Baba Siddique Death: महाराष्ट्राचे माजी मंत्री आणि अजित पवार गटाचे नेते बाबा सिद्दकी यांच्यावर शनिवारी संध्याकाळी मुंबईतील वांद्रे पूर्वमध्ये अज्ञातांनी गोळ्या झाडून हत्या केली. या घटनेनंतर सर्व स्तरातून धक्का व्यक्त करण्यात येत आहे. मनोरंजनसृष्टीतही अनेकांशी घनिष्ठ संबंधांसाठी ओळखले जाणारे बाबा सिद्दकी यांच्या हत्येवर अनेक बॉलिवूड सेलिब्रेटींनी शोक व्यक्त केलाय. अभिनेता सलमान खान, संजय दत्त यांनी या घटनेची माहिती कळताच मुंबईच्या कलावती रुग्णालयात हजेरी लावल्याचंही दिसलं. अनेक बॉलिवूड कलाकारांना या घटनेनं धक्का बसलाय. सोशल मिडियावर अनेकांनी बाबा सिद्दक्कींना श्रद्धांजली वाहिली आहे. 


बॉलिवूड अभिनेता रितेश देशमुख, शिल्पा शेट्टी तसेच  प्रिया दत्त, वीर पहारिया, राज कुंद्रा यांच्यासह अनेकजणांनी आपल्या सोशलमिडियावरूनही शोक व धक्का व्यक्त केलाय.


रितेश देशमुखनं X माध्यमावर लिहिली पोस्ट


अभिनेता रितेश देशमुख यांनं बाबा सिद्दकी यांच्या हत्येनंतर x माध्यमावर एक श्रद्धांजलीची पोस्ट शेअर केली आहे. त्यानी  त्यांच्या जाण्यानं मोठा धक्का बसला असल्याचं सांगत त्यांच्या कुटुंबाला धीर दिलाय.


 






प्रिया दत्तनंही केली भावूक पोस्ट


माजी लोकसभा सदस्य आणि अभिनेता संजय दत्त यांची बहिण प्रिया दत्तनेही सोशल मिडियावर आपलं दु:ख शेअर केलंय. आज बाबा सिद्दकी यांच्या हत्येच्या बातमीनं मी हादरले आहे. बाबा राजकीय सहकारी होते असं तिनं म्हटलंय. x माध्यमावर तिनं ही पोस्ट शेअर केली आहे. माझ्या वडिलांसाठी, बाबा सिद्दीक हे मुलासारखे होते आणि माझ्यासाठी ते एक भाऊ आणि प्रिय मित्र होते. माझ्या वडिलांच्या राजकीय प्रवासात आणि त्यानंतरही ते त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले. जेव्हा मी राजकारणात प्रवेश केला, तेव्हा त्यांनी मला त्यातील चढ-उतारांवर मार्गदर्शन केले आणि त्यांचा अतूट पाठिंबा दिला. त्याचे नुकसान कुटुंबातील सदस्याच्या जाण्यासारखे वाटते.  ईश्वर त्यांना हे अपार दु:ख सहन करण्याची शक्ती देवो. त्यांच्या आत्म्याला चिरशांती लाभो. असंही तिनं पुढे लिहिलंय.


 






अनेक बॉलिवूड कलाकार कलावती रुग्णालयात 


बाबा सिद्दकी यांच्या हत्येची बातमी कळताच अनेक बॉलिवूड कलाकार कलावती रुग्णालयात शनिवारी रात्री दाखल झाले होते. अभिनेता संजय दत्त, सलमान खान तसेच शिल्पा शेट्टी व राज कुंद्रा हे दोघेही सिद्दकी यांच्या कुटुंबाला धीर देण्यासाठी रुग्णालयात गेल्याचे दिसून आले. झहीर इक्बालचे वडील इक्बाल रतनसी यांच्यासह अनेक सेलिब्रिटी हॉस्पिटलमध्ये पोहोचले होते. बॉलिवूड अभिनेता संजय दत्तची बहीण प्रिया दत्तही ही बातमी मिळताच तात्काळ हॉस्पिटलमध्ये पोहोचली. 


हेही वाचा:


Baba Siddique:दुश्मन बन गये दोस्त! बाबा सिद्दकींनी सलमान शाहरुखचं 5 वर्षांचं भांडण असं मिटवलं, कटूता संपून घेतली गळाभेट