Karwa Chauth 2023 Puja Time Live: आज करवा चौथ व्रत, चंद्रोदयाची वेळ आणि पूजेचा शुभ मुहूर्त जाणून घ्या

Karwa Chauth 2023 Puja Muhurta Today Live: आज करवा चौथचा सण साजरा केला जात आहे. या दिवशी विवाहित स्त्रिया आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी उपवास करतात. याबद्दलची पुजेशी संबंधित सर्व माहिती जाणून घ्या.

एबीपी ब्युरो Last Updated: 01 Nov 2023 11:35 AM

पार्श्वभूमी

Karwa Chauth 2023 Puja Live: आज देशभरात करवा चौथचा सण साजरा केला जात आहे. पतीच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करण्यासाठी हे व्रत पाळलं जातं. या व्रताचं पालन केल्याने वैवाहिक जीवन सुखी होतं....More

Karwa Chauth 2023 Niyam: करवा चौथ व्रताचे नियम

हे व्रत सूर्योदयापूर्वी सुरू करून चंद्र उगवण्यापर्यंत चालू ठेवावं. चंद्र पाहिल्यानंतरच हा उपवास मोडतो. चंद्रोदयाच्या 1 तास आधी संध्याकाळी संपूर्ण शिव कुटुंबाची पूजा केली जाते. पूजेच्या वेळी देवतेच्या मूर्तीचं तोंड पश्चिमेकडे आणि स्त्रीने पूर्वेकडे तोंड करून बसावं.