Janmashatami 2025: मेहनत करूनही पैसा नाही? वैवाहिक जीवनात समस्या? कर्जमुक्ती, ग्रह दोष? कृष्णजन्माष्टमीला 'हे' खास उपाय कराच, फरक जाणवेल..
Janmashatami 2025: ज्योतिषशास्त्रानुसार जन्माष्टमीला केलेले उपाय अतिशय फलदायी मानले जातात, कारण हा दिवस भगवान श्रीकृष्णाचा जन्मदिवस असून या दिवशी चंद्र आणि ग्रहांची ऊर्जा अत्यंत शुभ असते.

Janmashatami 2025: भगवान कृष्णाला विश्वाचे पालनकर्ता भगवान विष्णूचा अवतार मानले जाते. भगवान कृष्ण हे हिंदू धर्मात एक प्रमुख देवता आहेत. जगभरातील लाखो भक्तांच्या हृदयात कृष्णाचे विशेष स्थान आहे. भगवद्गीतेतील त्यांची शिकवणी जीवनासाठी मार्गदर्शक तत्वे म्हणून पाहिली जाते. त्यांची जीवनकथा प्रेम, कर्तव्य आणि नीतिमत्तेचे प्रतीक आहे. वैदिक पंचांगानुसार, यंदा 15 ऑगस्ट रोजी कृष्ण जन्माष्टमी आहे, ज्योतिषशास्त्रानुसार या दिवशी केलेले उपाय अतिशय फलदायी मानले जातात, कारण हा दिवस भगवान श्रीकृष्णाचा जन्मदिवस असून या दिवशी चंद्र आणि ग्रहांची ऊर्जा अत्यंत शुभ असते. डॉ भूषण ज्योतिर्विद यांनी येथे काही प्रभावी ज्योतिषीय उपाय सांगितले आहेत, जे धन, आरोग्य, नातेसंबंध आणि आध्यात्मिक प्रगतीसाठी केले जातात..
धन - समृद्धीसाठी उपाय
मध्यरात्री श्रीकृष्णाला लोणी-दही आणि तुळशीपत्र अर्पण करा.
पिवळ्या कपड्यात 11 गोमती चक्र बांधून तिजोरीत ठेवा.
“ॐ श्रीं श्रीकृष्णाय नमः” या मंत्राचा 108 वेळा जप करा.
आरोग्यासाठी उपाय
रात्रीच्या वेळी तुळशीपत्र, पंचामृत आणि गंगाजल यांचे मिश्रण श्रीकृष्णाला अर्पण करून प्रसाद स्वरूपात घ्या.
“ॐ नमो भगवते वासुदेवाय” मंत्राचा जप रोगनाशक मानला जातो.
नातेसंबंध सुधारण्यासाठी
दांपत्याने मिळून कृष्ण-राधा यांची पूजा करावी आणि एकत्र लोणी खावे.
राधा-कृष्णच्या पायांना गुलाबपाणी आणि दूधाने अभिषेक करा.
वाईट ग्रह दोष शांतीसाठी
कृष्ण जन्माष्टमीच्या रात्री 9 वेगवेगळ्या धान्यांचा दान करा (नवरत्न धान्य – नवग्रह शांतीसाठी).
कृष्णाला शंख, पिवळा फुलांचा हार, आणि पिवळ्या मिठाई अर्पण करा.
कर्जमुक्तीसाठी
रात्री 5 पानांची बासरी (किंवा शक्य नसेल तर लाकडी बासरी) श्रीकृष्णाच्या मूर्ती जवळ ठेवून दुसऱ्या दिवशी ती घरात ठेवा.
“ॐ क्लीं कृष्णाय नमः” या मंत्राचा जप करा.
डॉ भूषण ज्योतिर्विद
हेही वाचा :
Shani Dev: अखेर शनिदेवांना 'या' 5 राशींवर दया आलीच! 18 ऑगस्टला शनि मार्ग बदलणार, टेन्शन मिटणार, संपत्तीत होणार वाढ..
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)




















