Happy Children’s Day: दरवर्षी 14 नोव्हेंबर रोजी देशभरात बालदिन साजरा केला जातो. 14 नोव्हेंबर हा बालदिन म्हणून साजरा करण्यामागे एक खास कारण आहे. हा दिवस देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू (Jawaharlal Nehru Birthday) यांचा जन्मदिन आहे. पंडित नेहरूंचे मुलांवर खूप प्रेम होते, मुलेही त्यांना प्रेमाने चाचा नेहरू म्हणत. त्यामुळे पंडित जवाहरलाल यांची जयंती बालदिन म्हणून साजरी केली जाऊ लागली. बालदिन हा केवळ लहान मुलांसाठीच खास नसतो, तर या दिवशी मोठ्यांनाही त्यांचे बालपण आठवून आनंद मिळतो. बालदिनाच्या या खास गोष्टी, मुलांच्या चेहऱ्यावर हसू आणण्यासाठी, आज आम्ही घेऊन आलो आहोत सुंदर शुभेच्छा संदेश, जे तुम्ही तुमच्या प्रियजनांना पाठवू शकता.. (Children’s Day Wishes In Marathi)

बालदिनानिमित्त पाठवा हटके शुभेच्छा संदेश

जगातील अशा काही गोष्टी आहेत ज्या विकत घेता येत नाही त्यातील एक गोष्ट म्हणजे बालपणबालदिनाच्या हार्दिक शुभेच्छा

खऱ्याखुऱ्या लहानग्यांसोबतचतुम्हा आम्हा प्रत्येकातल्यालहान बाळाला सुद्धाबालदिनाच्या खूप शुभेच्छा!

कागदाची नाव होती,पाण्याचा किनारा होता,मित्रांचा सहारा होता,खेळण्याची मस्ती होती,मन हे वेडे होते,कल्पनेच्या दुनियेत जगत होतो,कुठे आलो या समजूतदारीच्या दुनियेत,या पेक्षा ते भोळे बालपणच सुंदर होते…बालदिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

मुलंही देवाघरची फुलं ते आनंद पसरवतात आणि सुख देतात. त्यांच्यावर भरपूर प्रेम करानाजूक हातांनी सांभाळा Happy Children’s Day

 वयाने मोठे पण मनाने लहान असलेल्याप्रत्येकाला बालदिनाच्या हार्दिक शुभेच्छा…! चला आपल्या जगातील या चिमुकल्यांच्या आनंदासाठी एक सुरक्षित जग बनवूया. बालदिनाच्या शुभेच्छा

मुलंही देवाघरची फुलं ते आनंद पसरवतात आणि सुख देतात. त्यांच्यावर भरपूर प्रेम करानाजूक हातांनी सांभाळा Happy Children’s Day ना सकाळची चिंता होती ना संध्याकाळची,थकून शाळेतून यायचं पण पळत खेळायला जायचं.असं होतं बालपण,बालदिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

बालपणी होते स्वछंद खेळाचे क्षण..बालपणी होते सर्व सुखाचे धन..!!बालपणीच्या आठवणीत हरपते मन..येणार नाहीत कधीच ते सोनेरी क्षण.बालदिनाच्या खूप खूप शुभेच्छा!

आपल्या मुलांना फक्त दोन भेटवस्तू द्यावात एक म्हणजे जबाबदारीची मुळं दुसरं म्हणजे स्वातंत्र्याचे पंख.बालदिनाच्या हार्दिक शुभेच्छा

प्रत्येक गोष्ट विकत घेता येते पण बालपण नाही. बालदिवस आनंदाने साजरा करा मुलांना भरपूर प्रेम द्या. बालदिनाच्या हार्दिक शुभेच्छा

देशाच्या प्रगतीचा आम्ही आहोत आधारआम्ही करू चाचा नेहरूंच स्वप्न साकारबाल दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

एका बालपणीचा काळ जेव्हा होता आनंदाचा खजिना चंद्र मिळवण्याची इच्छा होती, मन फुलपाखरांचं वेडं होतं अशा सुवर्ण काळाच्या बालदिनाच्या शुभेच्छा 

सकाळ नाही, संध्याकाळ नाही चोवीस तास मस्ती आणि काही क्षणांचा अभ्यास होतारम्य असा लहानपणीचा काळ होता बालदिनाच्या हार्दिक शुभेच्छा

मुलं ही जणू देवाची पृथ्वीवरील प्रतिनिधी आहेतत्यांना प्रेमाने घडवा आणि प्रेमाने वागवा बालदिनाच्या खूप खूप शुभेच्छा

जगातला सर्वात खरा काळजगातला सर्वात सुंदर दिवसजो फक्त बालपणातच अनुभवता येतोबालदिनाच्या खूप खूप शुभेच्छा

जेव्हा होते बालपणीचे दिवसजे होते फारच सुंदर नव्हतं नातं उदास क्षणांशीरागाचा तर संबंधच नाहीबालदिनाच्या हार्दिक शुभेच्छा

आज आम्हाला ओरडू नकादिवसभर पाहत होतो ज्याची वाटतो दिवस आला आज बालदिनाच्या हार्दिक शुभेच्छा

चला सोबत येऊन बालदिन साजरा करूयादेशाच्या पुढच्या पिढीला आनंद देऊया बालदिनाच्या हार्दिक शुभेच्छा

हेही वाचा>>>

Winter Travel: दिवाळीच्या सुट्ट्या संपल्यानंतर पुन्हा लॉंग विकेंडची सुट्टी! फिरण्याचा 'असा' कराल प्लॅन, 'ही' ठिकाणं बेस्ट..

(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )