Mangal Gochar 2024 : वैदिक ज्योतिष शास्त्रात मंगळ (Mars) ग्रहाला कडक ग्रह मानलं जातं. मंगळ (Mars) हा कडक ग्रह आहे, जो 18 महिन्यांनंतर आपली रास बदलतो. यातच मंगळ ग्रहाने नुकताच 20 ऑक्टोबरला कर्क राशीत प्रवेश केला आहे. मंगळाच्या हालचालीतील हा बदल दिवाळीपूर्वीच झाला आहे. अशा स्थितीत मंगळाच्या संक्रमणामुळे काही राशींचं भाग्य सोन्यासारखं उजळू शकतं. या राशी नेमक्या कोणत्या? जाणून घेऊया.
मेष रास (Aries)
मेष राशीच्या लोकांना कर्क राशीत मंगळाच्या भ्रमणाचा फायदा होणार आहे. या काळात तुमचं धैर्य वाढेल. तुम्ही नोकरी करत असाल तर तुम्हाला एखादी चांगली बातमी मिळू शकते. ज्यांना परदेशात जायचं आहे त्यांची इच्छा लवकरच पूर्ण होऊ शकते. मंगळ संक्रमणादरम्यान तुम्ही आत्मविश्वासाने भरलेले असाल. तुमच्या प्रत्येक कामात तुम्हाला यश मिळेल. तुम्ही प्रत्येक आव्हानावर अगदी सहजतेने मात कराल. धार्मिक कार्यात रुची राहील.
सिंह रास (Leo)
सिंह राशीच्या लोकांसाठी मंगळाचा राशी बदल खूप शुभ ठरू शकतो. कामाच्या ठिकाणी तुमच्या कामाचं कौतुक होईल. तुमचा बॉस तुमच्यावर खूश असेल. या काळात तुमचा मान-सन्मान वाढेल. नोकरीच्या ठिकाणी यश मिळेल. नोकरीच्या शोधात असलेल्या लोकांना नवीन नोकरीची ऑफर मिळू शकते. विद्यार्थ्यांसाठी काळ शुभ आहे. जोडीदारासोबतचं नातं घट्ट होईल.
तूळ रास (Libra)
तूळ राशीच्या लोकांना 20 ऑक्टोबरपासून लॉटरी लागणार आहे. मंगळाचा राशी बदल संक्रमण तुमच्यासाठी शुभ ठरू शकतो. या काळात तुमचं उत्पन्न वाढू शकतं. तुम्ही नोकरी करत असाल तर तुम्हाला पगारवाढ मिळू शकते. उत्पन्नाचे नवीन स्रोत उघडतील. आर्थिक स्थिती सुधारेल. कामाच्या ठिकाणी बॉस तुमच्यावर खूश असेल.
कुंभ रास (Aquarius)
मंगळाच्या राशीतील बदलामुळे कुंभ राशीच्या लोकांचं भाग्य बदलू शकतं. या काळात तुम्हाला अचानक मोठी रक्कम मिळू शकते. आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. तुमची आर्थिक स्थिती मजबूत असेल. करिअरमध्ये यश मिळेल. नवीन व्यवसाय किंवा कोणतंही नवीन काम सुरू करण्यासाठी हा शुभ काळ आहे. आपल्या इच्छेनुसार सर्व गोष्टी घडतील.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा: