Vastu Tips : आपल्या जवळच्या माणसांसोबत सर्व गोष्टी शेअर करण्याची सवय अनेकांना असते. कोणाला काही लागलं तर आपण आपल्या गोष्टी त्यांच्यासोबत शेअर करताना मागे पुढे पाहत नाही. आपल्या शेजाऱ्यांकडे एखादी गोष्ट नसेल तरी कसलीही काचकूच न करता आपल्या घरी ते मागायला येतात. आपण अशावेळी मनमोकळेपणाने मदतही करतो. परंतु वास्तुशास्त्रानुसार (Vastu Shastra), आपल्या घरातील काही गोष्टी या कधीही कोणाशी शेअर करू नये, अन्यथा घरातील लक्ष्मी निघून जाते. असा नेमक्या कोणत्या गोष्टी आहेत, ज्या आपण कधी कोणाला वापरण्यासाठी देऊ नये? जाणून घेऊया.
तुमच्या 'या' 5 गोष्टी कोणालाही वापरायला देऊ नका
स्वयंपाकघरातील वस्तू
घराच्या स्वयंपाकघरात ठेवलेल्या वस्तूंचा संबंध थेट नशिबाशी असतो. जेव्हा आपण या गोष्टी इतर कोणाशी शेअर करतो, त्या वेळी आपल्या घरातून लक्ष्मी निघून जाते. त्यामुळे स्वयंपाकघरात ठेवलेल्या काही खास गोष्टी इतरांना देणं टाळावं. यामध्ये पॅन, चिमटे, चमचे, इ. गोष्टी समाविष्ट आहे. या गोष्टी इतरांनी दिल्याने अन्नपूर्णा रागावते. यासोबतच लक्ष्मीही घरातून निघून जाते, म्हणून स्वयंपाकघरात वापरल्या जाणाऱ्या या गोष्टी कोणाशीही शेअर करू नका.
झाडू
वास्तुशास्त्रानुसार झाडूमध्ये लक्ष्मी वास करते. झाडू घरातील गरिबी दूर करण्यासोबतच घरात सुख, समृद्धी आणि शांति आणण्याचंही काम करतो. त्यामुळे झाडू कोणालाही देऊ नये, कारण झाडूसोबतच देवी लक्ष्मीही त्या व्यक्तीच्या घरी जाते.
पत्नीने वाचवलेले पैसे
घरात पत्नीने वाचवलेले पैसे आयुष्यात येणाऱ्या अनेक समस्यांना तोंड देण्यासाठी उपयोगी पडतात. त्यामुळे ते कोणालाही देऊ नये. कारण असं केल्याने लक्ष्मीचा कोप होतो.
दागिने
वास्तुशास्त्रानुसार, पत्नी, बहिण किंवा आईचे दागिने किंवा कपडे कोणालाही उधार देऊ नयेत. असं केल्याने दागिन्यांसह सुख-समृद्धी, धन आणि ऐश्वर्यही निघून जातं आणि नशीब साथ सोडतं.
घड्याळ
वास्तूनुसार घड्याळाचा संबंध शुभ-अशुभ घटनेशी असतो, म्हणून ते देखील कोणाला देऊ नये. कारण असं केल्याने तुमचं भाग्य त्या व्यक्तीकडे जाऊ शकते. तुमचा चांगला काळ त्या व्यक्तीकडे जाऊ शकतो आणि तुम्हाला कष्ट सोसावे लागू शकतात, अशा स्थितीत तुमच्या व्यावसायिक जीवनावर विपरीत परिणाम होऊ शकतो.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा :