एक्स्प्लोर

Horoscope Today, September 30, 2022 : नवरात्रीच्या पाचव्या दिवशी ‘या’ राशींना होणार फायदा! जाणून घ्या आजचे राशीभविष्य

Horoscope Today, September 30,  2022 : मेष राशीच्या लोकांना आर्थिक लाभ मिळणार आहे. तर, वृषभ राशीच्या लोकांचा जोडीदारासोबत वाद होऊ शकतो. वाचा संपूर्ण राशीभविष्य...

Horoscope Today, September 30,  2022 : आज चंद्र अनुराधा नक्षत्रात असून,  वृश्चिक राशीत आहे. सूर्य कन्या राशीत आणि शनि मकर राशीत आहे. गुरु मीन राशीत आहे. मेष राशीच्या लोकांना आर्थिक लाभ मिळणार आहे. तर, वृषभ राशीच्या लोकांचा जोडीदारासोबत वाद होऊ शकतो. वाचा संपूर्ण राशीभविष्य...

मेष (Aries Horoscope) : आजचा दिवस व्यवसाय करणाऱ्या लोकांसाठी नवीन करार आणू शकतो. तुमच्या मान-सन्मानात वाढ झाल्याने मन प्रसन्न राहील. आज तुम्हाला आर्थिक लाभही मिळतील. सरकारी नोकरी करणाऱ्या लोकांसाठी दिवस चांगला जाणार आहे. तुम्ही तुमच्या कृतीने तुमच्या अधिकाऱ्यांना खूश करू शकता. मित्रांसोबत पिकनिकला जाण्याचा बेत कराल.

वृषभ (Taurus Horoscope) : कामाच्या ठिकाणी तुमच्या जबाबदाऱ्या समजून घेण्याचा प्रयत्न करा. आरोग्याची काळजी घ्यावी लागेल. जीवनसाथी निवडताना कुटुंबीयांची मदत घ्या. व्यवसायाशी संबंधित योजना सर्वांसमोर जाहीर न केल्यास चांगले होईल. जोडीदारासोबत काही कारणावरून वाद होऊ शकतो. बुद्धिचातुर्याने केलेली कामे पूर्ण होतील. प्रयत्नांना फळ मिळेल.

मिथुन (Gemini Horoscope) : मिथुन राशीच्या लोकांना आज थोडे सावध राहावे लागेल. तुमची कोणतीही मौल्यवान वस्तू चोरीला जाण्याची किंवा हरवण्याची भीती आहे. मुलाच्या शिक्षणाची बातमी किंवा कोणत्याही स्पर्धेत अपेक्षित यश मिळाल्याने दिवसभर आनंद राहील. संध्याकाळी तुमचे एखादे रखडलेले काम पूर्ण होईल. खूप उत्साहाने दिवस घालवाल. आर्थिकदृष्ट्याही दिवस चांगला जाणार आहे.

कर्क (Cancer Horoscope) : आज तुम्ही कौटुंबिक कामात व्यस्त असाल. कामाच्या ठिकाणी काही अडचणी येऊ शकतात. कामाचा व्याप वाढेल. मन अस्वस्थ होऊ शकते. कामाचा उत्साह राहील. मुलाखतीत यश मिळेल. कोणतेही थकीत पैसे परत मिळतील. कार्यक्षेत्रात प्रगती होईल. लोकांकडून सहकार्य मिळवण्यात राजकारणी यशस्वी होईल. जोडीदाराचे सहकार्य व सहवास मिळेल.

सिंह (Leo Horoscope) : आज तुम्ही शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या अस्वस्थ असाल. कुटुंबातील सदस्याच्या तब्येतीची चिंता राहील. आर्थिक नुकसान होऊ शकते. गुंतवणुकीशी संबंधित योजनेवर काम करू शकता. मेहनतीनुसार फळ मिळेल. विद्यार्थ्यांना कामात यश मिळेल. आज नवीन कामाची सुरुवातही करू नका. शेअर बाजारात कोणत्याही प्रकारची जोखीम घेणे टाळा. दिवस सकारात्मक राहील.

