Lord Hanuman Blessings Sign : वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, शनिवार आणि मंगळवारचा दिवस हा भगवान हनुमानाला (Lord Hanuman) समर्पित आहे. या दिवशी भगवान हनुमानाला प्रसन्न करण्यासाठी भक्त आपापल्या परीने प्रयत्न करतात. असं म्हणतात की, 
जेव्हा हनुमानाची कृपा होते तेव्हा व्यक्तीच्या आयुष्यात अनेक शुभ संकेत पाहायला मिळतात. यामुळे सुख, शांती, यश आणि आध्यात्मिक प्रगती पाहायला मिळते. त्यामुळे भगवान हनुमान जेव्हा प्रसन्न होतात तेव्हा कोणते संकेत मिळतात ते जाणून घेऊयात. 


नकारात्मक शक्तीपासून मुक्ती मिळते 


ज्या लोकांवर भगवान हनुमानाचा आशीर्वाद असतो त्यांच्या मनातील भिती हळुहळू दूर होते. आणि आत्मविश्वास वाढू लागतो. या व्यतिरिक्त आपलं मनही शांत आणि स्थिर राहतं. जर तुम्हाला आताही भिती वाटत नसेल, नकारात्मक ऊर्जा तुमच्या आजूबाजूलाही नसेल तर समजा की तुमच्यावर हनुमानाची कृपा आहे. 


हाताच्या तळव्यांवर शुभ रेषा


जर तुमच्या हाताच्या तळव्यावर शुभ रेषा स्पष्ट दिसत असतील तर समजून जा की हनुमानाची तुमच्यावर कृपा आहे. हा एक प्रकारचा संकेत आहे. या व्यक्तीरिक्त शनीचा प्रभाव जर हळूहळू कमी होत असेल आणि सर्व अडचणींपासून मुक्ती मिळत असेल तर तुमच्यावर हनुमानाचा आशीर्वाद आहे. 


संकटांपासून मुक्ती मिळते 


जर तुम्ही प्रयत्न न करता तुमच्या समस्या दूर होत असतील किंवा अनेक दिवसांपासून रखडलेले कार्य अगदी सुरळीतपणे पार पडत असेल तर हनुमान तुमच्यावर प्रसन्न झाला आहे. 


हनुमानाशी संबंधित स्वप्न 


जर तुम्हाला स्वप्नात भगवान हनुमान आणि त्यांचं मंदिर, गदा, राम-सीता माता यांचे दर्शन घेताना दिसले तर समजा की हनुमान तुमची रक्षा करतायत. 


(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)  


हेही वाचा :                                                               


Weekly Horoscope : तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ आणि मीन राशीसाठी नवीन आठवडा कसा असणार? वाचा साप्ताहिक राशीभविष्य