Astrology 12 November 2024 : ज्योतिषशास्त्रानुसार, कार्तिकी एकादशीच्या शुभ मुहूर्तावर, म्हणजेच 12 नोव्हेंबरपासून (Kartiki Ekadashi 2024) अनेक ग्रहांच्या चाली बदलत आहेत, ज्याचा परिणाम सर्व राशींवर होईल. मंगळवार, 12 नोव्हेंबर 2024 रोजी संध्याकाळी 6:49 वाजता, बुध आणि शनि एकमेकांपासून 90 अंशात म्हणजेच टकोनात फिरतील. ग्रहांच्या या स्थितीमुळे यंदाची कार्तिकी एकादशी 3 राशींसाठी सर्वांगी शुभ आणि भाग्याची ठरणार आहे. त्यामुळे 12 नोव्हेंबरपासून कोणत्या राशी (Zodiac Signs) सुखात जीवन जगणार? जाणून घेऊया.
मकर रास (Capricorn)
शनि आणि बुधाची स्थिती तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकते. या काळात तुम्हाला प्रलंबित पैसे मिळतील किंवा अचानक पैसे मिळण्याचा योगही येईल. यामुळे तुमच्या आर्थिक स्थितीत चांगली सुधारणा होईल. या काळात तुमच्या नियोजित योजना यशस्वी होतील. नोकरीत वाढीसह पदोन्नतीची संधी मिळेल. बॉस, अधिकारी तुमच्यावर खुश राहतील. नोकरीच्या ठिकाणी मान-सन्मान मिळेल. कौटुंबिक आणि वैवाहिक जीवनावर सकारात्मक प्रभाव पडेल. तुमच्या घरात शांती आणि आनंदाचं वातावरण असेल. या काळात तुम्ही पैसे वाचवू शकता
मिथुन रास (Gemini)
शनि आणि बुध यांची दृष्टी तुमच्यासाठी शुभ ठरू शकते. या काळात तुमच्या उत्पन्नात लक्षणीय वाढ होऊ शकते. तसेच व्यावसायिकांचे व्यावसायिक प्रवास फायदेशीर ठरतील. नवीन व्यावसायिक डील तुमची आर्थिक स्थिती मजबूत करतील. या काळात तुम्ही वाहन किंवा मालमत्ता खरेदी करू शकता. तसेच यावेळी तुम्हाला तुमच्या कामात नशिबाची साथ मिळेल. तसेच प्रलंबित कामं पूर्ण होतील. यावेळी तुम्ही देश-विदेशात फिरू शकता. याशिवाय नोकरी, व्यवसाय, नोकरीत उत्तम लाभ होईल. उत्पन्न वाढल्याने जीवनशैलीत बदल होईल. या काळात तुमचं धैर्य आणि शौर्य वाढेल.
वृश्चिक रास (Scorpio)
शनि आणि बुधाची दृष्टी तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकते. या काळात तुमचा आत्मविश्वास वाढेल. तुम्हाला जीवनात यशही मिळेल. कौटुंबिक संबंध मधुर होतील. प्रेमसंबंध घट्ट होतील. विद्यार्थ्यांची संशोधन आणि अभ्यासात रुची वाढेल. यावेळी, तुम्हाला वेळोवेळी अचानक आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. तसेच उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होऊ शकतात. तुमच्या जोडीदाराशी तुमचे संबंध सौहार्दपूर्ण असतील. तुम्ही दोघेही एकमेकांना चांगले समजून घ्याल. तसेच, अविवाहित लोकांना यावेळी लग्नाचे प्रस्ताव येऊ शकतात.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा :
Dev Uthani Ekadashi 2024 : देवउठनी एकादशीच्या दिवशी चुकूनही 'या' 5 गोष्टी करु नका; देव होतील नाराज