Lok Sabha Election 2024 : लोकसभा निवडणुकीचा (Loksabha Election) निकाल येत्या 4 जूनला जाहीर होणार आहे. राज्यातील मोठ्या राजकीय हालचालींनंतर या निवडणुकीत नेमकं कोण बाजी मारणार? कोणाचं सरकार निवडून येणार? याकडे सगळ्यांचं लक्ष आहे. याच संदर्भात लोकसभा निवडणुकीच्या निकालाआधी प्रसिद्ध ज्योतिषी अनिल थत्ते (Anil Thatte) यांनी महाराष्ट्रातील राजकारणावर (Maharashtra Politics) मोठा अंदाज वर्तवला आहे. कोकणात जर नारायण राणेंचा (Narayan Rane) पराभव झाला तर त्याला फक्त एकच गोष्ट कारणीभूत असेल, असं ते म्हणाले.


कोकणात कोण बाजी मारणार?


रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात शिवसेना ठाकरे गटाचे नेते विनायक राऊत आणि भाजपचे नारायण राणे यांच्यात काट्याची टक्कर आहे. यातच आता लोकसभा निवडणुकीचं भाकीत करताना प्रसिद्ध ज्योतिषी अनिल थत्ते यांनी नारायण राणेंबाबत सनसनाटी भविष्यवाणी केली आहे. ते म्हणाले, नारायण राणे जिंकून आले तर स्वत:च्या बळावर येतील आणि त्यांचा जर पराभव झाला तर त्याला एकच कारण असेल.


नारायण राणेंचा पराभव झाला तर कारण फक्त एकच


लोकसभा निवडणुकीचं भाकीत करताना प्रसिद्ध ज्योतिषी अनिल थत्ते म्हणाले, "नारायण राणेंनी त्यांची सर्व पुण्याई पणाला लावली आहे, परंतु त्यांच्या 2 मुलांमुळे कोकणात खूप अस्वस्थता आहे. नारायण राणे निवडून आले तर स्वत:च्या बळावर येतील, पण जर पराभूत झाले तर त्याला कारण ते स्वत: नसतील... तर त्याला कारण फक्त आणि फक्त त्यांची मुलं असतील.


देशातील महायुतीच्या जागेसंदर्भात काय म्हणाले अनिल थत्ते?


महायुतीबद्दल भाकित करताना अनिल थत्ते म्हणाले, "आपल्या सर्वांनाच माहीत आहे की, यंदाच्या निवडणुकीत भाजपाने 400 पारचा नाराच लावला होता. यात सर्वात मोठा वाटा महाराष्ट्राचा असेल असं गृहीत धरलं होतं. पण, माझा असा अंदाज आहे की, 35 ते 40 जागा महायुतीला मिळतील तर 8 ते 13 जागा महाविकास आघाडीला मिळतील."


अजित पवार गटाला किती जागा मिळणार? 


लोकसभा निवडणुकीचं भाकीत सांगताना अनिल थत्ते यांनी अजित पवार गटाबाबत धक्कादायक माहिती दिली आहे. ते म्हणाले की, या निवडणुकीत अजित पवार गटाला एकाही जागेवर यश मिळणार नाही. तर, शरद पवार गट हा अजित पवार गटापेक्षा जास्त सरस ठरणार आहे. बारामती मतदारसंघात सुप्रिया सुळे अव्वल कामगिरी करतील, तर सुनेत्रा पवार यांना पराभव होईल, असं भाकित देखील प्रसिद्ध ज्योतिषी अनिल थत्ते यांनी केलं आहे.


हेही वाचा:


Lok Sabha Election 2024 : लोकसभा निवडणुकीबाबत प्रसिद्ध ज्योतिषी अनिल थत्ते यांचं भाकित, महाराष्ट्रात महाविकास आघाडीला किती जागा मिळणार?