Laxmi Narayan Rajyog : ज्योतिषशास्त्रानुसार सुख, समृद्धी, संपत्ती, आकर्षण आणि प्रेमाचा कारक शुक्र लवकरच कर्क राशीत प्रवेश करणार आहे, जिथे ग्रहांचा राजकुमार बुध आधीच उपस्थित आहे. यामुळे कर्क राशीत बुध आणि शुक्राची युती होईल, ज्यामुळे लक्ष्मी नारायण नावाचा शुभ राजयोग तयार होणार आहे. हा राजयोग सर्वात शुभ मानला जातो. लक्ष्मी नारायण राजयोग तयार झाल्यामुळे काही राशीच्या लोकांना अफाट फायदा होणार आहे. ज्योतिष शास्त्रानुसार, शुक्र 7 जुलै रोजी संध्याकाळी 4:15 वाजता कर्क राशीत प्रवेश करेल आणि या योगाची निर्मिती होईल.


लक्ष्मी नारायण योग 'या' राशींसाठी भाग्याचा


कर्क रास (Cancer)


या काळात राशीच्या लोकांना नशिबाची पूर्ण साथ मिळेल. प्रदीर्घ प्रलंबित काम पूर्ण होतील. यासोबतच तुम्ही तुमच्या कुटुंबासोबत चांगला वेळ घालवाल. लक्ष्मीच्या कृपेने तुम्हाला अनपेक्षित आर्थिक लाभ मिळू शकतात. तुम्हाला तुमच्या मुलांकडूनही काही चांगली बातमी मिळू शकते. जर तुम्ही एखादं वाहन किंवा मालमत्ता खरेदी करण्याचा विचार करत असाल तर हा काळ शुभ ठरेल. शेअर मार्केट आणि सट्टा मार्केटमध्ये पैसे गुंतवणं फायद्याचं ठरेल. आरोग्यही चांगलं राहील, पण आपल्या आहाराची विशेष काळजी घ्या.


मकर रास (Capricorn)


मकर राशीच्या लोकांचा जोडीदारासोबत अनेक दिवसांपासून सुरू असलेला वाद आता संपुष्टात येऊ शकतो. तुम्ही रोमँटिक डेट किंवा सहलीला जाऊ शकता. अविवाहितांना लग्नाचा प्रस्ताव येऊ शकतो. जर आपण लव्ह लाईफबद्दल बोललो, तर तुम्ही लग्नाच्या दिशेने एक पाऊल पुढे टाकण्याचा निर्णय घेऊ शकता. या काळात नशीब तुम्हाला पूर्ण साथ देईल. नोकरदारांनाही भरपूर लाभ मिळण्याची शक्यता आहे. तुमच्या कामाचं कौतुक होईल. व्यवसायिकांसाठी काळ नफ्याचा असेल. या काळात तुमचं आरोग्य चांगलं राहील. तुमचा आत्मविश्वास वाढेल. यासोबतच लक्ष्मी देवीच्या कृपेने उत्पन्नाचे नवे स्रोत उपलब्ध होतील.


मिथुन रास (Gemini)


या राशीच्या लोकांना नशिबाची पूर्ण साथ मिळेल. बरेच दिवस अडकलेले किंवा एखाद्याला दिलेले पैसे परत मिळू शकतात. तुमच्या करिअर क्षेत्रात प्रचंड यशासोबतच तुम्हाला आर्थिक लाभ मिळू शकतो. तुमचा आत्मविश्वास वाढेल. जीवनात सकारात्मकता वाढेल. तुमच्या कुटुंबासोबत चांगला वेळ जाईल, आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत तुम्हाला अनपेक्षित आर्थिक लाभ मिळू शकतो. घर, वाहन किंवा मालमत्ता घेण्याचं तुमचं स्वप्न पूर्ण होऊ शकतं.


(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)  


हेही वाचा :


Vastu Tips : घड्याळ, झाडू आणि... तुमच्या 'या' 5 वस्तू चुकूनही कोणाशी शेअर करू नका; पालटेल जीवनचक्र, लक्ष्मी होईल दूर