एक्स्प्लोर

Karwa Chauth 2023 Date: करवा चौथ आज की उद्या? जाणून घ्या नेमकी तारीख, मुहूर्त आणि व्रत पूजा विधी

Karwa Chauth 2023: विवाहित महिला दरवर्षी करवा चौथ व्रताची आतुरतेने वाट पाहत असतात. यंदा करवा चौथच्या तारखेबाबत संभ्रम आहे. करवा चौथ व्रताची अचूक तारीख, शुभ मुहूर्त आणि चंद्रोदयाची वेळ जाणून घेऊया.

Karwa Chauth 2023: विवाहित स्त्रिया अखंड सौभाग्य प्राप्तीसाठी करवा चौथचं (Karwa Chauth) व्रत करतात. दरवर्षी कार्तिक महिन्याच्या कृष्ण पक्षाच्या चतुर्थी तिथीला करवा चौथचे व्रत केलं जातं. विवाहित महिला करवा चौथच्या व्रताची आतुरतेने वाट पाहत असतात. करवा चौथच्या दिवशी स्त्रिया आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी आणि सुखी वैवाहिक जीवनासाठी निर्जल व्रत करतात.

यावेळी करवा चौथचा उपवास बुधवारी, म्हणजेच 1 नोव्हेंबरला केला जाणार आहे. आश्विन संकष्टी चतुर्थी या दिवशी येते. या व्रतामध्ये भगवान शिव, देवी पार्वती आणि चंद्राची पूजा केली जाते. यावेळी करवा चौथच्या दिवशी अनेक शुभ योगही आहेत. करवा चौथच्या पूजेचा शुभ मुहूर्त आणि चंद्रोदयाची नेमकी वेळ जाणून घेऊया.

करवा चौथ 31 ऑक्टोबरला की 1 नोव्हेंबरला? (Karwa Chauth 31 october or 1 November 2023)

कार्तिक महिन्याच्या कृष्ण पक्षाची चतुर्थी तिथी 31 ऑक्टोबर 2023 ला रात्री 9:30 वाजता सुरू होईल. चतुर्थी तिथीची समाप्ती 1 नोव्हेंबर 2023 ला रात्री 9:19 वाजता होईल.

करवा चौथ व्रत उदयतिथीपासून वैध आहे, म्हणून यावर्षी करवा चौथ 1 नोव्हेंबर 2023, म्हणजेच बुधवारी पाळण्यात येईल.

करवा चौथ 2023 मुहूर्त (Karwa Chauth 2023 Muhurta)

करवा चौथच्या दिवशी महिला संध्याकाळी चौथ माता, करवा माता आणि गणपतीची पूजा करतात आणि चंद्रोदयानंतर चंद्रदेवाला अर्घ्य देतात.

करवा चौथ उपवासाची वेळ - सकाळी 06:36 ते रात्री 08:26 (1 नोव्हेंबर 2023)
करवा चौथ पूजा मुहूर्त - संध्याकाळी 05:44 ते संध्याकाळी 07:02 (1 नोव्हेंबर 2023)
चंद्रोदयाची वेळ - रात्री 08:26 (1 नोव्हेंबर 2023)

करवा चौथ महत्त्व आणि पूजाविधी (Karwa Chauth Significance)

करवा म्हणजे मातीचा घट आणि चौथ म्हणजे चतुर्थी. करवा चौथच्या दिवशी स्त्रिया सूर्योदयापूर्वी उठून सरगी खाऊन उपवास सुरू करतात. त्यानंतर महिला दिवसभर निर्जली व्रत ठेवतात. संध्याकाळी स्त्रिया वधूप्रमाणे तयार होतात आणि 16 श्रृंगार करतात आणि पूजा करतात. त्यानंतर संध्याकाळी चाळणीतून चंद्र पाहून, चंद्राला अर्घ्य देवून नवऱ्याची आरती करतात आणि नवऱ्याच्या हातून पाणी ग्रहण करुन स्त्रिया उपवास सोडतात.

