Leo Weekly Horoscope 19 To 25 August 2024 : राशीभविष्यानुसार, सिंह राशीसाठी ऑगस्ट महिन्याचा चौथा आठवडा आर्थिकदृष्ट्या चांगला असेल. तुमची लव्ह लाईफ देखील या आठवड्यात चांगली असेल. या आठवड्यात तुमचे उत्पन्न स्रोत वाढतील. एकूणच सिंह राशीच्या लोकांसाठी हा आठवडा व्यवसाय, आरोग्य, नातेसंबंध आणि प्रेमासाठी किती खास असणार आहे? सिंह राशीचे साप्ताहिक राशीभविष्य (Weekly Horoscope) जाणून घ्या.
सिंह राशीची लव्ह लाईफ (Leo Love Horoscope)
सिंह राशीच्या लोकांसाठी नवीन आठवडा चांगला असणार आहे. या आठवड्यात जोडीदाराबरोबर तुमचे संबंध चांगले असतील. तुमच्या प्रेमात भरपूर रोमान्स असेल. तसेच, पार्टनरबरोबर तुम्ही खूप छान संवाद साधाल. आनंदी आयुष्य जगाल. आठवड्याच्या शेवटी नात्यात तिसऱ्या व्यक्तीच्या हस्तक्षेपामुळे दुरावा निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे संवादाने समस्येवर मार्ग काढण्याचा प्रयत्न करा.
सिंह राशीचे करिअर (Leo Career Horoscope)
सिंह राशीच्या लोकांसाठी नवीन आठवडा करिअरच्या बाबतीत खास असणार आहे. या दरम्यान तुम्हाला प्रमोशनची संधी मिळू शकते. तसेच, कामाच्या ठिकाणी तुमच्यावर नवीन जबाबदाऱ्या सोपवल्या जाऊ शकतात. या आठवड्यात तुम्हाला नवीन प्रोजेक्टवर काम करण्याची संधी मिळेल. तुम्हाला तुमच्या मित्राच्या सहकार्याने तुमची सगळी कामे पूर्ण होतील. नोकरीच्या नवीन संधी मिळतील. मात्र, तुम्ही प्रामाणिकपणे काम करणं गरजेचं आहे.
सिंह राशीची आर्थिक स्थिती (Leo Wealth Horoscope)
नवीन आठवड्यात तुमच्या आर्थिक स्थितीत काहीसे चढ-उतार पाहायला मिळू शकतात. तुमच्या उत्पन्नात चांगली वाढ होऊ शकते. पण वेळीच तुम्ही तुमच्या खर्चावर नियंत्रण ठेवणं गरजेचं आहे. तसेच, नोकरदार वर्गासाठी नोकरीच्या अनेक संधी या काळात उपलब्ध होतील. जर तुम्ही गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर त्यातून तुम्हाला चांगला परतावा मिळेल.
सिंह राशीचे आरोग्य (Leo Health Horoscope)
नवीन आठवड्यात तुम्हाला छोट्या-मोठ्या आरोग्याच्या तक्रारी भासू शकतात. वातावरणातील बदलांमुळे तुम्हाला ताप, सर्दी आणि खोकला देखील जाणवू शकत. मात्र, वेळीच याकडे वेळीच तुम्ही लक्ष दिलं नाही तर तुमचा आजार वाढण्याची शक्यता आहे.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा :