Ketu Gochar : वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, 2024 हे वर्ष संपायला अजून दोन महिने बाकी आहेत. नोव्हेंबर महिन्यात अनेक मोठ्या ग्रहांचं संक्रमण झालं आहे. त्यामुळे 2025 च्या सुरुवातीलाच अनेक राशींना शुभ-अशुभ परिणाम मिळणार आहेत. तसेच, 10 नोव्हेंबर रोजी केतुने देखील नक्षत्र परिवर्तन केलं आहे. तर, या वर्षाच्या शेवटपर्यंत केतू (Ketu) सूर्याच्या नक्षत्रातच विराजमान असणार आहे. यामुळे अनेक राशींना या काळात लाभ मिळू शकतो. या लकी राशी (Zodiac Signs) कोणत्या आहेत ते जाणून घेऊयात. 


धनु रास (Sagittarius Horoscope)


ज्योतिष शास्त्रानुसार, धनु राशीच्या लोकांसाठी सूर्याच्या नक्षत्रात केतुचं संक्रमण हे शुभ मानलं जाणार आहे. या काळात तुमच्या घरात आनंदी वातावरण पाहायला मिळेल. तसेच, समाजात तुमची पद-प्रतिष्ठा वाढलेली दिसेल. व्यवसायातून तुम्हाला चांगला लाभ मिळेल. तसेच, आर्थिक तंगीपासून तुमची लवकरच सुटका होईल. 


मकर रास (Capricorn Horoscope)


मकर राशीच्या लोकांसाठी सूर्याच्या नक्षत्रात केतुचं हे नक्षत्र परिवर्तन फार लाभदायक असणार आहे. या ाकळात तुमचे अनेक दिवसांपासून जे काम रखडले आहे ते पूर्ण होईल. तसेच, तुमची आर्थिक संपत्ती चांगली असेल. तुमचे आरोग्य देखील एकदम ठणठणीत असेल. त्यामुळे तुम्हाला कोणतीही चिंता करण्याची गरज नाही. या काळात तुम्हाला एखादी शुभवार्ता मिळण्याची शक्यता आहे. व्यवसायासाठी हा काळ चांगला आहे. 


कुंभ रास (Aquarius Horoscope)


सूर्याच्या नक्षत्रात केतुचं संक्रमण हे कुंभ राशीच्या लोकांसाठी फार लाभदायक ठरणार आहे. एखाद्या वादविवादात्मक स्पर्धेत तुम्हाला चांगलं यश मिळेल. तसेच, या काळात तुमची आर्थिक स्थिती मजबूत असेल. कामाच्या निमित्ताने तुम्हाला सतत प्रवास करावा लागू शकतो. अशा वेळी तुमची तब्येत बिघडण्याची शक्यता आहे. त्यामुळे वेळीच तुमच्या आरोग्याची योग्य ती काळजी घेणं गरजेचं आहे. 


(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)


हेही वाचा:


Surya Gochar 2024 : अवघ्या 5 दिवसांत ग्रहांचा राजा सूर्याचा नक्षत्र प्रवेश; 'या' 3 राशींचा सुवर्णकाळ होणार सुरू, जगणार राजासारखं जीवन