कन्या (Virgo Horoscope) : आज विद्यार्थ्यांना मिळालेल्या यशाने आनंद होईल. अनावश्यक राग टाळा. व्यवसायात अडचणी येऊ शकतात. बदलाची शक्यता आहे. तुम्हाला मित्र आणि कुटुंबीयांकडून पाठिंबा मिळू शकतो. मनःशांती लाभेल. उत्पन्नात सुधारणा होईल. खर्चही जास्त होईल. रचनात्मक कार्यात प्रगती होईल. व्यवसायात प्रतिष्ठा वाढेल. भेटवस्तू मिळतील किंवा सन्मान वाढेल. आरोग्याबाबत जागरूक राहण्याची गरज आहे.

तूळ (Libra Horoscope) : आजचा दिवस तुमच्यासाठी आनंदाचा असेल. तुम्ही तुमच्या पालकांसोबत धार्मिक स्थळाला भेट देऊ शकता. व्यवसायात काही अडथळे तुम्हाला त्रास देत असतील, तर त्यांचा जास्त विचार करणे टाळावे लागेल. कामाच्या ठिकाणी तुम्हाला नशिबाच्या पूर्ण पाठिंब्यामुळे पदोन्नती मिळू शकते, त्यामुळे तुम्ही आनंदी राहाल. उधार दिलेले पैसे परत मिळण्याची शक्यता खूपच कमी आहे.

वृश्चिक (Scorpio Horoscope) : मन प्रसन्न राहील. वाचनाची आवड निर्माण होईल. तुम्हाला तुमच्या कामाचे चांगले फळ मिळेल. मुलांकडून चांगली बातमी मिळू शकते. नोकरीत प्रगतीचा मार्ग मोकळा होईल. कामाच्या ठिकाणी काही बदल होण्याची शक्यता आहे. इतर ठिकाणी जाण्याचे योगही आहेत. शैक्षणिक कार्यातून यश मिळेल. उत्पन्न वाढेल आणि खर्च जास्त होईल. मित्रांचे सहकार्य मिळेल.

धनु (Sagittarius Horoscope) : धनु राशीच्या लोकांसाठी दिवस खूप चांगला जाणार आहे. आज तुमचे विरोधकही तुमची प्रशंसा करतील. सत्ताधाऱ्यांशी जवळीक आणि युतीचा लाभही सरकारला मिळणार आहे. आज तुम्हाला धनलाभ होऊ शकतो. सामाजिक किंवा सांस्कृतिक कार्यक्रमात भाग घ्याल. पैसा जपून वापर. अन्यथा भविष्यात आर्थिक टंचाईचा सामना करावा लागू शकतो.

मकर (Capricorn Horoscope) : कौटुंबिक बाबींमध्ये काळजी घ्यावी लागेल. जोडीदारासोबत चांगला वेळ जाईल. प्रियकरासह कुठेतरी जाण्याचा बेत आखता येईल. नोकरी आणि व्यवसायात फायदा होईल. आर्थिक स्थिती चांगली राहील. सामाजिक प्रतिष्ठा वाढेल. आर्थिक बाजू मजबूत राहील. भेटवस्तू मिळेल, सन्मान वाढतील. कामाच्या ठिकाणी काही बदल होण्याची शक्यता आहे.

कुंभ (Aquarius Horoscope) : आज तुम्ही नवीन काम हातात घ्याल. नशिबाची साथ मिळेल. नोकरी-व्यवसायात उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होतील. तुम्हाला तुमच्या मित्रांकडून लाभ मिळेल. समाजात तुमची प्रतिष्ठा वाढेल. कुटुंबातील सदस्यांकडून तुम्हाला समाधान आणि आनंद मिळू शकेल. सहलीची योजना आखू शकता. विद्यार्थ्यांसाठी काळ चांगला आहे.

मीन (Pisces Horoscope) : वैवाहिक जीवन जगणाऱ्या लोकांसाठी आजचा दिवस काही अडचणी आणू शकतो. जोडीदाराच्या काही इच्छा पूर्ण न केल्याने तुम्हाला त्रास होईल. पैशाअभावी तुमची आर्थिक स्थितीही ढासळू शकते. कुटुंबात सुरू असलेला कोणताही वाद उग्र रूप धारण करू शकतो, ज्यामुळे कुटुंबातील शांतता बिघडते. जर तुम्ही एखाद्याकडून कर्ज मागितले, तर ते तुम्हाला सहज मिळेल. 

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

संबंधित बातम्या : 

शनिदेवाची पूजा करण्यासाठी शनिवारी उत्तम योग, 'या' पाच राशींचा आहे खास दिवस 

Geeta Gyan : भगवान कृष्णाचे हे 4 गुण तुमचे जीवन बदलू शकतात, जाणून घ्या जीवनाचा खरा मंत्र

महत्त्वाच्या बातम्या

Horoscope Today 7 August 2026: आजचा शुक्रवार 6 राशींसाठी भाग्याचा! अद्भूत शुभ योग जुळले, लक्ष्मी-कुबेराच्या कृपेने कोण भाग्यशाली? आजचे राशीभविष्य वाचा...
आजचा शुक्रवार 6 राशींसाठी भाग्याचा! अद्भूत शुभ योग जुळले, लक्ष्मी-कुबेराच्या कृपेने कोण भाग्यशाली? आजचे राशीभविष्य वाचा...
Lucky Zodiac Signs : 7 ऑगस्टचा दिवस 'या' 5 राशींसाठी भाग्यशाली! देवी लक्ष्मीच्या कृपेने वाईट काळ लवकरच संपणार; वाचा लकी राशी
7 ऑगस्टचा दिवस 'या' 5 राशींसाठी भाग्यशाली! देवी लक्ष्मीच्या कृपेने वाईट काळ लवकरच संपणार; वाचा लकी राशी
Trigrahi Yog 2026 : त्रिग्रही योगामुळे 4 राशींची होणार चांदीच चांदी; पुढचे 12 दिवस राहाल टेन्शन फ्री, जगाल राजासारखं आयुष्य
त्रिग्रही योगामुळे 4 राशींची होणार चांदीच चांदी; पुढचे 12 दिवस राहाल टेन्शन फ्री, जगाल राजासारखं आयुष्य
Shani Sade Sati : 2027 मध्ये 'या' एका राशीवर असणार शनिची साडेसाती; कठीण काळात काय करावं आणि काय करु नये? वाचा ज्योतिषशास्त्र
2027 मध्ये 'या' एका राशीवर असणार शनिची साडेसाती; कठीण काळात काय करावं आणि काय करु नये? वाचा ज्योतिषशास्त्र

व्हिडीओ

Sanjay Raut PC : विधीमंडळ पक्ष फुटला म्हणजे मूळ पक्ष फुटला नाही, कोर्टात व्यक्तिवाद, संजय राऊत UNCUT
Kunbi Certificate Issues Special Report : मराठा आरक्षणाचा पेच वाढला? कुणबी दाखलेच अवैध? | Special Report
Dharashiv News Special Report : धाराशिव जिल्हा परिषदेच्या दोन तास टीव्ही, मोबाईल बंद उपक्रमाला सुरुवात | Special Report
Analogue paneer Special Report : महाराष्ट्रात ॲनालॉग पनीरवर वर्षभराची बंदी, तुकाराम मुंढेंचा तडाखा
Mumbai Mayor Bungalow Special Report : मुंबई महापालिकेचा नव्या टेंडरमुळे वादंग : Ritu Tawade