असं मानलं जातं की, देवी पार्वतीने शिव आणि द्रौपदीने पांडवांसाठी करवा चौथ व्रत पाळला होता. करवा चौथ व्रतामुळे महिलांना शाश्वत सौभाग्याचं वरदान मिळतं. देवी करवा त्यांच्या वैवाहिक जीवनाचं रक्षण करते आणि त्यांच्या वैवाहिक जीवनात आनंद आणते.

(टीप: वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

हेही वाचा:

Horoscope: दिवाळीनंतर ‘या’ राशींना अच्छे दिन; शनिच्या कृपेने होऊ शकतो प्रचंड धनलाभ

महत्त्वाच्या बातम्या

Budhaditya Yog 2026 : अवघ्या काही तासांतच 4 राशींचं उजळणार भाग्य; बुधादित्य योगामुळे सुरु होणार सुवर्णकाळ, अचानक धनलाभाचे जुळणार योग
अवघ्या काही तासांतच 4 राशींचं उजळणार भाग्य; बुधादित्य योगामुळे सुरु होणार सुवर्णकाळ, अचानक धनलाभाचे जुळणार योग
Horoscope Today 4 August 2026 : आज मंगळवारच्या दिवशी 'या' 7 राशींना मिळणार कर्माचं फळ; पापातून मुक्ती की संकट ओढावणार? आजचे राशीभविष्य
आज मंगळवारच्या दिवशी 'या' 7 राशींना मिळणार कर्माचं फळ; पापातून मुक्ती की संकट ओढावणार? आजचे राशीभविष्य
Shravan 2026: श्रावणात 12 राशीनुसार करा भगवान शंकरांच्या 'या' 12 मंत्रांचा जप! भगवान शिवकृपेने इच्छापूर्ती, संकटांचा होईल नाश, तुमची रास?
श्रावणात 12 राशीनुसार करा भगवान शंकरांच्या 'या' 12 मंत्रांचा जप! भगवान शिवकृपेने इच्छापूर्ती, संकटांचा होईल नाश, तुमची रास?
Lord Shiv: शिवलिंगावर तुळशीची पाने का अर्पण केली जात नाही? तुळशीजवळ शिवलिंग का ठेवत नाही? धर्मग्रंथातील 'हे' कारण जाणून थक्क व्हाल 
शिवलिंगावर तुळशीची पाने का अर्पण केली जात नाही? तुळशीजवळ शिवलिंग का ठेवत नाही? धर्मग्रंथातील 'हे' कारण जाणून थक्क व्हाल 

