एक्स्प्लोर

Kojagiri Purnima 2023: कोजागिरी पौर्णिमेवर यंदा चंद्रग्रहणाचं सावट; ग्रहणादरम्यान 'या' गोष्टी करणं टाळा

Kojagiri Purnima 2023: यंदा कोजागिरीच्या दिवशीच चंद्रग्रहण होणार आहे, त्यामुळे ग्रहणादरम्यान काही विशेष गोष्टींची काळजी घ्यावी लागणार आहे.

Kojagiri Purnima 2023: धार्मिकदृष्ट्या चंद्रग्रहण (Lunar Eclipse 2023) अत्यंत महत्त्वाचं मानलं जातं. 2023 सालातील शेवटचं चंद्रग्रहण (Lunar Eclipse) लवकरच होणार आहे. चंद्रग्रहणाचा लोकांच्या जीवनावर चांगला आणि वाईट असा दोन्ही पद्धतीने परिणाम होतो. यंदाच्या वर्षीचं शेवटचं 28 ऑक्टोबरला, म्हणजेच कोजागिरी पौर्णिमेच्या (Kojagiri) दिवशी होत आहे.

शरद पौर्णिमेला चंद्रग्रहणाचा योग अवघ्या 30 वर्षांनंतर आल्याचं तज्ज्ञांचं मत आहे. चंद्रग्रहणादरम्यान काही गोष्टी करणं टाळलं पाहिजे, याबद्दल जाणून घेण्याआधी प्रथम चंद्रग्रहणची वेळ जाणून घेऊया.

नेमकं कधी सुरू होणार चंद्रग्रहण?

शनिवारी, म्हणजेच 28 ऑक्टोबरला मध्यरात्री 01:06 वाजता चंद्रग्रहण सुरू होईल आणि 29 ऑक्टोबरला मध्यरात्री 02:22 वाजता समाप्त होईल. 2023 मधील शेवटचं चंद्रग्रहण अश्विन महिन्याच्या शरद पौर्णिमेच्या दिवशी होईल.

चंद्रग्रहणादरम्यानचा सुतक कालावधी

चंद्रग्रहणादरम्यान 28 ऑक्टोबरला दुपारी 3:15 च्या सुमारास सुतक सुरू होईल आणि ग्रहण संपेपर्यंत ते चालू राहील. सुतक काळापासून चंद्रग्रहण होईपर्यंत कोणतंही शुभ कार्य करू नये, असं म्हटलं जातं. ग्रहण काळात नकारात्मक शक्तींचं वर्चस्व सुरू होतं, अशी मान्यता आहे. ज्योतिषशास्त्रात ग्रहण ही अशुभ घटना मानली जाते. 

पंचागानुसार हे ग्रहण 28 आणि 29 ऑक्टोबर या दोन्ही दिवशी होईल. हे ग्रहण भारतात पाहता येणार आहे. 2023 मधील हे दुसरं आणि शेवटचं चंद्रग्रहण असेल. हे चंद्रग्रहण आंशिक ग्रहण आहे.

चंद्रग्रहणादरम्यान या गोष्टींची घ्या विशेष काळजी

  • गरोदर महिलांनी घराबाहेर पडू नये, असं सांगितलं जातं. कारण ग्रहणाचा गर्भातील मुलावर नकारात्मक परिणाम होऊ शकतो.
  • या काळात गर्भवती महिलांनी चंद्रग्रहण पाहू नये आणि घराबाहेर पडू नये.
  • चंद्रग्रहणाच्या वेळी देवाचं ध्यान करा आणि मंत्रांचा जप करा. पण मंदिरात जाऊ नका.
  • चंद्रग्रहणादरम्यान शिळं अन्न खाणं टाळावं.
  • चंद्रग्रहण काळात तुळशीची पानं शिजवलेल्या अन्नात, दूध आणि दही यांसारख्या पदार्थांमध्ये घालावीत.
  • या काळात झाडं आणि झुडपांना हात लावू नये, असं सांगितलं जातं.
  • चंद्रग्रहणाच्या वेळी गर्भवती महिलांनी सोबत नारळ ठेवावा, यामुळे ग्रहणाच्या नकारात्मक प्रभावापासून आई आणि बाळ दोघांचंही संरक्षण होईल आणि नंतर हा नारळ नदीत विसर्जित करा.
  • या काळात गरोदर महिलांनी चुकूनही तीक्ष्ण वस्तूंचा, चाकूचा वापर करू नये.

कोजागिरी पौर्णिमा 2023 चंद्रोदयाची वेळ

शरद पौर्णिमा, म्हणजेच कोजागिरी पौर्णिमेला चंद्रोदय संध्याकाळी 05 वाजून 20 मिनिटांनी होणार आहे.

हेही वाचा:

Kojagiri Purnima 2023: यंदा कोजागिरी पौर्णिमा नेमकी कधी? पाहा तिथी, मुहूर्त आणि पूजा विधी

महत्त्वाच्या बातम्या

Trigrahi Yog 2026 : त्रिग्रही योग झाला 'Active'...17 ऑगस्टपर्यंत 3 राशींच्या पदरात पडणार पुण्य, हातात खेळणार पैसा, नशिबाचे दार उघडणार
त्रिग्रही योग झाला 'Active'...17 ऑगस्टपर्यंत 3 राशींच्या पदरात पडणार पुण्य, हातात खेळणार पैसा, नशिबाचे दार उघडणार
Weekly Horoscope: मिथुन, कर्क राशींना करिअरच्या संधी चालून येतील, ऑगस्टचा दुसरा आठवडा, नवीन ऑफरची शक्यता, साप्ताहिक राशीभविष्य
मिथुन, कर्क राशींना करिअरच्या संधी चालून येतील, ऑगस्टचा दुसरा आठवडा, नवीन ऑफरची शक्यता, साप्ताहिक राशीभविष्य
Weekly Horoscope: मेष, वृषभ राशींचा आर्थिक स्थितीचा आलेख उंचावणार, ऑगस्टचा दुसरा आठवडा, 'हे' सकारात्मक संदेश मिळणार, साप्ताहिक राशीभविष्य
मेष, वृषभ राशींचा आर्थिक स्थितीचा आलेख उंचावणार, ऑगस्टचा दुसरा आठवडा, 'हे' सकारात्मक संदेश मिळणार, साप्ताहिक राशीभविष्य
Hindu Religion: आरती संपल्यानंतर अग्नि वरून हात फिरवून डोळ्यांना का लावतात? धार्मिक मान्यता काय? फार कमी लोकांना माहित...
आरती संपल्यानंतर अग्नि वरून हात फिरवून डोळ्यांना का लावतात? धार्मिक मान्यता काय? फार कमी लोकांना माहित...

व्हिडीओ

Sanjay Raut PC : विधीमंडळ पक्ष फुटला म्हणजे मूळ पक्ष फुटला नाही, कोर्टात व्यक्तिवाद, संजय राऊत UNCUT
Kunbi Certificate Issues Special Report : मराठा आरक्षणाचा पेच वाढला? कुणबी दाखलेच अवैध? | Special Report
Dharashiv News Special Report : धाराशिव जिल्हा परिषदेच्या दोन तास टीव्ही, मोबाईल बंद उपक्रमाला सुरुवात | Special Report
Analogue paneer Special Report : महाराष्ट्रात ॲनालॉग पनीरवर वर्षभराची बंदी, तुकाराम मुंढेंचा तडाखा
Mumbai Mayor Bungalow Special Report : मुंबई महापालिकेचा नव्या टेंडरमुळे वादंग : Ritu Tawade

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
SC-ST आरक्षणात 'क्रिमी लेयर'चे तत्त्व लागू होत नाही, ही संकल्पना केवळ OBC आणि SEBC आरक्षणांना लागू; केंद्र सरकारचे सुप्रीम कोर्टात प्रतिज्ञापत्र
SC-ST आरक्षणात 'क्रिमी लेयर'चे तत्त्व लागू होत नाही, ही संकल्पना केवळ OBC आणि SEBC आरक्षणांना लागू; केंद्र सरकारचे सुप्रीम कोर्टात प्रतिज्ञापत्र
Sushma andhare: तर शिंदेंना फडणवीस भूमिका घेऊ देतील? मग ते फडणवीस कसले? दोघांच्या कोल्ड वॉरमध्ये जीव मात्र गरीब मराठ्यांचा जातोय; सुषमा अंधारेंचा प्रहार
तर शिंदेंना फडणवीस भूमिका घेऊ देतील? मग ते फडणवीस कसले? दोघांच्या कोल्ड वॉरमध्ये जीव मात्र गरीब मराठ्यांचा जातोय; सुषमा अंधारेंचा प्रहार
Mumbai Local Train: मुंबईतील लोकल ट्रेनमध्ये पुरुष प्रवाशाची महिलेला मारहाण, सहप्रवाशी थंडपणे पाहत बसले!
मुंबईतील लोकल ट्रेनमध्ये पुरुष प्रवाशाची महिलेला मारहाण, सहप्रवाशी थंडपणे पाहत बसले!
क्लासेस ठरवणार विद्यार्थ्यांनी कोणत्या कॉलेजमध्ये जायचं? ही कुठची शिक्षण पद्धत? क्लासमध्ये आठ-आठ तास गेल्यानंतर कॉलेजमध्ये अटेंडन्स कसा लागतो? राज ठाकरेंकडून शिक्षणातील धंद्याची चिरफाड
क्लासेस ठरवणार विद्यार्थ्यांनी कोणत्या कॉलेजमध्ये जायचं? ही कुठची शिक्षण पद्धत? क्लासमध्ये आठ-आठ तास गेल्यानंतर कॉलेजमध्ये अटेंडन्स कसा लागतो? राज ठाकरेंकडून शिक्षणातील धंद्याची चिरफाड
Chanakya Niti: तुमच्या घरात शांतता टिकत नाही? घरातील वातावरण बिघडवणारी 5 कारणं, चाणक्यनीती सांगते...
तुमच्या घरात शांतता टिकत नाही? घरातील वातावरण बिघडवणारी 5 कारणं, चाणक्यनीती सांगते...
Delimitation Bill: सगळ्या देशाचं लक्ष जेन झी आंदोलनाच्या यशाकडे अन् इकडे मोदी सरकारची मोहीम फत्ते, लोकसभा मतदारसंघ पुर्नरचनेसाठी दोन तृतीयांश मतांची जुळवाजुळव पूर्ण?
सगळ्या देशाचं लक्ष जेन झी आंदोलनाच्या यशाकडे अन् इकडे मोदी सरकारची मोहीम फत्ते, लोकसभा मतदारसंघ पुर्नरचनेसाठी दोन तृतीयांश मतांची जुळवाजुळव पूर्ण?
Mumbai Pune Expressway Missing Link Accident: मुंबई-पुणे मिसिंग लिंकवर धडकी भरवणारा भीषण अपघात, कार टेम्पोला धडकली, एकाचा मृत्यू, पाहा भयंकर व्हिडीओ
मुंबई-पुणे मिसिंग लिंकवर धडकी भरवणारा भीषण अपघात, कार टेम्पोला धडकली, एकाचा मृत्यू, पाहा भयंकर VIDEO
Raj Thackeray in Nashik press conference: नाशिकच्या कुंभमेळ्यासाठी गुजरातचे कंत्राटदार आणले, प्रत्येकाला फक्त आपापल्या कमिशनशी देणंघेणं; राज ठाकरेंची टीका
नाशिकच्या कुंभमेळ्यासाठी गुजरातचे कंत्राटदार आणले, प्रत्येकाला फक्त आपापल्या कमिशनशी देणंघेणं; राज ठाकरेंची टीका
Embed widget