Weekly Horoscope 21 To 27 October 2024 : नवीन आठवडा सुरू होणार आहे. ऑक्टोबरचा चौथा आठवडा काही राशींसाठी खास असणार आहे, तर काही राशींसाठी खडतर असणार आहे. ऑक्टोबर महिन्याचा नवीन आठवडा तुमच्यासाठी कसा असेल? तुमचा व्यवसाय, करिअर, आरोग्य आणि लव्ह लाईफ या काळात कशी असेल? तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ आणि मीन या 6 राशींचे साप्ताहिक राशीभविष्य (Weekly Horoscope) जाणून घ्या.
तूळ रास (Libra Weekly Horoscope)
तूळ राशीच्या लोकांसाठी नवीन आठवडा यशाचा असेल. या आठवड्यात तुम्ही काही नवीन कामात गुंतवणूक करू शकता. तुम्ही स्वत:कडे लक्ष दिलं पाहिजे, नवीन आठवड्यात खरेदीचे योग आहेत. तुमचं व्यक्तिमत्व सुधारण्यासाठी थोडा वेळ दिला पाहिजे. या आठवड्यात तुम्ही व्यवसायात जास्त लक्ष देऊ शकणार नाही.
वृश्चिक रास (Scorpio Weekly Horoscope)
वृश्चिक राशीच्या लोकांना या आठवड्यात कोणतीही चिंता करण्याची गरज नाही. तुम्हाला सर्व तणावातून आराम मिळेल. तुमचे तुमच्या भावांसोबत चांगले संबंध राहतील. लग्नासाठी काही प्रस्ताव येऊ शकतात. व्यवसायात छोट्या छोट्या गोष्टींकडे लक्ष द्या. जर तुम्हाला नोकरी बदलायची असेल तर तुम्हाला या आठवड्यात चांगली बातमी मिळेल.
धनु रास (Sagittarius Weekly Horoscope)
सुरू होणारा नवीन आठवडा धनु राशीच्या लोकांसाठी लाभदायी ठरेल. तुमची सर्व स्वप्नं लवकरच पूर्ण होतील. तुम्ही वेळेचं महत्त्व ओळखलं पाहिजे. योग्य वेळी योग्य काम न केल्याने तुमचं नुकसान होईल. थोडा धीर धरा, सर्व काही ठीक होईल. वाहन चालवताना काळजी घ्या.
मकर रास (Capricorn Weekly Horoscope)
मकर राशीच्या लोकांना नवीन लोक भेटू शकतात, नवीन ओळखी होऊ शकतात. या आठवड्यात तुमची एखादी इच्छा पूर्ण होऊ शकते, कोणताही महत्त्वाचा निर्णय घेताना अनुभवी व्यक्तीचा सल्ला घ्या. जर तुम्ही एखाद्या कंपनीत नोकरीसाठी अर्ज केला असेल तर तुम्हाला यश मिळेल. वाहन चालवताना काळजी घ्या.
कुंभ रास (Aquarius Weekly Horoscope)
कुंभ राशीच्या लोकांसाठी नवीन आठवडा उत्तम राहील. या काळात तरुणांनी निष्काळजीपणाने वागू नये. वाहन जपून चालवा, अपघाताची शक्यता आहे. व्यावसायिकांनी आपला वेळ प्रभावशाली आणि अनुभवी लोकांशी संबंध दृढ करण्यात घालवावा. तुम्ही तुमच्या आरोग्याची चांगली काळजी घ्यावी.
मीन रास (Pisces Weekly Horoscope)
नवीन आठवड्यात मीन राशीच्या लोकांना चांगल्या बातम्या मिळतील. तुम्ही एखाद्या गोष्टीबद्दल फार आनंदी व्हाल. प्रत्येक अद्भूत संधीचा लाभ घेण्यासाठी पुढे राहा. या आठवड्यात तुम्ही एखादी मोठी खरेदी करू शकता. व्यवसायावर बारकाईने लक्ष ठेवा, तुमच्या पाठीमागे काही चूक होऊ शकते. आरोग्याची काळजी घ्या.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा: