(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Leo Horoscope Today 15 June 2023 : आज तुमची रखडलेली कामे पूर्ण होतील; सिंह राशीसाठी आजचा दिवस चांगला
Leo Horoscope Today 15 June 2023 : व्यवसाय करणाऱ्या लोकांसाठी आजचा दिवस शुभ आहे. राजकारणात नवीन अधिकारी भेटतील.
Leo Horoscope Today 15 June 2023 : सिंह राशीच्या (Leo Horoscope) लोकांसाठी आजचा दिवस चांगला आहे. आज तुमच्या ओळखीच्या व्यक्तीच्या मदतीने रखडलेली कामे पूर्ण कराल. तुम्हाला तुमची कोणतीही मालमत्ता विकायची असेल तर तीही उद्या चांगल्या भावात विकता येईल. नोकरीत प्रगतीच्या संधी मिळतील. वरिष्ठांकडून केलेल्या कामाचे कौतुक ऐकायला मिळेल. कुटुंबातील सर्व सदस्य एकत्र काम करताना दिसतील. वरिष्ठ सदस्यांकडून काही जबाबदाऱ्या तुमच्यावर सोपवण्यात येतील, ज्या तुम्ही पूर्ण करणं गरजेचं आहे. मुलांकडून मान-सन्मान वाढेल. पालकांचा सहवास आणि सहकार्य मिळेल. जोडीदाराचा पूर्ण पाठिंबा मिळेल. उच्च शिक्षणासाठी काळ चांगला आहे. आज तुम्हाला तुमचा जवळचा मित्र भेटेल. त्याच्याबरोबर तुम्ही अनेक गोष्टी शेअर करू शकता. यामुळे तुमचे मन प्रसन्न होईल.
अडचणींवर मात करता येईल
व्यवसाय करणाऱ्या लोकांसाठी आजचा दिवस शुभ आहे. राजकारणात नवीन अधिकारी भेटतील. राजकारणात असलेल्यांसाठी काही सभांना संबोधित करण्याचीही संधी मिळेल. आज तुम्हाला कार्यात वरिष्ठ नेत्यांची साथ मिळेल. आज तुम्ही तुमच्या जोडीदाराला पालकांशीही ओळख करुन देऊ शकता. व्यावसायिक स्तरावर निर्माण झालेल्या अडचणींवर मात करता येईल. तांत्रिक अडचणी कमी होतील. कामातील वेळ वाचेल.
आज कौटुंबिक वातावरण खूप आनंददायी असेल. आज कुटुंबातील सर्व सदस्य कुठेतरी फिरायला जाऊ शकतात. सिंह राशीच्या लोकांचे संबंध सुधारण्यासाठी आजचा दिवस खूप चांगला दिवस आहे. काही जुन्या गोष्टींवर कुटुंबात तणावाची परिस्थिती उद्भवू शकते. तर, काही कारणास्तव कुटुंबातील सदस्यांमध्ये वादही होऊ शकतो. तुमची भाषा आणि वाणीची काळजी घ्या. वाणीत गोडवा आणि रागावर नियंत्रण ठेवा.
आज सिंह राशीसाठी आरोग्य
आज तुमचे आरोग्य चांगले राहील. परंतु, आज तुमच्या कुटुंबातील प्रमुख सदस्यांना आरोग्याच्या तक्रारी भासू शकतात. त्यांच्या तब्येतीची काळजी घ्या.
सिंह राशीसाठी आजचे उपाय
उद्या उगवत्या सूर्याला जल अर्पण करा, असे केल्याने तुम्हाला खूप उत्साही वाटेल.
सिंह राशीच्या लोकांसाठी आजचा शुभ रंग
सिंह राशीच्या लोकांसाठी आजचा शुभ रंग पिवळा आहे. तर, सिंह राशीसाठी आजचा लकी नंबर 4 आहे.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
महत्त्वाच्या बातम्या :