एक्स्प्लोर
IPL 2025 Final Prediction RCB vs PBKS: विराट कोहलीवर शनीची महादशा, आरसीबी Vs पंजाब, IPLचा अंतिम सामना कोण जिंकणार? ज्योतिषशास्त्रीय विश्लेषण सांगते..
IPL 2025 Final Prediction RCB vs PBKS: बंगळुरू की पंजाब? कोणाला मिळणार विजयाचा मुकुट? विराटवर शनिची महादशा? अंतिम सामना कोण जिंकणार? ज्योतिषशास्त्रीय दृष्टिकोनातून जाणून घ्या

IPL 2025 Final Prediction RCB vs PBKS Who will get the crown of victory Shani Mahadasha on Virat kohli final match Find out from an astrological prediction
Source : ABPLIVE AI
IPL 2025 Final Prediction RCB vs PBKS: आज, 3 जून 2025 रोजी, आयपीएल 2025 चा अंतिम सामना रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू (RCB) आणि पंजाब किंग्ज (PBKS) यांच्यात अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळला जाणार आहे. या दोन्ही संघांनी अद्याप आयपीएल ट्रॉफी (IPL Trophy) जिंकलेली नाही, त्यामुळे या सामन्याचे महत्त्व अधिकच वाढले आहे. आजचा सामना कोण जिंकणार? रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू की पंजाब किंग्ज? ज्योतिषशास्त्रीय दृष्टिकोनातून पाहायला गेल्यास, डॉ भूषण ज्योतिर्विद यांनी या सामन्याबाबत सविस्तर विश्लेषण केलंय. जाणून घ्या...
ज्योतिषीय विश्लेषण
रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू (RCB)
- कर्णधार: रजत पाटीदार,
- प्रमुख खेळाडू: विराट कोहली (614 धावा), जोश हॅझलवूड (21 विकेट्स)
- ग्रहस्थिती: विराट कोहलीच्या कुंडलीत मंगळ आणि सूर्य मेष राशीत आहेत, जे त्याच्या आक्रमकतेला आणि नेतृत्वगुणांना बळकटी देतात.
- तसेच, महाभाग्य योगामुळे त्याला प्रसिद्धी, संपत्ती आणि यश प्राप्त झाले आहे.
- सध्या त्याच्या कुंडलीत शनि महादशा चालू आहे, जी व्यावसायिक यशासाठी अनुकूल मानली जाते.
पंजाब किंग्ज (PBKS)
- कर्णधार: श्रेयस अय्यर
- प्रमुख खेळाडू: श्रेयस अय्यर (6 अर्धशतके), ग्लेन मॅक्सवेल, आर्शदीप सिंग
- ग्रहस्थिती: श्रेयस अय्यरच्या कुंडलीत सूर्य आणि मंगळ युतीमुळे ऊर्जा, आत्मविश्वास आणि नेतृत्वगुण वाढतात.
- मकर लग्नामुळे त्याच्यात शिस्त, मेहनत आणि धैर्य आहे, जे त्यांच्या कारकिर्दीत यशाचे कारण आहे.
- शनि ग्रहाच्या प्रभावामुळे श्रेयसने अनेक अडचणींवर मात करून यश प्राप्त केले आहे.
विराट कोहलीची शनिची महादशा आणणार अडचणीत?
डॉ भूषण ज्योतिर्विद सांगतात, प्रश्न कुंडली वरून सहावे घर हे प्रतियोगिताचे असते, त्यात शनि हा तिथे आला आहे, सहाव्या घरचा स्वामी शनि देव हे आठव्या ठिकाणी गेले आहेत, विराट कोहलीची शनिची महादशा सुरू त्यात शनि देवचे नीच राजभंग मधे येणे एक चांगले सुचक आहे.तसेच श्रेयस अय्यरचे मुख्य ग्रह सूर्या वृषभ नीच झाले आहेत आणि मंगळ 12 घरी जाऊन ते पण दूषित झाले आहेत. त्यामुळे सामना रोमांचक होऊ शकतो,पण विजय विराट कोहलीच्या पदरात जाईल असे वाटते.
निष्कर्ष
- डॉ भूषण ज्योतिर्विद सांगतात, ज्योतिषीय विश्लेषण आणि प्रश्न कुंडली आधारित भविष्यवाणी यांच्या आधारे, RCB च्या विजयाची शक्यता अधिक आहे. विराट कोहलीच्या नेतृत्वगुणांना ग्रहांची अनुकूलता आणि संघाची सध्याची फॉर्म यामुळे RCB ला फायदेशीर स्थिती आहे. क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ आहे, आणि अंतिम निकालासाठी सामन्याची वाट पाहणेच योग्य ठरेल.
हेही वाचा :
Rahu Ketu: शनि नंतर आता राहू-केतू घेणार परीक्षा! 2026 पर्यंत या 3 राशींना जपून पाऊल टाकावं लागेल? तुमची रास यात आहे का?
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
आणखी वाचा
Advertisement
Advertisement




















