Bigg Boss 18: मनोरंजनसृष्टीत बॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता ऋतिक रोशन याचा माईंड कोच म्हणून ओळखला जाणारा आरफीन खान नुकत्याच झालेल्या विकेंड का वार एपिसोडमध्ये बिगबॉसच्या घरातून बाहेर पडल्याचे दिसले. बिगबॉसच्या घरातून बाहेर पडल्या पडल्या आरफीननं सलमान खानने आरफीनच्या प्रोफेशनची चेष्टा केल्यामुळं तो दुखावला गेल्याचं बाहेर आल्यानंतर आता सांगितलंय. शो मध्ये असताना अनेकवेळा आरफीनच्या प्रोफेशनवरून त्याला टोकण्यात आलं होतं. सलमान खाननेही त्याच्या प्रोफेशनची चेष्टा केल्याचं दिसलं. यामुळे आरफीनला खूप वाईट वाटल्याचं तो म्हणाला.
आरफीनच्या म्हणण्यानुसार, घराबाहेर पडल्यानंतर आरफीनला खूप वाईट वाटलंय . त्याच्या मते सलमाननं त्याचं एविक्शन केलं हे योग्य नव्हतं. त्यासोबतच आरफीन बाहेर पडल्यावर त्याची पत्नी सारा हिचं बिगबॉसच्या घरात झालेल्या ब्रेकडाऊनविषयीही आरफीन बोलला. त्याच्या प्रोफेशनवर सलमानकडून होणाऱ्या कमेंटने तो हर्ट झाल्याचं त्यानं सांगितलं.
सलमाननं काय केली होती कमेंट?
आरफीन म्हणाला, जेव्हा सलमान खानसारखा सुपरस्टार तुमच्या कोणत्याही गोष्टीची चेष्टा करतो तेव्हा त्याचा तुमच्यावर परिणाम होतो. पण मला हे माहित आहे की त्यांचा तसा कोणताही हेतू नव्हता. त्यांना माहित आहे की मी काय करतो आणि त्यामुळे भ्रमित होणंही ठीक नाही. कारण मी त्यांच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी एवढा मोकळा होतो पण एक गैरसमज झाला होता.
सलमानमुळे करियरमध्ये उंच उडी घेणार
सलमान खानच्या शोमुळे आता लोकांना त्याच्या कामाविषयी माहित झालं आहे. जेव्हा मला या शो विषयी विचारलं गेलं तेंव्हा अनेकांनी मला सांगितलं की आपल्या करियरवर निगेटीव्ह परिणाम होतो. पण मी त्यांना उत्तर दिलं की मला वाटतं या शोमुळे माझ्या प्रोफेशन आधीपेक्षा लाख पटींनी चांगलं होईल. आता प्रत्येकाला माहित आहे की माईंड कोच काय करतो. त्यामुळं ही चांगली गोष्ट आहे.
साराच्या मेंटल ब्रेकडाऊनवर म्हणाला..
आरफीन खानच्या बिगबॉसच्या घरातील मेंटल ब्रेकडाउनवरही आरफीन बोललाय. तो म्हणाला अविनाश मिश्रा, एलिस कौशिक, इशा सिंग आणि विवियन डिसेना तिला मानसिकरित्या खाली खेचण्याचा प्रयत्न करत आहेत. आरफीन म्हणाला, तिनं त्यांच्यावरच विश्वास ठेवला आणि त्यांनी तिचा गैरफायदा घेतला. तिने मला चाहतशी जोडलं जे अत्यंत लाज आणणारं होतं.