मुंबई : आगामी विधानसभा निवडणुकीसाठी (Maharashtra Vidhansabha Election 2024) राजकीय पक्षांनी आपले उमेदवार जाहीर करायला सुरुवात केली आहे. यामध्ये महायुती आणि मनसेच्या उमेदवारीतील अंकशास्त्राचा विशिष्ट फॉर्म्युला हा अनेकांचे लक्ष वेधून घेत आहे. महायुतीमधील भाजप आणि शिंदे गट गटाने आपले उमेदवार जाहीर केले आहेत. 


भाजपच्या पहिल्या उमेदवारी यादीत 99 उमेदवारांचा समावेश आहे. तर शिंदे गट आणि मनसेच्या पहिल्या उमेदवारी यादीत प्रत्येकी 45 उमेदवारांचा समावेश आहे. या सगळ्या उमेदवार यादी जाहीर करताना 9 या मुलांकाचे गणित साधण्यात आले आहे. राज ठाकरे यांचे 9 या आकड्यावर असलेले प्रेम सर्वश्रूत आहे. राज ठाकरे अनेक महत्त्वाचे निर्णय 9 तारखेला घेतात. 9 हा आकडा त्यांच्यासाठी शुभ असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात असते.


राज ठाकरे यांच्यापाठोपाठ भाजप आणि शिंदे गटालाही 9 आकड्याची भुरळ पडल्याचे दिसत आहे. कारण, भाजपच्या पहिल्या उमेदवारी यादीत 99 (9+9=18 (1+8=9) आणि शिंदे गटाच्या उमेदवारी यादीत 45 (4+5=9) उमेदवारांचा समावेश आहे.


9 अंकाचं गणित काय?


9 हा आकडा युनिव्हर्सल लकी नंबर म्हणून ओळखला जातो. त्यामुळे भाजप 99, मनसे आणि शिवसेना 45 उमेदवार जाहीर करताना 9 चा आकडा कायम ठेवलाय. राज्यात भाजप-शिवसेना युती असतानाही 171-117 चा फॉर्म्युला होता.


भाजप 99 उमेदवार 
मनसे 45 उमेदवार
शिंदे 45 उमेदवार


सगळ्यांची Numerology 9 होते
9+9 = 18 (1+8) = 9
4+5 = 9
Universal Lucky Number


दरम्यान, राज्यात 20 नोव्हेंबर 2024 रोजी मतदान होत असून 23 नोव्हेंबर रोजी विधानसभा 2024 च्या निवडणुकांचा निकाल जाहीर होणार आहे.                                                                                                          


(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)


हेही वाचा:


Mangal Gochar 2024 : मंगळ ग्रहाचा कर्क राशीत प्रवेश; पुढच्या 1 महिन्यात 4 राशींचं नशीब फळफळणार; संपत्तीत वाढ होऊन जगणार राजासारखं जीवन


राज्यातील 288 मतदारसंघातील सर्वपक्षीय उमेदवारांची यादी; विधानसभेला मनसे अन् वंचितने घेतली आघाडी