Leo Horoscope Today 29 May 2023 : सिंह राशीच्या लोकांना आज शत्रूवर विजय मिळवता येणार, फक्त 'हे' काम करू नका; आजचं राशीभविष्य
Leo Horoscope Today 29 May 2023 : आज तुमच्या प्रयत्नांना यश मिळत असून, उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होतील.
Leo Horoscope Today 29 May 2023 : सिंह राशीच्या (Leo Horoscope) लोकांसाठी आजचा दिवस चांगला आहे. आज तुम्हाला प्रत्येक कामात यश मिळेल, ज्यामुळे तुम्ही खूप आनंदी दिसाल. तुम्हाला स्वतःला खूप उत्साही वाटेल. तुम्ही तुमच्या दैनंदिन दिनचर्येत मॉर्निंग वॉक, योग आणि ध्यान यांचा समावेश करा. वडिलांचे पूर्ण सहकार्य मिळेल. तुम्ही तुमचे विचार तुमच्या वडिलांशी शेअर करा. आर्थिक सुखात वाढ होईल. व्यापाऱ्यांच्या व्यवसायात वाढ होईल. तुम्ही तुमच्या मित्रांबरोबर (Friend) नवीन व्यवसाय सुरू करण्याचा विचारही करू शकता. घरातून बाहेर पडताना ज्येष्ठांच्या चरणस्पर्श करून आशीर्वाद घेतल्यास सर्व कामे पूर्ण होतील. घरातील कलह संपुष्टात येतील. घरोघरी शुभ कार्यक्रम आयोजित केले जातील. या निमित्ताने सर्व लोकांची ये-जा सुरू राहील. तुम्हाला परदेशात राहणाऱ्या नातेवाईकांकडून काही चांगली बातमी ऐकायला मिळेल, ज्यामुळे तुमचे मन खूप आनंदी असेल.
बोलण्यात गोडवा ठेवा
सिंह राशीच्या (Leo Horoscope) लोकांचा समाजात मान-सन्मान वाढेल. जास्त मोबाईल किंवा लॅपटॉप पाहणे टाळा, अन्यथा डोळ्यांवर परिणाम होण्याची शक्यता आहे. वाहन चालवताना काळजी घ्या, आज तुमच्या प्रयत्नांना यश मिळत असून, उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होतील.
कुटुंबात शुभ कार्यक्रम आयोजित केले जातील. सर्व नातेवाईकांची घरी ये-जा सुरु असेल. यामध्ये तुम्हाला तुमच्या बोलण्यातला गोडवा कायम ठेवावा लागेल. नाहीतर तुमचे संबंध बिघडू शकतात. नोकरदार वर्गाचे कामातील ताणतणाव कमी होतील. आर्थिक बाबतीत कोणाकडून उधारी घेणं टाळा. जर तुमच्या कुटुंबात काही मतभेद असतील तर ते आज संपुष्टात येतील.
आजचे सिंह राशीचे आरोग्य
आज सिंह राशीचे आरोग्य चांगले राहील. पण, कामाच्या ताणामुळे काही काळ विश्रांती घ्यावीशी वाटेल.
सिंह राशीसाठी आजचे उपाय
उद्या उगवत्या सूर्याला जल अर्पण करा. शिवलिंगावर बेलपत्र अर्पण केल्यानंतर दिवा लावा आणि ओम नमः शिवाय मंत्राचा जप करा.
सिंह राशीच्या लोकांसाठी आजचा शुभ रंग
सिंह राशीच्या लोकांसाठी आजचा शुभ रंग हिरवा आहे. तर, सिंह राशीसाठी आजचा लकी नंबर 4 आहे.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
महत्त्वाच्या बातम्या :