Astrology : 24 फेब्रुवारीला दुर्लभ योग; 'या' राशींवर राहणार लक्ष्मीची कृपा, कमवणार बक्कळ पैसा
Full Moon Virgo : माघ पौर्णिमेच्या दिवशी अद्भूत योग बनत आहे, त्यामुळे या दिवशी अनेक राशींवर चंद्रासोबत बुधाची कृपा देखील राहणार आहे. कोणत्या राशींना मिळणार विशेष लाभ? जाणून घेऊया.
![Astrology : 24 फेब्रुवारीला दुर्लभ योग; 'या' राशींवर राहणार लक्ष्मीची कृपा, कमवणार बक्कळ पैसा magh pournima 2024 virgo full moon positive impact on these zodiac signs snow moon Astrology : 24 फेब्रुवारीला दुर्लभ योग; 'या' राशींवर राहणार लक्ष्मीची कृपा, कमवणार बक्कळ पैसा](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/02/21/c7b59fe5aa252a09299aa63e36dfd2841708494031626713_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Magh Pournima 2024 : हिंदू कॅलेंडरनुसार, महिन्यानुसार एका वर्षात एकूण 12 पौर्णिमा असतात. पौर्णिमा झाली की नवीन महिना सुरू होतो. इतकंच नाही, तर पौर्णिमा (Pournima) हा महिन्यातील एकमेव दिवस आहे, जेव्हा चंद्राचा प्रत्येक राशीच्या लोकांच्या जीवनावर कोणत्या ना कोणत्या प्रकारे सकारात्मक परिणाम पडतो.
माघ महिन्याची पौर्णिमा खूप खास असते. यंदा माघ पौर्णिमा 24 फेब्रुवारीला आहे आणि ती कन्या राशीत असेल. कन्या राशीत माघ पौर्णिमा ही एक अद्भुत घटना आहे. ज्योतिष शास्त्रानुसार, जेव्हा पौर्णिमा कन्या राशीत असते तेव्हा काही राशीच्या लोकांना विशेष लाभ मिळतात. 24 फेब्रुवारीला कोणत्या राशींवर लक्ष्मी देवीची अपार कृपा असेल? जाणून घेऊया.
फेब्रुवारीतील पौर्णिमा का खास? (Snow Moon 2024)
24 फेब्रुवारीला येणारी माघ पौर्णिमा खूप खास असते. ओल्ड फार्मर्स पंचांगानुसार, या महिन्याची पौर्णिमा 'स्नो मून' म्हणून ओळखली जाते, कारण ती वर्षाची अशी वेळ असते, जेव्हा उत्तर गोलार्धात सर्वात जास्त हिमवर्षाव होतो. याशिवाय या महिन्याच्या पौर्णिमेला “मायक्रोमून” असंही म्हणतात, कारण ही वर्षातील सर्वात लहान पौर्णिमा आहे.
वृषभ रास (Taurus)
माघ पौर्णिमेचा वृषभ राशीच्या लोकांवर चांगला परिणाम पडेल. तुमच्या चांगल्या विचारांमुळे तुम्ही कोणतेही मोठे स्वप्न साकार करू शकता. लक्ष्मीच्या कृपेने तुम्हाला प्रत्येक क्षेत्रात यश मिळू शकते, त्यामुळे या काळात तुमची अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेली कामे पूर्ण होतील. कुटुंबासोबत चांगला वेळ घालवाल. नात्यातील दुरावा संपेल. व्यवसाय करणाऱ्यांवरही लक्ष्मीची विशेष कृपा असेल. तुम्हाला तुमच्या मेहनतीचे फळ मिळेल आणि यामुळे तुम्हाला भरपूर पैसे कमावण्याची संधी मिळू शकते. यासोबतच चंद्राच्या प्रभावामुळे तुम्ही एखाद्या खास व्यक्तीकडे आकर्षित होऊ शकता.
मकर रास (Capricorn)
या राशीच्या लोकांसाठी माघ पौर्णिमा खूप फायदेशीर ठरू शकते. तुमची प्रदीर्घ प्रलंबित कामं पूर्ण होतील. यासोबतच अविवाहित लोकांना लग्नाचे प्रस्ताव येऊ शकतात. तुमची लव्ह लाईफ सुद्धा खूप चांगली असणार आहे. अपूर्ण राहिलेलं कोणतंही काम आता पूर्ण करता येईल. शिक्षणात तुम्हाला यश मिळू शकते. या काळात तुम्हाला शिक्षणाशी संबंधित कामात फायदा होईल. व्यावसायिकांना चांगला लाभ मिळू शकतो.
कर्क रास (Cancer)
कर्क राशीचा स्वामी स्वतः चंद्र आहे. अशा स्थितीत या राशीच्या लोकांना माघ पौर्णिमेचे विशेष लाभ मिळू शकतात. तुमची प्रदीर्घ प्रलंबित कामं पूर्ण होतील. याद्वारे तुम्हाला तुमच्या जीवनाचा खरा उद्देश सापडेल आणि त्यात यश मिळण्याची पूर्ण शक्यता आहे. तुम्हाला कर्जमुक्ती मिळेल. स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना यश मिळेल. तुम्हाला शिक्षक आणि वडिलांचं पूर्ण सहकार्य मिळेल, तुम्ही तुमच्या मेहनतीच्या जोरावर प्रत्येक क्षेत्रात यश मिळवू शकाल.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)