Supriya sule : नवाब मलिक ( Nawab Malik) आमच्यासोबत नाहीत याचं मला दु:ख असल्याचे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे (MP Supriya sule) यांनी केलं. भाजपचे लोक ज्यावेळी मलिक यांच्याविरोधात विरोधात बोलत होते, त्यावेळी मी मलिक यांच्या बाजूने बोलत होते असे सुळे म्हणाल्या. कारण मला कोणाचीही भीती नव्हती असे सुळे म्हणाल्या. नवाब मलिक यांच्यावर भाजपने टोकाचे आरोप केले होते. देवेंद्र फडणवीसांनी अजित पवार यांना पत्र लिहत नवाब मलिक आघाडीत चालणार नाहीत असे म्हणाले होते. सोयीप्रमाणे नाते जोडायचे आणि सोयीप्रमाणे तोडायची हे भाजपचे संस्कार असल्याचे सुळे म्हणाल्या. धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा इथं सुप्रिया सुळे यांच्या उपस्थितीत महिला मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी त्या बोलत होत्या.
आशा वर्कर महिलांसाठी सुप्रिया सुळे करणार आंदोलन
पहिला भाजप सुसंस्कृत होता. आता नवीन भाजपने गलिच्छ राजकरण केलं असल्याचे सुळे म्हणाल्या. महाराष्ट्र संविधानाने चालतो, कोणाच्याही मनमानीने चालत नाही. सत्ता. पैसा पद या गोष्टी येतात आणि जातात. शेतकऱ्यांच्या पिकांना हमीभाव द्यावा, आशा स्वयंसेवक महिलांना पाच हजार देतो म्हणाले होते, अद्याप त्यांना पैसे दिले नाहीत. येत्या पाच दिवसात जर आशा वर्कर महिलांना पाच हजार रुपये मिळाले नाहीत तर मी आंदोलन करणार असल्याचे सुप्रिया सुळे म्हणाल्या. त्यामुळं आता सरकार यावर काय भूमिका घेणार हे पाहणं देखील महत्वाचं ठरणार आहे.
हे सरकार 50 खोके घेऊन तयार झालंय
हे सरकार खोक्यांचे आहे. 50 खोके घेऊन हे सरकार तयार झाले आहे. ते पैशाने विकले गेले असतील. पण महाराष्ट्रातील जनता स्वाभिमानी असल्याचे सुळे म्हणाल्या. मी माझं काम पारदर्शकपणे लोकांसमोर ठेवलं. आपल्याकडे ईडी सीबीआय असली भानगड नाही असे सुळे म्हणाल्या. या सरकारनं लाडकी बहिण योजनेच्या जाहीरतीसाठी 200 कोटी रुपये खर्च केल्याचे सुळे म्हणाल्या. राज्यातलं सरकार हे स्वार्थी सरकार असल्याचे सुळे म्हणाल्या. महाविकास आघाडीचं सरकार आल्यावर तुमचा पाण्याचा प्रश्न सोडवू असे आश्वासन सुळे यांनी दिले. आपल्या राज्यात आलेला रोजगार दुसऱ्या राज्यात नेला जातो. आपल्या राज्यातील उद्योग व्यवसाय हे परराज्यात जात असल्याचे सुळे म्हणाल्या.
महत्वाच्या बातम्या:
भावासोबत गेले असते तर केंद्रात मंत्री झाले असते, सत्तेपेक्षा स्वाभिमान जास्त महत्वाचा, अजित पवारांच्या निर्णयावर काय म्हणाल्या सुप्रिया सुळे