Leo Weekly Horoscope 21 To 27 October 2024 : राशीभविष्यानुसार, सिंह राशीसाठी नवीन आठवडा आर्थिकदृष्ट्या चांगला असेल. तुमची लव्ह लाईफ देखील या आठवड्यात चांगली असेल. या आठवड्यात तुमचे उत्पन्न स्रोत वाढतील. एकूणच सिंह राशीच्या लोकांसाठी हा आठवडा व्यवसाय, आरोग्य, नातेसंबंध आणि प्रेमासाठी किती खास असणार आहे? सिंह राशीचे साप्ताहिक राशीभविष्य (Weekly Horoscope) जाणून घ्या.
सिंह राशीची लव्ह लाईफ (Libra Love Horoscope)
सिंह राशीच्या लोकांसाठी नवीन आठवडा महत्त्वाचा असणार आहे. या आठवड्यात तुमच्याप्रती काळजी दिसून येईल. तसेच, काहींच्या नात्यात अनेक चढ-उतार दिसतील. याचं कारण म्हणजे तुमचा वाढता अहंकार. यामुळे तुमच्या नात्यात अनेक गैरसमज निर्माण होऊन नातं दुरावू शकतं. यासाठी तुमच्या ज्या काही समस्या आहेत त्या लवकरात लवकर दूर करण्याचा प्रयत्न करा.
सिंह राशीचे करिअर (Libra Career Horoscope)
सिंह राशीच्या लोकांसाठी नवीन आठवडा सामान्य पण काहीसा संघर्षाचा असणार आहे. या आठवड्यात तुमच्या कामावर अहंकाराचं वर्चस्व वाढून देऊ नका. अन्यथा तुम्हाला हातातून अनेक महत्त्वाचे प्रोजेक्ट्स जातील. तसेच, जे लोक नोकरी सोडण्यासाठी इच्छुक आहेत त्यांना लवकरच नवीन नोकरी मिळेल. त्यामुळे चिंता करण्याची गरज नाही.
सिंह राशीची आर्थिक स्थिती (Leo Wealth Horoscope)
आठवड्याच्या सुरुवातीला तुम्हाला आर्थिक चणचण जाणवेल. त्यामुळे अशा वेळी तुमची जुनी गुंतवणूक महत्त्वाची ठरेल. तसेच, भावा-बहिणींबरोबर पैशांवरून वाद होण्याची शक्यता आहे. तुम्हाला बॅंक लोन फेडण्यासाठी देखील फार वेळ लागण्याची शक्यता आहे. शेअर मार्केटमध्ये सध्या पैसे गुंतवू नका.
सिंह राशीचे आरोग्य (Leo Health Horoscope)
सिंह राशीच्या लोकांनी आपल्या आरोग्याबाबत जास्त सतर्क असण्याची गरज आहे. अन्यथा तुमचं आजारपण तुमच्या जीवावर बेतू शकतं. तसेच, आठवड्याच्या शेवटी ज्याने तुम्हाला त्रास होईल अशा कोणत्याच एक्टिव्हिटीचा भाग होऊ नका.
तसेच, बदलत्या वातावरणामुळे तुम्हाला घसादुखीचा त्रास होऊ शकतो.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा: