Pushpa 2 : दाक्षिणात्य सुपरस्टार अल्लू अर्जुन (Allu Arjun) अभिनीत 'पुष्पा 2' (Pushpa 2) हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. घोषणा झाल्यापासून या बहुप्रतीक्षित चित्रपटाबाबत चाहत्यांची उत्सुकता लागली आहे. 'पुष्पा 2 : द रूल' (Pushpa 2 : The Rule) या कार्यक्रमाची चाहत्यांमध्ये चांगलीच क्रेझ आहे. टीझरपासून ते चित्रपटातील 'पुष्पा पुष्पा' (Pushpa Pushpa) या गाण्यापर्यंत सर्व काही धमाकेदार आहे. या चित्रपटातील 'पुष्पा पुष्पा' या गाण्याने रिलीजआधीच सर्व रेकॉर्ड ब्रेक केले आहेत. 


अल्लू अर्जुनचा 'पुष्पराज' रुपातील नवा अवतार प्रेक्षकांच्या मनावर राज्य करत आहे. फर्स्ट लूक आऊट झाल्यापासून प्रेक्षक चित्रपटाची प्रतीक्षा करत आहेत. 'पुष्पा 2' या गाण्याला युट्यूबवर 100 मिलियनपेक्षा जास्त व्ह्यूज आणि 2.26 मिलियनपेक्षा जास्त लाईक्स मिळाले आहेत.  अशाप्रकारे या गाण्याने मोठा रेकॉर्ड आपल्या नावे केला आहे. सहा भाषांमध्ये हे गाणं रिलीज झालं आहे.


'पुष्पा पुष्पा'ची ऐतिहासिक कामगिरी


'पुष्पा 2'च्या निर्मात्यांनी एक शानदार पोस्टर शेअर करत चाहत्यांना 'पुष्पा पुष्पा' गाण्याच्या ऐतिहासिक कामगिरीची माहिती दिली आहे. निर्मात्यांनी एक पोस्ट शेअर करत लिहिलं आहे,"#PushpaPushpa - लोकांनी जगभरात गाजवला. #Pushpa2FirstSingle ला युट्यूबवर 6 भाषांमध्ये 2.26 मिलिनय+लाईक्स मिळाले आहेत. तसेच 100 मिलियनपेक्षा अधिक व्ह्यूज मिळाले आहेत". हिंदी, तेलगू, तमिळ, मल्याळम, कन्नड आणि बंगाली भाषेत हे गाणं रिलीज झालं आहे. राष्ट्रीय पुरस्कार विजेते संगीतकार देवी श्री प्रसाद उर्फ ​​रॉकस्टार डीएसपी आणि सदैव मधुर राष्ट्रीय पुरस्कार विजेती गायिका श्रेया घोषाल यांनी हे गाणं गायलं आहे.






'पुष्पा 2'मझील दूसरं गाणं 'द कपल सॉन्ग' लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या गाण्यात प्रेक्षकांना डबल ट्रीट मिळणार आहे. हे गाणं श्रेया घोषालने वेगवेगळ्या भाषांमध्ये गायलं आहे. 'पुष्पा 2' हा चित्रपट 15 ऑगस्ट 2024 रोजी सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे. सुकुमारने या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे. तर माइश्री मूवी मेकर्सने या चित्रपटाची निर्मिती केली आहे. अल्लू अर्जुन, रश्मिका मंदाना आणि फहद फासिल या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकेत आहेत.


संबंधित बातम्या


South Actor :   'पुष्पा' फेम अभिनेत्याला 41 व्या वर्षी गंभीर आजाराची लागण, म्हणाला, 'आता या रोगावर उपचार...'