Shani Margi 2024 Negative Impact : ज्योतिष शास्त्रानुसार, 15 नोव्हेंबर 2024 रोजी शनीने (Shani) त्याच्या मूळ त्रिकोण राशीत कुंभ राशीत सरळ चाल चालण्यास सुरुवात केली आहे. म्हणजेच 15 नोव्हेंबरपासून शनि मार्गी झाला आहे. ज्योतिषशास्त्रात शनि हा कर्मानुसार फळ देणारा ग्रह मानला जातो. शनि आपली चाल बदलतो तेव्हा त्याचा परिणाम सर्व 12 राशींवर परिणाम होतो.


परंतु आता शनि कुंभ राशीत सरळ चालीत असल्यामुळे 3 राशींची डोकेदुखी वाढणार आहे, त्यांच्या समोरील अडचणी वाढणार आहेत. त्यांना आर्थिक समस्यांसोबतच मानसिक समस्यांनाही सामोरं जावं लागू शकतं. शनीच्या मार्गीचा कोणत्या राशींवर नकारात्मक (Shani Margi 2024 Negative Impact) प्रभाव पडू शकतो? जाणून घेऊया.


तूळ रास (Libra)


कुंभ राशीतील शनीच्या सरळ चालीमुळे तूळ राशीच्या लोकांना काही समस्यांना सामोरं जावं लागू शकतं. विशेषत: व्यवसायाशी संबंधित लोकांनी 15 नोव्हेंबरनंतर थोडं सावध राहावं. या राशीच्या लोकांवर शनीचा प्रभाव इतका असू शकतो की त्यांच्या कामात पावलोपावली अडथळे येऊ शकतात. तुमच्या योजना इतरांसोबत जास्त शेअर करू नका. या काळात तुमची कुणाकडून तरी फसवणूक होऊ शकते. त्यामुळे प्रत्येक पाऊल विचारपूर्वक उचला. तूळ राशीच्या लोकांनी वाद टाळावेत. छोट्या छोट्या गोष्टींकडे दुर्लक्ष करा. आरोग्याची विशेष काळजी घ्या.


धनु रास (Sagittarius)


शनि प्रत्यक्ष असल्यामुळे धनु राशीच्या लोकांनी आपल्या आर्थिक परिस्थितीकडे लक्ष देणं आवश्यक आहे. 15 नोव्हेंबरपासून तुम्हाला पैशांची कमतरता भासू शकते. त्यामुळे या काळात अनावश्यक खर्च टाळा. यावेळी तुमचं उत्पन्नही कमी होऊ शकतं. या राशीच्या लोकांनी कोणावरही आंधळेपणाने विश्वास ठेवू नये. यावेळी आरोग्याचीही काळजी घ्या. मानसिक तणावामुळे शारीरिक समस्या निर्माण होऊ शकतात. वैवाहिक जीवनात मतभेदाची परिस्थिती निर्माण होऊ शकते, वादावाद होऊ शकते. नोकरी करत असाल तर काळजी घ्यावी लागेल. कर्ज घेणं टाळा.


मीन रास (Pisces)


मीन राशीच्या लोकांना या काळात थोडं सावध राहावं लागेल. कामाच्या ठिकाणी काही आव्हानं उभी राहू शकतात. या काळात तुम्ही तणावाने ग्रस्त असाल. आरोग्याची काळजी घ्या आणि संतुलित आहार घ्या. व्यवसायातही नुकसान होऊ शकतं. जर तुम्ही नवीन व्यवसाय सुरू करण्याचा विचार करत असाल तर तो तूर्तास पुढे ढकला. तुम्हाला आर्थिक अडचणींचा सामना करावा लागू शकतो. अनावश्यक खर्च होऊ शकतो. तुमच्या जोडीदारासोबत काही विषयावर मतभेद होऊ शकतात.


(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)


हेही वाचा: 


Shani Margi 2024 : तब्बल 30 वर्षांनंतर शनीची सरळ चाल; 3 राशींचा सुवर्णकाळ सुरू, धन-संपत्तीत होणार अपार वाढ