Pitru Paksha 2024 : यंदा 2 ऑक्टोबरला पितृ पक्ष संपणार आहे. या दिवशी सूर्य आणि केतूची युती होत असल्याने ग्रहण योग निर्माण होणार आहे. याच सोबत, या दिवशी वर्षातील शेवटचं सूर्यग्रहण देखील लागणार आहे. ग्रहणासोबत या दिवशी सूर्य आणि शनि एकत्र येऊन अशुभ असा षडाष्टक योग देखील बनत आहे, त्यामुळे हा काळ काही राशींसाठी घातक ठरेल. या काळात कोणत्या राशींना नुकसान सोसावं लागणार? जाणून घेऊया.


वृषभ रास (Taurus)


या राशीच्या लोकांसाठी पितृपक्षानंतरचा काळ अजिबात फायद्याचा ठरणार नाही. या राशीच्या लोकांना शारीरिक आणि मानसिक समस्यांना सामोरं जावं लागू शकतं. यासोबतच करिअर आणि बिझनेसमध्येही अनेक प्रकारच्या समस्या निर्माण होऊ शकतात. वाहन चालवताना थोडं लक्ष देणं आवश्यक आहे, अन्यथा अपघात होण्याची शक्यता आहे. करिअरशी संबंधित कोणताही निर्णय थोडा विचार करूनच घ्या. घाईघाईने घेतलेला निर्णय तुमच्या भविष्यासाठी अडचणी निर्माण करू शकतो. याशिवाय जर आपण व्यवसायाबद्दल बोललो तर, तुमचे काही प्रकल्प किंवा ऑर्डर रद्द होऊ शकतात. यामुळे तुमचं खूप मोठं आर्थिक नुकसान होऊ शकतं. नात्यांबाबतही थोडं सावध आणि सतर्क राहण्याची गरज आहे. अशुभ प्रभाव टाळण्यासाठी शनि आणि सूर्य मंत्राचा जप करा.


सिंह रास (Leo)


सिंह राशीसाठी ग्रहण आणि षडाष्टक योग शुभ ठरणार नाही. शनि आणि सूर्याच्या युतीमुळे बनलेला षडाष्टक योग तुमच्यासाठी नुकसानीचा ठरेल. या काळात नोकरी-व्यवसायात अनेक अडचणी निर्माण होतील. तुमच्यावर सतत एखाद्या गोष्टीचा ताण राहील. तुमची तब्येतही बिघडू शकते. या काळात न्यायालयाचा निर्णय तुमच्या विरोधात येण्याची शक्यता आहे. नोकरदार लोकांना कामाच्या ठिकाणी अडचणींचा सामना करावा लागू शकतो. व्यावसायिकांना नुकसान सहन करावं लागू शकतं.


मकर रास (Capricorn)


मकर राशीच्या लोकांसाठीही पितृपक्षानंतरचा काळ ग्रहण आणि षडाष्टक योगामुळे लाभदायक ठरणार नाही. शनीच्या प्रभावामुळे तुमच्या सर्व कामात काही प्रमाणात अडथळे येऊ शकतात. या काळात नोकरी-व्यवसायात थोडी काळजी घ्या. सहकारी आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांशी काही मुद्द्यावर मतभेद होऊ शकतात. बॉस तुमच्या कामावर नाराज असू शकतात, त्यामुळे थोडी काळजी घेण्याची गरज आहे. या काळात तुम्ही नोकरी बदलण्याचीही शक्यता आहे. यासोबतच तुम्हाला बिझनेसमध्ये काही अडचणींचा सामना करावा लागू शकतो. कुटूंबियांशी काही मुद्द्यावरून मतभेदही होऊ शकतात. आरोग्याबाबत थोडं सावध राहा.


(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)


हेही वाचा: 


Surya Gochar 2024 : तब्बल 1 वर्षानंतर सूर्याचा मित्र राशीत प्रवेश; 3 राशींचं नशीब सोन्यासारखं उजळणार, नवीन नोकरीसह बँक बॅलन्स वाढणार


Numerology : अतिशय सुंदर असतात 'या' जन्मतारखेच्या मुली; सौंदर्याने सर्वांनाच पाडतात भुरळ, बोलण्यातही असतात चतुर