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
AI Deepfake Ban Rules : एआय डीपफेकवर केंद्र सरकारचा सर्जिकल स्ट्राईक; आक्षेपार्ह फोटो-व्हिडीओ 3 तासांत हटवावे लागणार
एआय डीपफेकवर केंद्र सरकारचा सर्जिकल स्ट्राईक; आक्षेपार्ह फोटो-व्हिडीओ 3 तासांत हटवावे लागणार
टीम इंडियात धावाधाव सुरु! आता फिटनेस सिद्ध करण्यासाठी 10 मिनिटात किती किमी पळावं लागणार? 1200 मीटर किती मिनिटात पूर्ण करावी लागणार? हा सुद्धा नियम ठरला
टीम इंडियात धावाधाव सुरु! आता फिटनेस सिद्ध करण्यासाठी 10 मिनिटात किती किमी पळावं लागणार? 1200 मीटर किती मिनिटात पूर्ण करावी लागणार? हा सुद्धा नियम ठरला
Womens Asia Cup 2026 : आशिया कपचं वेळापत्रक जाहीर, भारत पाकिस्तान 'या' दिवशी आमने सामने, दुबईत स्पर्धा रंगणार
आशिया कपचं वेळापत्रक जाहीर, भारत पाकिस्तान 'या' दिवशी आमने सामने, दुबईत स्पर्धा रंगणार
Mohan Bhagwat : खुल्या वर्गातील मुलांचं कटऑफ लिस्टमध्ये नाव खाली, आरक्षण कधीपर्यंत ठेवणार? Gen Z चे थेट प्रश्न, मोहन भागवतांचं रोखठोक उत्तर
खुल्या वर्गातील मुलांचं कटऑफ लिस्टमध्ये नाव खाली, आरक्षण कधीपर्यंत ठेवणार? Gen Z चे थेट प्रश्न, मोहन भागवतांचं रोखठोक उत्तर
Mohan Bhagwat: मुलांना देवाचं रूप मानलं जाते, तरीही आंदोलनात लाठीचार्ज, पेलेट गन फायर करण्यात आल्या, Gen Z चर्चेत थेट प्रश्न विचारताच सरसंघचालक मोहन भागवत नेमकं काय म्हणाले? पहिल्यांदाच जाहीर भाष्य
मुलांना देवाचं रूप मानलं जाते, तरीही आंदोलनात लाठीचार्ज, पेलेट गन फायर करण्यात आल्या, Gen Z चर्चेत थेट प्रश्न विचारताच सरसंघचालक मोहन भागवत नेमकं काय म्हणाले? पहिल्यांदाच जाहीर भाष्य
Eknath Shinde :
एकनाथ शिंदे अचानक दरे गावातून मुंबईकडे रवाना, अमित शाहांच्या भेटीसाठी दौरा आटोपल्याची सूत्रांची माहिती
Arvind Kejriwal: इथेनॉल, पेपरफुटीविरोधात बोलणाऱ्यांची खाती बंद करण्यासाठी सरकारचा मेटावर दबाव, मेटाने असली बदमाशी करत मोदींसमोर गुडघे टेकवू नयेत; केजरीवालांचा गंभीर आरोप
इथेनॉल, पेपरफुटीविरोधात बोलणाऱ्यांची खाती बंद करण्यासाठी सरकारचा मेटावर दबाव, मेटाने असली बदमाशी करत मोदींसमोर गुडघे टेकवू नयेत; केजरीवालांचा गंभीर आरोप
Rahul Gandhi: राहुल गांधींचा Gen Z सोबत संपर्क साधण्याचा प्रयत्न; इन्स्टावर 'आस्क मी एनीथिंग' सेशन सुरू, म्हणाले, तुम्ही मला काहीही विचारू शकता
राहुल गांधींचा Gen Z सोबत संपर्क साधण्याचा प्रयत्न; इन्स्टावर 'आस्क मी एनीथिंग' सेशन सुरू, म्हणाले, तुम्ही मला काहीही विचारू शकता
Embed widget