Libra Weekly Horoscope 30 September To 06 October 2024 : हिंदू कॅलेंडरनुसार, ऑक्टोबर महिन्यातला पहिला आठवडा लवकरच सुरु होणार आहे. हा नवीन आठवडा तूळ राशीसाठी नेमका कसा असणार आहे? तूळ राशीचं करिअर, शिक्षण, लव्ह लाईफ आणि आरोग्याच्या दृष्टीने नवीन आठवडा तूळ (Libra) राशीसाठी लाभदायी असणार आहे की नाही? हे जाणून घेण्यासाठी तूळ राशीचे साप्ताहिक राशीभविष्य (Weekly Horoscope) जाणून घ्या.
तूळ राशीची लव्ह लाईफ (Libra Love Horoscope)
नवीन आठवड्यात तूळ राशीच्या लोकांची लव्ह लाईफ चांगली असणार आहे. नात्यामध्ये छोटी-मोठी आव्हानं येऊ शकतात. संकटांचा सामना करावा लागू शकतो. पण, यामध्ये तुमच्या जोडीदाराचा तुम्हाला चांगला पाठिंबा मिळेल. तसेच, पार्टनरबरोबर भावना व्यक्त करायला शिका. यामुळे तुमचं नातं अधिक घट्ट होण्यास मदत होईल.
तूळ राशीचे करिअर (Libra Career Horoscope)
तूळ राशीचे करिअर चांगले असणार आहे. तुमच्या कामावर तुमचा बॉस प्रभावित होईल. तसेच, कामाच्या ठिकाणी नवीन जबाबदारी तुमच्यावर सोपविण्यात येईल. ती तुम्ही नीट पार पाडणं गरजेचं आहे. विद्यार्थ्यांना परदेशी काम करण्याची देखील संधी मिळेल. बॅंकेत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना आपल्या कामावर अधिक लक्ष देण्याची गरज आहे.
तूळ राशीचे आर्थिक जीवन (Libra Wealth Horoscope)
आर्थिक बाबतीत तुमचा हा आठवडा फार चांगला असणार आहे. तुम्हाला कोणत्याच प्रकारे पैशांची कमतरता भासणार नाही. नातेवाईकांना मात्र आर्थिक चणचण भासू शकते. आठवड्याच्या शेवटी तुम्ही पैशांचा जपून वापर करणं गरजेचं आहे. या काळात मित्रांचा देखील तुम्हाला चांगला पाठिंबा मिळेल. तसेच, भविष्यासाठी आत्ताच पैशांची गुंतवणूक करा. इतरांना मदत, दानधर्म देखील तुम्ही करु शकता.
तूळ राशीचे आरोग्य (Libra Health Horoscope)
नवीन आठवड्यात तुमची तब्येत चांगली असणार आहे. मात्र, तरीही तुम्ही आपल्या आरोग्याची काळजी घ्या. बाहेरचे तेलकट आणि तिखट पदार्थ खाणे टाळा. तसेच, कोणत्याही वाईट गोष्टीचं जसे की, तंबाखू खाणे, धूम्रपान, मदयपान करणे या गोष्टीचं व्यसन लावून घेऊ नका.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा: