दुसऱ्या दिवशी उपवास केल्यास त्याचे फळ मिळत नाही, असे मानले जाते. याविषयी बोलताना पंचागकर्ते मोहन दाते म्हणाले, एकादशीचा उपवास 8 मार्च म्हणजे महाशिवरात्रीच्या दिवशी सोडायचा आहे. तरच एकादशीचे व्रत पूर्ण होईल. त्यासाठी 8 मार्च (शुक्रवारी) सकाळी उपवास सोडताना भात किंवा कोणत्याही अन्नपदार्थाचा वास घ्यायचा किंवा देवाचे तीर्थ घेऊन आम्ही उपवास सोडत आहोत असे म्हणायचे. असे केल्यास तुमचे एकादशीचे व्रत पूर्ण होईल त्यानंतर महाशिवरात्रीच्या व्रतास सुरू होतो.
दुसऱ्या दिवशीच्या उपवासाला काय खावे?
महाशिवरात्री, एकादशी, हरतालिका या दुसऱ्या दिवशी सोडण्यात येणाऱ्या उपवासाच्या दिवशी लगेच दुसरे व्रत आले तर फक्त अन्न पदार्थाच्या घासाचा फक्त वास घ्याावा. जर घरी जेवण बनवलेच नाही तर पुजेचे तीर्थ घेऊन मी उपवास सोडत आहे, असे म्हणावे. नंतर दुसरा उपवास करावा. दुसऱ्या दिवशी व्रत करताना उपवासाचे पदार्थ, फळे खावीत.
कधी आहे महाशिवरात्री?
सकाळी 9.57 पासून सुरू होईल आणि 9 मार्च रोजी संध्याकाळी 6.17 पर्यंत चालेल. उदयतिथीनुसार 8 मार्चला महाशिवरात्री साजरी होणार आहे. यामध्ये 8 आणि 9 मार्चच्या मध्यरात्री 12.07 ते 12.55 मिनिटांपर्यंत निशीथ काल पूजा मुहूर्त असेल. दुसरीकडे, महाशिवरात्री व्रताचा पारायण मुहूर्त सकाळी 6.38 ते सकाळी 11.04 पर्यंत असेल. या दिवशी महादेवासोबत भक्त देवी पार्वतीची मनोभावे पूजा करतात. महादेव घरात भरभराटी आणतो, तर पार्वती देवीच्या कृपेने घरात सुख-समृद्धी नांदते.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हे ही वाचा :