Sai Pallavi: रणबीर कपूर आणि साई पल्लवी यांची स्टारकास्ट असणाऱ्या रामायण चित्रपटाची सध्या मोठी चर्चा आहे. नुकत्याच या चित्रपटाच्या दोन्ही भागांच्या तारखा जाहीर करण्यात आल्यानंतर आता या चित्रपटात सीतेची भूमिका करणाऱ्या साऊथच्या अभिनेत्रीची म्हणजेच साई पल्लवीची जोरदार चर्चा आहे. एका सिनेमाच्या सेटवर भावनिक ब्रेकडाऊन झाल्यानंतर तीनं याविषयी सांगितलंय. दिवसरात्र जागून काम केल्यानंतर रामायणच्या सेटवर अचानक साई पल्लवी ढसाढसा रडू लागल्यानं सेटवरील सगळ्यांनाच धक्का बसल्याचं तिनं सांगितलं.
साई पल्लवी ही साऊथची लोकप्रीय कलाकार आहे. ही अभिनेत्री लवकरच बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. रणबीर कपूर प्रमुख भुमिकेत असणाऱ्या रामायण चित्रपटात ती सीतेची भूमिका करत आहे. साई ही मनोरंजनसृष्टीत अतिशय कामाला समर्पित अभिनेत्री मानली जाते. कोणतीही तक्रार न करता ती काम करते. दरम्यान, दिवसरात्र काम करत असताना रामायणच्या सेटवर तिचा भावनीक तोल गेल्याचं तिनं सांगितलं.
काय म्हणाली साई?
साईनं सांगितलं, श्याम सिंह रॉय या चित्रपटाचं शुटिंग संपवून लगेच तिने रामायणचं शुटिंग करण्यासाठी गेली. श्याम सिंगचं दिवसभराचं शूट संपलं की मी आनंदी असायचे. आमचे बहुतेक सीन्स हे रात्री शुट केलेले असायचे. मला रात्री शुटिंग आवडत नाही. मी अशी व्यक्ती आहे, जिला दिवसा झोप येत नाही. रात्रभर जागून दुसऱ्या दिवशी एकदा जाग आली की पुन्हा झोप येत नाही. कल्पना करा मी फक्त एक दोन दिवस नाही तर जवळपास 3० दिवस असे चालले होते.
मला आठवतंय., एकदा मी स्वत:वर नियंत्रण ठेवू शकले नव्हते. मी ढसाढसा रडले, मी स्वत:ला समजावून सांगत होते की मला चित्रपटात काम करायचे आहे. पण मला एक दिवस सुट्टी मिळावी अशी माझी इच्छा होती. मी त्याबद्दल कोणाला सांगितले नाही. परंतू माझ्या धाकट्या बहिणीनं मला रडताना पाहिले आणि ती थेट निर्मात्यांकडेच गेली. आणि त्यांना तिनं सुट्टी हवी असल्याचं सांगितलं.
निर्मात्यांनी साईला दिली १० दिवसांची सुट्टी
साईनं सांगितलं की निर्माता व्यंकट बोयनपल्ली यांच्या प्रतिक्रियेने ती खूप आश्चर्यचकीत झाली होती. मानसिकरित्या कोसळली हे ऐकून मला खूप वाईट वाटले. त्यामुळे दहा दिवसांची सुट्टी घ्या. तुम्हाला हवे ते करा आणि तयार झाल्यावर परत या.. असं निर्मात्यांनी साईला सांगितल्याचं तिनं सांगितलं.