व्हिडीओ

BMC Corrupt Officer : कारवाई झालेले २०७ पैकी ११२ अधिकारी सेवेत, प्रकरण काय? | Special Report
Voting Right Sold : मताधिकाराचा लिलाव; जिल्हा बँक निवडणुकीआधी धक्कादायक प्रकार | Special Report
Abhijeet Dipke On Narendra Modi : मोदींची डिग्री खरी असावी.. अभिजीत दिपके थेटच बोलले..
Sanjay Raut PC : संघामध्ये मोदी-शाहांनी आपले चमचे पेरले आहेत,संजय राऊतांचा हल्लाबोल
Balasaheb Fadnavis On Devendra Fadnavis: माझा पुतण्या आज ना उद्या पंतप्रधान होईल; देवेंद्र फडणवीसांच्या काकांना विश्वास, नेमकं काय म्हणाले?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pune Police : गाडीच्या बोनेटवर बसवून गुन्हेगारांची धिंड काढणाऱ्या पुणे पोलिसांना झटका, राज्य मानवधिकार आयोगाची नोटीस, आयुक्त अमितेश कुमारही गोत्यात
गाडीच्या बोनेटवर बसवून गुन्हेगारांची धिंड काढणाऱ्या पुणे पोलिसांना झटका, राज्य मानवधिकार आयोगाची नोटीस, आयुक्त अमितेश कुमारही गोत्यात
Solapur Adinath Sugar factory: सोलापूरमधील 450 कोटींचा साखर कारखाना 120 कोटींना विकण्याच्या हालचाली, बड्या भाजप नेत्याचा डाव, शरद पवार गटाच्या नेत्याचा आरोप
सोलापूरमधील 450 कोटींचा साखर कारखाना 120 कोटींना विकण्याच्या हालचाली, बड्या भाजप नेत्याचा डाव, शरद पवार गटाच्या नेत्याचा आरोप
Bollywood Actor Jugal Hansraj Struggle Life: कधीकाळचा नॅशनल क्रश, निळ्याशार डोळ्यांचा तो एक राजहंस; आपल्या लूक्सनी शाहरुख-सलमानलाही द्यायचा टक्कर, रेखा यांच्यासोबतच्या फोटोतल्या सुपरस्टारला ओळखलंत?
कधीकाळचा नॅशनल क्रश, निळ्याशार डोळ्यांचा तो एक राजहंस; आपल्या लूक्सनी शाहरुख-सलमानलाही द्यायचा टक्कर, रेखा यांच्यासोबतच्या फोटोतल्या सुपरस्टारला ओळखलंत?
Manoj Jarange on Pankaja Munde Dhananjay Munde: पंकजा मुंडे रिटायर्ड झाल्या तर धनंजय मुंडे सगळ्या दुनियेत धिंगाणा घालेल; मनोज जरांगेंचा हल्लाबोल, म्हणाले, 'फक्त तुझ्यामुळे बहिणीलाही...'
पंकजा मुंडे रिटायर्ड झाल्या तर धनंजय मुंडे सगळ्या दुनियेत धिंगाणा घालेल; मनोज जरांगेंचा हल्लाबोल, म्हणाले, 'फक्त तुझ्यामुळे बहिणीलाही...'
Prashant Kishor Bihar Bankipur By-Election 2026 Results: भाजपच्या बालेकिल्ल्याला सुरुंग, बांकीपूरातून विजयी होताच प्रशांत किशोर यांची पहिली प्रतिक्रिया, महाराष्ट्राचंही नाव घेतलं!
भाजपच्या बालेकिल्ल्याला सुरुंग, बांकीपूरातून विजयी होताच प्रशांत किशोर यांची पहिली प्रतिक्रिया, महाराष्ट्राचंही नाव घेतलं!
FDA Action In Ambajogai : ऑनलाईन तक्रारीची तातडीने दखल, अंबाजोगाईत चायनीज सेंटरवर एफडीएची धडक कारवाई
ऑनलाईन तक्रारीची तातडीने दखल, अंबाजोगाईत चायनीज सेंटरवर एफडीएची धडक कारवाई
Kushal Badrike On Female Character In Chala Hawa Yeu Dya: 'पुरुषप्रधान देशात स्त्री भूमिका करून, माझं घर चाललं, ही मोठी गोष्ट...'; 'चला हवा येऊ द्या'बाबत नेमकं काय म्हणाला कुशल बद्रिके?
'पुरुषप्रधान देशात स्त्री भूमिका करून, माझं घर चाललं, ही मोठी गोष्ट...'; नेमकं काय म्हणाला कुशल बद्रिके?
Tukaram Mundhe On Saoji Mutton: स्वत:च्या प्रसिद्धीसाठी विधान, आम्ही निषेध करतो, आमच्या घरी या...; सावजी हॉटेल चालक संतापले, तुकाराम मुंढेंना काय काय म्हणाले?
स्वत:च्या प्रसिद्धीसाठी विधान, आम्ही निषेध करतो, आमच्या घरी या...; सावजी हॉटेल चालक संतापले, तुकाराम मुंढेंना काय काय म्हणाले?
Embed widget