(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Leo Monthly Horoscope July 2023 : सिंह राशीच्या लोकांना आव्हानांचा सामना करावा लागू शकतो; जुलै राशीभविष्य जाणून घ्या
Leo Monthly Horoscope July 2023 : जुलै महिन्यात ग्रहांच्या परिवर्तनाचा सिंह राशीच्या लोकांवर कसा परिणाम होईल? मासिक राशीभविष्य जाणून घ्या.
Leo Monthly Horoscope July 2023 : जुलैमध्ये सिंह राशीच्या लोकांनाही खूप काळजी घ्यावी लागेल. या महिन्यात तुम्हाला तुमच्या रागावर आणि वाणीवर संयम ठेवावा लागेल, अन्यथा यामुळे तुमचे मोठे नुकसान होऊ शकते. तुमची लोकांशी भांडणे वाढतील आणि यामुळे तुमची बरीच कामे रखडतील. या महिन्यात रागाच्या भरात कोणतेही काम करू नका. एकूणच शिक्षण, प्रवास, आरोग्य, प्रेम आणि कुटुंबाच्या बाबतीत सिंह राशीच्या लोकांसाठी जुलै महिना कसा असेल ते जाणून घेऊयात.
जुलैमध्ये सिंह राशीच्या लोकांच्या वैवाहिक जीवनावरही परिणाम होऊ शकतो. जोडीदाराबरोबर वादाची परिस्थिती निर्माण होऊ शकते, ज्याचा तुमच्या नात्यावर वाईट परिणाम होईल. याचा तुमच्या आरोग्यावरही परिणाम होईल. या महिन्यात तुम्हाला शारीरिक आणि मानसिक त्रास होईल.
ग्रहांचे सिंह राशी परिवर्तन
1 जुलैपासून ग्रहात मंगळाची दृष्टी असल्याने लघु व्यवसाय, लघुउद्योग करणाऱ्यांसाठी हा महिना अनुकूल असणार आहे. सप्तम घरात शश योग असल्या कारणाने उद्योजकांसाठी हा महिना महत्त्वाचा ठरणार आहे. 6 जुलैपर्यंत सप्तम घरातून शुक्राचा षडाष्टक दोष राहील, त्यामुळे जुलैमध्ये व्यवसायात कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ञांचा सल्ला घ्या.
सिंह राशीचे करिअर कसे असेल?
1 जुलैपासून मंगळाचा दशम घराशी 4-10 संबंध असेल, त्यामुळे व्यवसायात तुम्ही समाधानी असाल. वरिष्ठ अधिकाऱ्यांचं सहकार्य तुमच्याबरोबर असेल. 6 जुलैपर्यंत शुक्राचा दशम घराशी 3-11 राशीचा संबंध राहील, त्यामुळे बेरोजगार व्यक्तींना या महिन्यात चांगल्या ठिकाणी नोकरी मिळाल्याने अपेक्षेपेक्षा चांगले परिणाम मिळतील.
सिंह राशीचे वैवाहिक आणि प्रेम संबंध कसे असतील?
जर तुम्ही पूर्वी कोणाशी प्रेमसंबंधात असाल, परंतु आता त्यांच्याशी संभाषण थांबले असेल, तर या महिन्यात तुम्ही पुन्हा त्यांच्या संपर्कात याल, ज्यामुळे जुन्या आठवणी ताज्या होतील. जर तुमचे आधीपासून कोणाशी प्रेमसंबंध असतील तर नात्याबाबत काळजी घ्या.
सिंह राशीचे करिअर कसे असेल?
शनीचा षडाष्टक दोष बाराव्या घरातून असल्यामुळे जर तुम्हाला परदेशात शिक्षण घ्यायचे असेल तर या महिन्यात जाणं योग्य ठरणार नाही. 7 जुलैपासून शुक्राच्या पंचम घरातून नववा-पंचम राजयोग असेल, त्यामुळे तुम्ही फोटोग्राफी, कॅलिग्राफी, चित्रकला यांसारख्या आवडींवर लक्ष केंद्रित करून स्वत:साठी नोकरीचा मार्ग खुला करू शकतात.
सिंह राशीच्या लोकांची आरोग्य स्थिती
या महिन्यात मुलांच्या आरोग्याकडे विशेष लक्ष द्या. तसेच, वाहन चालवताना अत्यंत सावध होऊन चालवा. अनावश्यक प्रवास करणे टाळा.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
महत्त्वाच्या बातम्या :