Kujketu Yog: ज्योतिषशास्त्रानुसार, 2025 हे वर्ष ग्रहांच्या हालचालीच्या दृष्टीकोनातून अत्यंत महत्त्वाचे आहेत. याचा मानवी जीवनावर मोठा परिणाम होतो. नुकतेच 7 जून रोजी, केतूने मंगळासोबत एक प्राणघातक योग तयार केला आहे. अशा परिस्थितीत, जर तुमची राशी देखील 'या' राशींपैकी एक असेल तर तुम्हाला खूप सावधगिरी बाळगण्याची गरज आहे. सूर्याच्या मालकीच्या सिंह राशीतील दोन भयंकर ग्रह काही राशींसाठी समस्या निर्माण करू शकतात. येणारे 50 दिवस अत्यंत सावधगिरीने घालवावे लागतील. जाणून घ्या..

Continues below advertisement


मंगळाचे सिंह राशीत संक्रमण


ज्योतिषशास्त्रानुसार, 7 जून रोजी, मंगळाने सिंह राशीत संक्रमण केले आहे, जिथे केतू आधीच उपस्थित आहे. अशा परिस्थितीत, मंगळ-केतूचा धोकादायक कुजकेतू योग तयार होत आहे, जो खूप अशुभ मानला जातो. सूर्याचे सिंह राशीतील हे दोन भयंकर ग्रह काही राशींसाठी समस्या निर्माण करू शकतात. येणारे 51 दिवस अत्यंत सावधगिरीने घालवावे लागतील.


मंगळ-केतू युती


ज्योतिषशास्त्रानुसार, सिंह राशीत मंगळ आणि केतूची युती एक भयंकर आणि अशुभ योग निर्माण करत आहे, ज्याला कुजकेतू योग म्हणतात. या योगामुळे मानसिक अशांतता, शारीरिक दुखापत आणि वाद यासारख्या समस्या उद्भवू शकतात.


51 दिवस प्रभाव दिसून येईल


ज्योतिषशास्त्रानुसार, मंगळ 28 जुलैपर्यंत सिंह राशीत राहील आणि या काळात हा योग 51 दिवस राहील. या काळात काही राशींवर त्याचा विशेष प्रभाव दिसून येईल. विशेषतः मेष, सिंह, कन्या आणि मीन राशीसाठी हा काळ काळजीपूर्वक घालवण्याचा आहे.


मेष


ज्योतिषशास्त्रानुसार, मेष राशीच्या लोकांना करिअरमध्ये अडथळे, विरोधकांकडून समस्या आणि मानसिक ताण येऊ शकतो. एखाद्या गोष्टीवरून वाद होऊ शकतो. या काळात नातेसंबंधांबद्दल सावधगिरी बाळगा, गैरसमजांपासून दूर राहा.


सिंह, कन्या आणि मीन


ज्योतिषशास्त्रानुसार, मंगळ-केतूचा हा योग सिंह राशीत तयार होत आहे, त्यामुळे त्याचा प्रभाव या राशीच्या लोकांवर सर्वात जास्त पडेल. दुखापत किंवा रागामुळे वाद होण्याची शक्यता आहे. कन्या राशीच्या लोकांना अवांछित प्रवास, मतभेद आणि मानसिक थकवा येऊ शकतो. आरोग्य आणि नातेसंबंधांबद्दल अधिक काळजी घेण्याची गरज आहे. मीन राशीच्या लोकांना या काळात वाढत्या खर्चापासून, रागामुळे नातेसंबंधांमध्ये कटुता आणि हंगामी आजारांपासून सावधगिरी बाळगावी लागेल. हा अशुभ योग या राशीच्या लोकांचे बजेट बिघडू शकतो आणि त्यांची मानसिक शांती बिघडू शकते. स्वतःवर नियंत्रण ठेवा आणि कोणताही मोठा निर्णय काळजीपूर्वक घ्या.


हेही वाचा :


वटपौर्णिमेच्या दिवशी 'या' रंगाची साडी चुकूनही नेसू नये! सौभाग्यासाठी राशीनुसार निवडा 'हा' रंग, शनिदेवांचा कोप टाळा..


(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)