Sharad Pawar on Ajit Pawar : एक दिवस ते माझ्याकडे आले आणि मला म्हणाले आम्ही चालल आहोत, आमच्या सोबत चला. ज्यांच्या विरोधात लोकांनी तुला मतं दिली त्यांच्यासोबत कशासाठी जायचं हाच एक प्रश्न मी त्यांना विचारला होता, यानंतर हसन मुश्रीफ मला कानात येऊन म्हणाले होते आम्ही हा निर्णय घेतला नाही तर तुरुंगात जावं लागेल. ईडीच्या भीतीने आणि तुरुंगात जाऊ लागू नये म्हणून या लोकांनी हा सगळा उद्योग केला असल्याचा घणाघात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी केला. शरद पवार यांची गडहिंग्लजमध्ये समरजितसिंह घाटगे यांच्या प्रचारार्थ सभा झाली. यावेळी बोलताना शरद पवार यांनी अजित पवार गटाचा चांगलाच समाचार घेतला.
हात बरबटलेले असतात, भ्रष्टाचाराने माखलेले असतात त्यांनाच भीती
शरद पवार म्हणाले की, छगन भुजबळ यांनी तर जाहिरपणे सांगितलं, एकदा तुरुंगात जाऊन आलो आहे. आत्ता भाजपसोबत गेलो नसतो तर पुन्हा तुरुंगात जावं लागलं असतं. ज्यांचे हात बरबटलेले असतात भ्रष्टाचाराने माखलेले असतात त्यांनाच अशी भीती असते. माझ्यावरदेखील ईडीकडून कारवाईचा प्रयत्न झाला होता. मात्र, मी स्वतः ईडीकडे गेलो. ज्या बँकेचा सभासद देखील नव्हतो त्या बँकेतील गैरव्यवहाराच्या आरोप माझ्यावर केले गेले. ईडी कार्यालयात येतो म्हटल्यानंतर ईडीनेच माघार घेतली.
हसन मुश्रीफ यांना पाडलंच पाहिजे
ते पुढे म्हणाले की, लोकांनी निवडून दिलेल्याची बांधिलकी न जपता तुम्ही खुशाल निघून गेला. कशात तरी हात गुंतले असतील बरबटलेले असतील तरच अशी भीती वाटते. ईडीच्या भीतीने जे लोक आम्हाला सोडून गेले त्यांच्या फायली भाजपने बाजूला ठेवले आहेत. लोकं निर्लज्जासारखं आम्हाला सोडून गेले. काही लोक मोठ्या तोंडाने सांगत आहेत मी पवारांना सांगून गेलो. आपण झक मारायची आणि दुसऱ्याचं नाव घ्यायचं असा हा प्रकार असल्याची घणाघाती हल्लाबोल त्यांनी केला.
इतर महत्वाच्या बातम्या