Libra Weekly Horoscope 14 To 20 September 2024 : हिंदू कॅलेंडरनुसार, ऑक्टोबर महिन्यातला तिसरा आठवडा लवकरच सुरु होणार आहे. हा नवीन आठवडा तूळ राशीसाठी नेमका कसा असणार आहे? तूळ राशीचं करिअर, शिक्षण, लव्ह लाईफ आणि आरोग्याच्या दृष्टीने नवीन आठवडा तूळ राशीसाठी लाभदायी असणार आहे की नाही? हे जाणून घेण्यासाठी तूळ राशीचे साप्ताहिक राशीभविष्य (Weekly Horoscope) जाणून घ्या. 


तूळ राशीची लव्ह लाईफ (Libra Love Horoscope)


तूळ राशीच्या लोकांसाठी नवीन आठवडा चांगला असणार आहे. फक्त तुम्ही तुमच्या नातेसंबंधात प्रामाणिक असणं गरजेचं आहे. तेसच, जे लोक सिंगल आहेत त्यांना लवकरच जोडीदार मिळण्याची शक्यता आहे. तुमच्या पार्टनरबरोबर तुम्ही वेळीच तुमच्या भावना व्यक्त करायला शिका अन्यथा नात्यात दुरावा येण्यास वेळ लागणार नाही. 


तूळ राशीचे करिअर (Libra Career  Horoscope)


करिअरच्या बाबतीत बोलायचं झाल्यास तूळ राशीच्या लोकांसाठी नवीन आठवडा फार महत्त्वाचा असणार आहे. या काळात तुम्ही कोणतेही निर्णय घ्याल ते विचारपूर्वक घेण्याची गरज आहे. तसेच, करिअरमध्ये तुमची ग्रोथ होण्यासाठी तुम्हाला नवीन संधी मिळेल. या संधीचा वेळीच लाभ घ्या. तसेच, कामाच्या ठिकाणी तुम्हाला वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून काही जबाबदाऱ्या सोपविण्यात येतील त्या वेळीच पार पाडा. 


तूळ राशीची आर्थिक स्थिती (Libra Wealth Horoscope)


आर्थिक बाबतीत विचार केल्यास, तूळ राशीच्या लोकांनी नवीन आठवड्यात लॉंग टर्म प्लानिंगवर फोकस करणं गरजेचं आहे. यासाठी पैशांची गुंतवणूक देखील तुम्ही करु शकता. अनेक योजना राबवू शकता. तसेच, आर्थिक बाबतीत निर्णय घेताना सावधानतेने घ्या. विचार न करता कोणताही निर्णय घेऊ नका. 


तूळ राशीचे आरोग्य (Libra Health Horoscope)


या आठवड्यात तुम्ही तुमच्या आरोग्याची जास्त काळजी घेणं गरजेचं आहे. यासाठी तुम्ही शारीरिक आरोग्याबरोबरच मानसिक आरोग्यावरही लक्ष द्या. बाहेरचे तेलकट पदार्थ खाऊ नका. तसेच, तिखट खाण्यावरही नियंत्रण ठेवणं गरजेचं आहे. तसेच, आरोग्याच्या छोट्या तक्रारी जाणवण्यापूर्वीच डॉक्टरांशी संपर्क साधा. 


(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)


हेही वाचा :


Weekly Horoscope 14 To 20 October 2024 : तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ आणि मीन राशीसाठी नवीन आठवडा कसा राहील? साप्ताहिक राशीभविष्य जाणून घ्या