Kumbh Mela 2025: देशात संत-मुनींची संख्या एक कोटींहून अधिक आहे. नागा साधू हे देखील या ऋषी आणि संतांपैकी एक आहेत. नागा साधूंचे जीवन अत्यंत रहस्यमय आहे. नागा साधू वाचूनच तुम्हाला समजेल की याचा अर्थ विवस्त्र, नग्न राहणे असा होतो. त्यांच्या अंगावर धुणीची राख, कपाळावरचा टिळक आणि चेहऱ्यावर अग्नीसारखे तेजस्वी रुप त्यांना इतरांपेक्षा वेगळे बनवते. हे साधू सहसा सामान्य जीवनापासून दूर एकांतात राहतात. तुम्हाला माहीतीय का? पुरुषांप्रमाणेच या देशात महिला नागा साधूही आहेत? ते जरी फार कमी संख्येने दिसत असल्या, तरी त्यांचे नियमही पुरुष नागा साधूंपेक्षा थोडे वेगळे आहेत. आज आपण महिला नागा साधूंबद्दल सविस्तर जाणून घेऊया..
महिला नागा साधू बनणे अत्यंत कठीण?
असं म्हणतात, महिला नागा साधू बनण्यासाठी त्यांना खूप कठीण तपश्चर्या, ध्यान आणि नियमांचे पालन करावे लागते. गुहा, जंगल, पर्वत इत्यादी ठिकाणी राहून त्या ध्यान साधना करतात आणि दिवसभर भगवंताच्या भक्तीत लीन राहतात. संन्यासी बनण्यासाठी त्यांना 6 ते 12 वर्षे कठोर ब्रह्मचर्य नियमांचे पालन करावे लागते. त्यानंतरच त्यांचे गुरू त्याला नागा साधू बनण्याची परवानगी देतात.
महिला नागा साधू बनण्यासाठी 'असे' काम करावे लागते
महिला नागा साधू बनण्यासाठी तिला प्रथम आपले मुंडन करावे लागते, खूप वेदना सहन कराव्या लागतात आणि कठोर तपश्चर्या करावी लागते. त्यांना अवघड वाटेवर चालता येईल की नाही हे चांगलेच पारखले जाते. त्यांना सर्व सांसारिक बंधने तोडावी लागतात. त्यांना जिवंत असताना पिंडदानही करावे लागते. हिंदू धर्मात पिंडदान हे मृत्यूनंतर केले जाते. हे क्वचितच पाहायला मिळतात. मात्र, त्यांनाही पुरुष नागा साधूंइतकाच त्यांनाही मान मिळतो.
महिला नागा साधू विवस्त्र राहतात का?
पुरुषांप्रमाणे महिला नागा साधू नग्न राहत नाहीत. त्यांना कपड्यांशिवाय राहू दिले जात नाही. तर नागा साधू महिला भगव्या रंगाचे कपडे घालतात, ज्याला गंटी म्हणतात. त्यांना फक्त एकच कपडे घालण्याची परवानगी आहे. त्या कपाळावर टिळक लावतात आणि केसात जटा धारण केलेल्या असतात. महिला नागा साधू सामान्यतः आखाड्यांमध्येच राहतात. ते फक्त कुंभमेळ्यातच दिसतात. त्यांचा दिनक्रमही कठीण आहे. सकाळी लवकर उठणे आणि नंतर सकाळी आणि संध्याकाळी पूजा करणे. त्यांचे जेवण साधे आणि कमी असते.
कधीपासून सुरू होणार महाकुंभ?
प्रयागराज, हरिद्वार, उज्जैन आणि नाशिक येथे दर 12 वर्षांनी महाकुंभमेळ्याचे आयोजन केले जाते. मात्र, प्रयागराजमध्ये गंगा, यमुना आणि सरस्वती नद्यांच्या संगमावर होणारा महाकुंभ हा सर्वात भव्य मानला जातो. जगातील सर्वात महत्त्वाच्या धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांपैकी एक असलेला महाकुंभ 13 जानेवारी 2025 रोजी पौष पौर्णिमेच्या दिवशी सुरू होईल. महाकुंभमेळ्यात शाही स्नानाला खूप महत्त्व आहे. वैदिक दिनदर्शिकेनुसार, यंदा पौष पौर्णिमा सोमवार, 13 जानेवारी रोजी पहाटे 5:03 पासून सुरू होईल आणि मंगळवारी, 14 जानेवारी रोजी दुपारी 3:56 पर्यंत सुरू राहील. सनातन धर्मात सूर्योदयापासून तिथीची गणना केली जाते, म्हणून पौष पौर्णिमा हा सण सोमवार, 13 जानेवारी रोजी साजरा केला जाईल.
हेही वाचा>>>
आई-वडिलांच्या कर्माचे फळ मुलांना खरंच भोगावे लागते? काय म्हटलंय शास्त्रात? प्रेमानंद महाराजांनी दिलं आश्चर्यकारक उत्तर!
(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )