Ketu Gochar 2024 : वैदिक ज्योतिषात केतूला मायावी ग्रह मानलं जातं. हा ग्रह नेहमी उलट दिशेने फिरतो आणि प्रत्येक राशीमध्ये सुमारे 18 महिने राहतो. दरम्यान, वैदिक पंचांगानुसार, केतूने 10 नोव्हेंबरला सूर्याच्या उत्तरा फाल्गुनी नक्षत्रात प्रवेश केला आहे. सूर्य आणि केतूमध्ये खराब संबंध आहेत, त्यामुळे काही राशीच्या लोकांसाठी हा काळ अडचणीचा ठरू शकतो, त्यांच्या अडचणी वाढू शकतात. परंतु काही राशींना केतूच्या नक्षत्र परिवर्तनाचा लाभ मिळू शकतो, आर्थिक स्थिती उंचावू शकते. या भाग्यवान राशी नेमक्या कोणत्या? जाणून घेऊया.


केतू नक्षत्र परिवर्तनामुळे या राशींना सोन्याचे दिवस


वृषभ रास (Taurus)


वृषभ राशीच्या लोकांसाठी हे संक्रमण भाग्याचं ठरू शकतं. या काळात तुम्ही खूप आनंदी असाल. तुमच्या करिअरमध्ये प्रगतीच्या चांगल्या संधी मिळतील. जुन्या कर्जातूनही सुटका होऊ शकते. विद्यार्थ्यांना यश मिळू शकेल. घरामध्ये काही धार्मिक कार्यक्रमाचं आयोजन होऊ शकतं. कुटुंबातील सदस्यांसोबत आनंदाचे क्षण व्यतीत कराल. नोकरीत सहकाऱ्यांचं सहकार्य मिळेल. तब्येतही सुधारेल. कामानिमित्त कुठेतरी सहलीला जाऊ शकता. हा प्रवास तुमच्यासाठी फायद्याचा ठरू शकतो.


सिंह रास (Leo)


सिंह राशीच्या लोकांसाठी केतूचं संक्रमण खूप शुभ ठरेल. या काळात तुम्हाला तुमच्या कामात यश मिळेल. तुमचं ध्येय साध्य करण्यासाठी तुम्ही कठोर परिश्रम कराल. कुटुंबासोबत चांगला वेळ घालवण्याची संधी मिळेल. तुम्ही तुमच्या मनातील विचार तुमच्या भावा-बहिणींसोबत शेअर कराल. आई-वडिलांचा आशीर्वाद घेतल्याने कोणत्याही कामात यश मिळू शकतं. व्यवसायात अल्प लाभाची संधी मिळेल. नवीन संपर्क देखील बनू शकतात, ज्याचा भविष्यात तुम्हाला फायदा होईल. नोकरी करणाऱ्यांना अधिकाऱ्यांकडून पूर्ण सहकार्य मिळेल.


कुंभ रास (Aquarius)


कुंभ राशीच्या लोकांसाठीही केतूचं संक्रमण लकी ठरू शकतं. या काळात तुमचे अडकलेले पैसे मिळू शकतात. आरोग्यही चांगलं राहील. विद्यार्थ्यांना त्यांच्या अभ्यासातील कोणत्याही अडचणीचं समाधान मिळेल. नोकरी किंवा व्यवसायातही लाभ होईल. इतरांना तुमच्या कामाची जाणीव होईल. जोडीदाराच्या आणि तुमच्या नात्यात काही वाद होत असतील तर तुम्ही ते संवादाने संपवू शकता. यावेळी तुमचं नातं अधिक घट्ट होतील.


(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)


हेही वाचा: 


Shani Margi 2024 : तब्बल 30 वर्षांनंतर शनि कुंभ राशीत मार्गी; 3 राशींवर कोसळणार संकटांचा डोंगर, अडचणींचा काळ सुरू