एक्स्प्लोर

Leo Monthly Horoscope (1 एप्रिल ते 30 एप्रिल): भावनिकदृष्ट्या मजबूत राहाल, तर मिळेल मोठे यश! कसा असेल सिंह राशीसाठी संपूर्ण महिना?

सिंह राशीच्या लोकांसाठी एप्रिल महिना कसा राहील? जाणून घेऊया सिंह राशीचे मासिक राशिभविष्य...

Leo Monthly Horoscope : सिंह राशीच्या लोकांसाठी एप्रिल महिना मानसिकदृष्ट्या आव्हानात्मक असणार आहे. शत्रू सक्रिय होऊ शकतात, म्हणून तुम्हाला खूप सक्रिय राहण्याचा सल्ला दिला जातो. या महिन्यात इतरांवर कमी विश्वास ठेवावा. कार्य कोणतेही असो, ते कितीही सोपे असले तरी ते स्वतः पूर्ण करण्याचा प्रयत्न करा. महिन्याच्या सुरुवातीला प्रतिस्पर्ध्याशी वाद होण्याची शक्यता आहे. तुमच्यावर एखादा खटला सुरू असल्यास, या महिन्यात त्याची गती चांगली राहील, वकिलाच्या संपर्कात राहा. थोड्याशाही निष्काळजीपणामुळे बाजू कमकुवत होऊ शकते. भावनिकदृष्ट्या मजबूत रहा. तुमच्या प्रबळ इच्छाशक्तीच्या जोरावर तुम्हाला मोठे यश मिळू शकते. प्रत्येकजण आपल्या युक्तीची प्रशंसा करेल.

आर्थिक आणि करिअर : या महिन्यात कामात आळस करू नका. तुम्ही नवीन नोकरीच्या शोधात असाल किंवा बदलू इच्छित असाल, तर हा महिना अनुकूल आहे. सरकारी नोकरी करणाऱ्या लोकांना महत्त्वाचे पद मिळू शकते. नवीन नोकरी शोधणाऱ्यांसाठी महिना चांगला राहील. धावत्या बैठका सुरु राहतील आणि अशा बैठकांमध्ये तुम्हाला महत्त्वाची भूमिका बजावायची आहे, तसंच स्वतःला खूप छान प्रेझेंट करायचं आहे. व्यवसाय क्षेत्रात इतर व्यवसाय करणारे लोक, जे तुमचे मुख्य प्रतिस्पर्धी आहेत, ते या महिन्यात कठीण आव्हान देऊ शकतात, अशा परिस्थितीत तुम्हीही खंबीरपणे स्पर्धा करावी. वस्तूंच्या गुणवत्तेशी तडजोड करू नये, ग्राहकांची मागणी लक्षात घेऊनच तुम्ही नफा मिळवू शकता. महिन्याच्या अखेरीस तुम्ही सुटकेचा नि:श्वास टाकाल की, तुमच्या मेहनतीला यश आले आहे.

आरोग्य : यावेळी महिलांना तब्येतीची अधिक काळजी घ्यावी लागेल. कामामुळे चालायला वेळ मिळत नसेल, किंवा शरीराला पुरेसा सूर्यप्रकाश मिळत नसेल, तर त्यासाठी वेळ काढा. अन्यथा, शरीराला कॅल्शियम आणि D3 ची कमतरता भासू शकते. महिन्याच्या मध्यभागी, आहारात हंगामी फळे अधिक प्रमाणात खावीत, स्प्राऊट्स खाणे देखील फायदेशीर ठरेल. आहाराच्या गडबडीमुळे तुम्हाला पोटाचे आजार होऊ शकतात. रात्रीच्या वेळी शक्यतो पचनास हलके पदार्थ खा. आहारात सॅलडचे सेवन वाढवा, त्याने फायदा होईल.

कुटुंब आणि समाज : महिन्याच्या सुरुवातीला कुटुंब आणि समाजाबाबत धार्मिक कार्यक्रमाचे नियोजन करता येईल. पाहुणेही येतील, त्यामुळे त्यांच्या पाहुणचारात कुठेही कमतरता राहणार नाही, याची काळजी घेतली पाहिजे. घरातील मोठ्यांसोबत वेळ घालवा, त्यांच्या गरजांचीही काळजी घ्या. वडिलांकडून नोकरीशी संबंधित लाभ मिळण्याची शक्यता आहे. मूलं कोणत्याही स्पर्धेची तयारी करत असतील, तर त्यांना प्रोत्साहन द्या, त्यांच्या समस्येवर उपाय शोधून द्या. या राशीच्या अविवाहित लोकांचे लग्न जुळण्याची दाट शक्यता आहे.

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

हेही वाचा :

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha

महत्त्वाच्या बातम्या

Raksha Bandhan 2026 : रक्षाबंधनच्या दिवशी चुकूनही 'या' 7 चुका करु नका; अन्यथा नात्यात येईल कायमचा दुरावा, वाचा नियम
रक्षाबंधनच्या दिवशी चुकूनही 'या' 7 चुका करु नका; अन्यथा नात्यात येईल कायमचा दुरावा, वाचा नियम
Baba Venga Prediction 2026 : बाबा वेंगाची भविष्यवाणी! मेष, वृषभसह 'या' 5 राशींना ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यात लागणार लॉटरी; श्रीमंतीचे योग, वाचा लकी राशी
बाबा वेंगाची भविष्यवाणी! मेष, वृषभसह 'या' 5 राशींना ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यात लागणार लॉटरी; श्रीमंतीचे योग, वाचा लकी राशी
Horoscope Today 22 August 2026 : आज शनिवारचा दिवस 5 राशींसाठी चक्रावणारा, शनिदेव दिवस संपण्याआधीच देणार कर्माचं फळ; वाचा तुमचे आजचे राशीभविष्य
आज शनिवारचा दिवस 5 राशींसाठी चक्रावणारा, शनिदेव दिवस संपण्याआधीच देणार कर्माचं फळ; वाचा तुमचे आजचे राशीभविष्य
Horoscope Today 22 August 2026: आजचा श्रावणी शनिवार 7 राशींसाठी भाग्याचा! अद्भूत शुभ योग जुळले, शनिकृपेने कोण भाग्यशाली? आजचे राशीभविष्य वाचा...
आजचा श्रावणी शनिवार 7 राशींसाठी भाग्याचा! अद्भूत शुभ योग जुळले, शनिकृपेने कोण भाग्यशाली? आजचे राशीभविष्य वाचा...

व्हिडीओ

Abhijeet Dipke On School : शाळेत धडक, नियम किती कडक? | Special Report ABP Majha
Prithviraj Chavan On NCP : पृथ्वीराज चव्हाणांचा दावा, तापली राजकीय हवा | Special Report ABP Majha
Anganwadi Sevika : पोषण आहाराचं वास्तव, अन्याय कारवाईचा विस्तव | Special Report ABP Majha
Vishakha Raut BMC : नगरसेवक पद धोक्यात, कुणबी प्रमाणपत्र रद्द; विखाशा राऊत काय म्हणाल्या? | ABP Majha Marathi News
Laxman Hake Pune : 1 सप्टेंबरला ओबीसींना मुंबईत येण्याचं आवाहन, सरकारने फसवलंय म्हणत हाकेंचा हल्लाबोल!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra Epstein Files Movie Teaser: अनामिका कापली, कारच्या डिक्कीत नोटांच्या गड्ड्या, पाठमोरा अशोक खरात; 'महाराष्ट्र एपस्टीन फाईल्स'चा दूसरा टीझर रिलीज, पाहा VIDEO
अनामिका कापली, कारच्या डिक्कीत नोटांच्या गड्ड्या, पाठमोरा अशोक खरात; 'महाराष्ट्र एपस्टीन फाईल्स'चा दूसरा टीझर रिलीज, पाहा VIDEO
Chhatrapati Sambhaji Nagar Boy Jumps Down From Mountain: डोंगरावरुन उडी मारणाऱ्या मुलाचं मनपरिवर्तन झालेलं, वडील अचानक आले समजलचं नाही...; पोलिसांनी सांगितली चक्रावून टाकणारी माहिती
डोंगरावरुन उडी मारणाऱ्या मुलाचं मनपरिवर्तन झालेलं, वडील अचानक आले समजलचं नाही...; पोलिसांनी सांगितली चक्रावून टाकणारी माहिती
Swati Khanna : लंडनमध्ये शिक्षण, दिल्ली हायकोर्टात वकिली, राहुल गांधींसोबत संसदमार्ग पोलीस ठाण्यासमोर ठिय्या, कोण आहेत स्वाती खन्ना?
 राहुल गांधी आणि साहिलसोबत ठिय्या आंदोलनात दिवसभर उपस्थिती, वकील स्वाती खन्ना कोण आहेत?
ISRO कडून ऑर्डर मिळताच संरक्षण आणि एरोस्पेस पेनी स्टॉकला अप्पर सर्किट, जाणून घ्या
ISRO कडून ऑर्डर मिळताच संरक्षण आणि एरोस्पेस पेनी स्टॉकला अप्पर सर्किट, जाणून घ्या
PM Awas Yojana Beneficiary List 2026 : पीएम आवास योजना ग्रामीण घरकुल यादीमध्ये नाव कसं चेक करायचं? 
PM Awas Yojana Beneficiary List 2026 : पीएम आवास योजना ग्रामीण घरकुल यादीमध्ये नाव कसं चेक करायचं? 
Rahul Gandhi : साहिलच्या शरीरात छर्रे, आठ तासानंतर एफआयआर दाखल, गृहसचिव आणि अमित शाह यांना अंतिम परवानगी द्यावी लागली, राहुल गांधी यांचा दावा
साहिल लोचब याच्यासोबत आठ तास ठिय्या, एफआयआर दाखल होताच राहुल गांधी म्हणाले, न्यायाच्या दिशेनं पहिलं पाऊल
Nashik Road Issue : नाशिकमध्ये रस्ता खचला, खडीनं भरलेला डंपर रस्त्यामध्येच अडकला, रस्त्यांच्या दर्जाचा प्रश्न ऐरणीवर, पाहा Video
नाशिकमध्ये रस्ता खचला, खडीनं भरलेला डंपर रस्त्यामध्येच अडकला, Video व्हायरल
Tarique Rahman India Visit: बांगलादेशच्या पंतप्रधानांच्या भारत दौऱ्यावरून 'गोंधळ', राष्ट्रपती भवनाने अवघ्या तासाभरातच स्वागत संदेश मागे घेतला!
बांगलादेशच्या पंतप्रधानांच्या भारत दौऱ्यावरून 'गोंधळ', राष्ट्रपती भवनाने अवघ्या तासाभरातच स्वागत संदेश मागे घेतला!
Embed widget