ICC Champions Trophy 2025 Team India Squad : इंग्लंडविरुद्धच्या तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेत क्लीन स्वीप करून भारतीय संघाने आगामी चॅम्पियन्स ट्रॉफीची आपली तयारी पक्की केली आहे. चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी जाहीर झालेल्या भारतीय संघात दोन बदल करण्यात आले. ज्यामध्ये जखमी जसप्रीत बुमराहच्या जागी हर्षित राणाला स्थान मिळाले, तर यशस्वी जैस्वालच्या जागी वरुण चक्रवर्ती मुख्य संघाचा भाग झाला, जो निश्चितच सर्वांसाठी आश्चर्यकारक निर्णय होता. खरंतर, भारतीय संघात आधीच एकूण 4 मुख्य फिरकी गोलंदाज होते, त्यानंतर वरुणचा पाचवा फिरकी गोलंदाज म्हणून समावेश करण्यात आला.
यावेळी आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी पाकिस्तानच्या यजमानपदाखाली खेळली जात आहे, ज्यामध्ये भारतीय संघ त्यांचे सर्व सामने दुबईच्या मैदानावर खेळेल. या स्पर्धेसाठी अक्षर पटेल, रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, वॉशिंग्टन सुंदर आणि वरुण चक्रवर्ती यांचा संघात समावेश केला आहे. अनेकांच्या मनात प्रश्न आहे की 5 फिरकीपटू का निवडले गेले आहेत. अनुभवी रविचंद्रन अश्विननेही यावर प्रतिक्रिया देत आपला राग व्यक्त केला.
दुबईत 5 फिरकीपटू काय कामाचे?
रविचंद्रन अश्विनने त्याच्या यूट्यूब चॅनलवर 2025 च्या चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी जाहीर झालेल्या भारतीय संघाबद्दल चर्चा केली. तो म्हणाला की, दुबईला आपण किती फिरकीपटू घेऊन जाणार आहोत हे मला समजत नाही. 5 फिरकीपटू आणि यशस्वी जैस्वालला वगळण्यात आले आहे. मी समजू शकतो की आम्ही दौऱ्यावर तीन ते चार फिरकी गोलंदाज घेतो, पण दुबईमध्ये 5 फिरकी गोलंदाजांची काय गरज आहे. मला वाटतं जर 2 नाही तर कमीत कमी एक फिरकी गोलंदाज आपल्यकडे जास्त आहे.
रविचंद्रन अश्विनने समीकरण सांगितले आहे की, जर वरुण चक्रवर्तीला चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 च्या सामन्यांमध्ये प्लेइंग-11 मध्ये समाविष्ट करायचे असेल तर मोठे बदल करावे लागतील. अश्विन म्हणाला, 'दुबईला जाऊन इतके फिरकीपटू काय करतील?' तुमचे सर्वोत्तम अष्टपैलू खेळाडू 2 डावखुरे आहेत. अक्षर आणि जडेजा दोघेही नक्कीच खेळतील. हार्दिक खेळेल आणि कुलदीपही खेळेल. जर तुम्हाला वरुणला संघात पहायचे असेल तर तुम्हाला एका वेगवान गोलंदाजाला बेंचवर ठेवावे लागेल आणि हार्दिकला दुसऱ्या वेगवान गोलंदाजाचा पर्याय म्हणून वापरावे लागेल. अन्यथा, तुम्हाला तिसऱ्या वेगवान गोलंदाजाला खेळवण्यासाठी फिरकी गोलंदाजाला बेंचवर ठेवावे लागेल.
अश्विनने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून घेतली निवृत्ती
भारतीय ऑफस्पिनर रविचंद्रन अश्विनने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. त्याने तिन्ही फॉरमॅटमध्ये 287 सामने खेळले आणि 765 विकेट्स घेतल्या. अश्विन हा भारताचा दुसऱ्या क्रमांकाचा सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज आहे. त्याच्या पुढे फक्त अनिल कुंबळे आहे, ज्याने 953 विकेट्स घेतल्या आहेत.
चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी भारतीय संघ -
रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल, ऋषभ पंत, हार्दिक पंड्या, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, हर्षित राणा, मोहम्मद. शमी, अर्शदीप सिंग, रवींद्र जडेजा, वरुण चक्रवर्ती.
हे ही वाचा -