Vat Purnima 2025: ज्या दिवसाची महिला आतुरतेने वाट पाहत असतात, तो वटपौर्णिमेचा सण अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलाय. यंदा हा सण 10 जूनला साजरा केला जाणार आहे.  हा महिलांसाठी अत्यंत  महत्त्वाचा मानला जातो. हा सण सौभाग्यवती स्त्रियांकडून पतीच्या दीर्घायुष्यासाठी व्रत म्हणून साजरा केला जातो. या दिवशी वडाच्या झाडाची पूजा करून व्रत केलं जातं. वटपौर्णिमा म्हणजे महिलांचा नटण्याचा, साज-श्रृंगार करण्याचा दिवस.. या सणासाठी महिलांची खरेदीसाठी लगबग सुरू झालीय. अशात कोणती साडी नेसायची? रंग कोणता निवडावा? असे अनेक प्रश्न महिलांना पडतात. तर आज आम्ही तुम्हाला ज्योतिषशास्त्रीय दृष्टिकोनातून साडीचा रंग निवडताना काही महत्त्वाच्या गोष्टी सांगणार आहोत. डॉ भूषण ज्योतिर्विद यांनी याबाबत अत्यंत महत्त्वाची माहिती दिलीय. विशेषतः तुमच्या राशीनुसार वटपौर्णिमेच्या दिवशी साडीचा कोणता रंग शुभ राहील हे देखील सांगण्यात आले आहे.

Continues below advertisement


वटपौर्णिमेच्या दिवशी कोणत्या रंगाची साडी टाळावी?


काळा रंग - हा रंग अपशकुनाचा मानला जातो, त्यामुळे व्रत, पूजा आणि धार्मिक कार्यात टाळावा.
गडद राखाडी किंवा निळसर काळसर रंग - हे देखील नैराश्याचे किंवा शनि संबंधीत रंग असल्यामुळे टाळावेत.
फिकट मळकट किंवा अतिशय गडद फिकट रंग (जसे की अशुभ वाटणारे पांढऱ्या राखेसारखे टोन) हेही टाळावेत.


प्रत्येक राशीनुसार वटपौर्णिमेला कोणत्या रंगाची साडी नेसावी? हे ज्योतिषशास्त्राच्या दृष्टीने सांगितले आहे....


मेष (Aries)


मेष राशीच्या स्त्रियांनी वटपौर्णिमेला लाल किंवा केशरी रंगाची साडी नेसावी. हा रंग त्यांच्यासाठी ऊर्जा व शुभतेचे प्रतीक आहे.


वृषभ (Taurus)


वृषभ राशीच्या स्त्रियांसाठी गुलाबी किंवा पांढऱ्या रंगाची साडी शुभ मानली जाते. हा रंग सौंदर्य आणि स्थिरतेचे प्रतीक आहे.


मिथुन (Gemini)


मिथुन राशीच्या स्त्रियांनी हिरव्या किंवा हलक्या पिवळ्या रंगाची साडी परिधान करावी, ज्यामुळे आनंद व उत्साह वाढतो.


कर्क (Cancer)


कर्क राशीच्या स्त्रियांना पांढरी किंवा चंदेरी (सिल्व्हर) रंगाची साडी परिधान करणे शुभ ठरते, कारण हा रंग शांती आणि सौम्यता दर्शवतो.


सिंह (Leo)


सिंह राशीच्या स्त्रियांसाठी केशरी किंवा सोनेरी रंगाची साडी अत्यंत शुभ मानली जाते, कारण हा रंग तेज आणि प्रतिष्ठा दर्शवतो.


कन्या (Virgo)


कन्या राशीच्या स्त्रियांनी फिकट हिरवी किंवा क्रीम रंगाची साडी परिधान करावी, जी त्यांच्यातील सुसूत्रता आणि शुद्धता दर्शवते.


तूळ (Libra)


तूळ राशीच्या स्त्रियांना निळ्या किंवा गुलाबी रंगाची साडी शोभा देईल. हे रंग संतुलन तसेच प्रेमाचे प्रतीक आहेत.


वृश्चिक (Scorpio)


वृश्चिक राशीच्या स्त्रियांनी गडद लाल किंवा माजेंटा रंगाची साडी घालावी, जी त्यांच्यातील उत्कटता आणि दृढ इच्छाशक्ती वाढवते.


धनु (Sagittarius)


धनु राशीच्या स्त्रियांसाठी पिवळा किंवा केशरी रंग अत्यंत शुभ आहे, कारण हा रंग अध्यात्म आणि ज्ञान दर्शवतो.


मकर (Capricorn)


मकर राशीच्या स्त्रियांनी फिकट निळसर हिरवा रंग निवडावा, पण गडद राखाडी किंवा काळसर रंग टाळावा.


कुंभ (Aquarius)


कुंभ राशीच्या स्त्रियांसाठी निळा किंवा जांभळा रंग शुभ मानला जातो, ज्यामुळे आध्यात्मिकता आणि स्थैर्य वाढते.


मीन (Pisces)


मीन राशीच्या स्त्रियांनी पांढरी, गुलाबी किंवा क्रीम रंगाची साडी परिधान करावी, कारण हे रंग भावुकता आणि शुभतेचे प्रतीक आहेत.


काही अतिरिक्त टिप्स -


साडीवर वडाच्या झाडाचे किंवा पारंपरिक नक्षीकामाचे डिझाईन असेल तर शुभ मानले जाते.
कुंकू, फुलं, आणि पारंपरिक दागिने सोबत परिधान केल्यास सौभाग्य वृद्धिंगत होतं.
शुभ मुहूर्तानुसार व्रत करणे अत्यंत महत्वाचे असते.


वटपौर्णिमा तिथी प्रारंभ : 10 जूनला सकाळी 11:35 वाजता वटपौर्णिमेची तिथी सुरु होईल.
वटपौर्णिमा तिथी समाप्ती : 11 जून दुपारी 1:13 मिनिटांनी ही तिथी संपेल.


वटपौर्णिमा शुभ मुहूर्त


वैदिक पंचांगानुसार, वटपौर्णिमेच्या व्रताच्या पूजेसाठी शुभ मुहूर्त सकाळी 11:55 वाजल्यापासून दुपारी 12:51 वाजेपर्यंत आहे. वटपौर्णिमेच्या दिवशी ब्रह्म मुहूर्तापासून पूजा विधीला सुरुवात करणे शुभ मानले जाते. पूजेसाठी सूर्योदयापासून ते दुपारपर्यंतचा वेळ उत्तम आहे.


हेही वाचा :


Weekly Lucky Zodiac Sign: जूनच्या दुसऱ्या आठवड्यात धनलक्ष्मी राजयोगाचे संकेत, 'या' 5 राशी होणार मालामाल! साप्ताहिक भाग्यशाली राशी जाणून घ्या..


(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.