Weekly Horoscope 30 September To 06 October 2024 : सप्टेंबर महिना संपून ऑक्टोबर महिना अवघा काही दिवसांवर सुरु होणार आहे. नवीन महिन्यासोबत नवीन आठवडा सुरू होणार आहे. ऑक्टोबरचा पहिला आठवडा तुमच्यासाठी कसा राहील? या नवीन आठवड्यात करिअर, शिक्षण, नोकरी, लव्ह लाईफ आणि आर्थिक बाबतीत तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन राशींचा नवीन आठवडा कसा असणार आहे? एकूणच तूळ ते मीन राशीच्या (Zodiac Signs) लोकांचा आठवडा नेमका कसा असेल जाणून घेऊयात साप्ताहिक राशीभविष्य (Weekly Horoscope).
तूळ रास (Libra Horoscope)
तूळ राशीच्या लोकांसाठी नवीन आठवडा हा सर्वसामान्य असणार आहे. या राशीच्या लोकांना आठवड्याच्या सुरुवातीला कामाचा जास्त ताण जाणवेल. पण, तुम्ही अत्यंत मेहनत घेऊन दिलेलं काम वेळेत पूर्ण करणं गरजेचं आहे. तसेच, तुमच्या ज्या काही योजना तुम्ही आखल्या आहेत त्या पूर्ण होतील. आठवड्याच्या शेवटी तुमचा प्रवासाला जाण्याचा चांगला योग आहे.
वृश्चिक रास (Scorpio Horoscope)
वश्चिक राशीच्या लोकांसाठी नवीन आठवडा चढ-उतारांचा असणार आहे. तुम्हाला अनेक आव्हानांचा सामना करावा लागू शकतो. यावेळी तुमचा सकारात्मक दृष्टीकोन असणं गरजेचं आहे. या आठवड्यात तुम्हाला आर्थिक चणचण देखील भासू शकते. पण, मेहनत करत राहा. तसेच, आरोग्याची काळजी घ्या. व्यापारी वर्गातील लोकांना कामानिमित्त बाहेर जावं लागण्याची शक्यता आहे.
धनु रास (Sagittarius Weekly Horoscope)
धनु राशीच्या लोकांसाठी नवीन आठवडा सामान्य असणार आहे. या आठवड्यात तुम्ही तुमची जी काही राहिलेली कामं आहेत ती पूर्ण करू शकता. तसेच, गुंतवणुकीच्या दृष्टीने हा आठवडा तुमच्यासाठी लाभदायक ठरू शकतो. नवीन वाहन, प्रॉपर्टी विकत घेण्याचा विचार करत असाल तर चांगला योग आहे.
मकर रास (Capricorn Weekly Horoscope)
मकर राशीच्या लोकांनी नवीन आठवड्यात सावध राहण्याची गरज आहे. आतापर्यंत तुम्ही जे काही काम करत आला आहात त्यावर ठाम राहा. तसेच, नवीन लोकांबरोबर तुमच्या भेटीगाठी वाढतील. समाजकार्यात तुमचं मन जास्त रमेल. त्यामुळे समाजात तुमचा मान-सन्मानही वाढेल. या आठवड्यात मित्रांचा सहवास तुमच्यासाठी फार मोलाचा ठरणार आहे.
कुंभ रास (Aquarius Weekly Horoscope)
जुलै महिन्याचा नवीन आठवडा तुमच्यासाठी फार महत्त्त्वाचा असणार आहे. या आठवड्यात तुमची स्वत:ची प्रगती तुम्हाला दिसेल. या आठवड्यात तुम्हाला नशिबाची चांगली साथ मिळेल त्यामुळे तुम्ही निश्चिंत राहा. कोणतंही काम करताना आपल्या मेहनतीवर आणि आत्मविश्वासाच्या जोरावर करा.
मीन रास (Pisces Weekly Horoscope)
मीन राशीच्या लोकांसाठी नवीन आठवडा चांगला जाणार आहे. या काळात तुमच्या आयुष्यात अनेक सकारात्मक बदल घडताना दिसतील. तसेच, ग्रहांच्या संक्रमणाचा तुमच्या आयुष्यावर सकारात्मक परिणाम झालेला दिसून येईल. तुमच्या स्वभावाकडे लोक आकर्षित होतील. त्यामुळे सगळ्यांशी नम्रपणे वागा. कामाच्या बाबतीत प्रामाणिक राहा.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा: