एक्स्प्लोर

Horoscope Today, September 3, 2022 : ज्येष्ठागौरीच्या आशीर्वादाने ‘या’ राशींना मिळणार लाभ! जाणून घ्या आजचे राशीभविष्य

Horoscope Today, September 3,  2022 : मेष राशीच्या लोकांना आजचा दिवस लाभदायी ठरणार आहे. वृषभ राशीच्या लोकांना अनावश्यक खर्च टाळावा लागेल. जाणून घ्या संपूर्ण राशीभविष्य...

Horoscope Today, September 3,  2022 : आज चंद्र अनुराधा नक्षत्रात असून, वृश्चिक राशीत आहे. सूर्य सिंह राशीत आणि शनि मकर राशीत आहे. गुरु मीन राशीत आहे. मेष राशीच्या लोकांना आजचा दिवस लाभदायी ठरणार आहे. वृषभ राशीच्या लोकांना अनावश्यक खर्च टाळावा लागेल. जाणून घ्या संपूर्ण राशीभविष्य...

मेष (Aries Horoscope) : आजचा दिवस तुमच्यासाठी चांगला असणार आहे. आर्थिक स्थिती मजबूत राहील. नोकरीच्या ठिकाणी प्रतिष्ठा वाढेल, मान-सन्मान मिळू शकेल. जर तुम्हाला नवीन व्यवसाय सुरू करायचा असेल, तर आजचा दिवस शुभ राहील. सरकारी नोकरी करणाऱ्यांसाठी काळ शुभ आहे. लाभाची शक्यता निर्माण होत आहे. मित्रमंडळींसोबत चांगला वेळ घालवाल.

वृषभ (Taurus Horoscope) : आजचा दिवस तुमच्यासाठी संमिश्र असणार आहे. अनावश्यक खर्च टाळावा लागेल. तुमच्या आजूबाजूला काही वाद-विवाद सुरू असतील, तर त्यातही शांत राहणेच योग्य ठरेल. तुमचा एखादा मित्र तुम्हाला खूप दिवसांनी भेटेल, ज्यामुळे तुम्हाला आनंद होईल. कुटुंबातील सदस्यांच्या जीवनात काही अडचण आली असेल, तर त्यावरही तोडगा मिळेल. कुटुंबातील लोक एकमेकांच्या सहवासात आनंदी होतील.

मिथुन (Gemini Horoscope) : आत्मविश्वास वाढेल, पण मन अस्वस्थ राहू शकते. नोकरीत अधिकाऱ्यांचे सहकार्य मिळेल. कार्यक्षेत्रात बदल होण्याची शक्यता आहे. शैक्षणिक कार्यात सुधारणा होईल. खर्च कमी होतील. आर्थिक स्थिती सुधारेल. राहणीमानही सुधारेल. कुटुंबाचे सहकार्य मिळेल. आहाराची काळजी घ्या. प्रवासाला जावे लागेल. अनावश्यक धावपळ होऊ शकते. जोडीदाराशी वैचारिक मतभेद होऊ शकतात.

कर्क (Cancer Horoscope) : आज तुम्ही शारीरिकदृष्ट्या अस्वस्थ आणि मानसिकदृष्ट्या चिंतेत असाल. नकारात्मक विचार मनाला त्रास देतील. पोटदुखीचा त्रास होऊ शकतो. अचानक पैसा खर्च होण्याची शक्यता आहे. वाद होण्याची शक्यता आहे. नवीन व्यक्तीचे आकर्षण तुम्हाला अडचणीत आणू शकते. नवीन काम किंवा प्रवास सुरू करू नका. जोडीदाराशी वैचारिक मतभेद होऊ शकतात. आज कामाच्या ठिकाणी फक्त तुमच्या कामावर लक्ष केंद्रित करा.

सिंह (Leo Horoscope) : आजचा दिवस आनंदाने भरलेला असेल. दिवसाचा बराचसा वेळ कुटुंबातील सदस्यांसोबत हसण्यात आणि आनंदात जाईल. कामाच्या ठिकाणी सुरू असलेल्या समस्या संपतील. सर्व कामे सुरळीतपणे सुरू होतील. सहकाऱ्यांचे सहकार्य मिळेल. व्यापारी वर्गाला नवीन यश प्राप्त होईल, धन लाभाचे योग आहेत. नोकरी करणाऱ्या लोकांना प्रमोशनच्या सुवर्ण संधी मिळू शकतात.

कन्या (Virgo Horoscope) : आजचा दिवस तुमच्यासाठी खूप फलदायी असणार आहे. एखाद्या मंगल कार्यक्रमात सहभागी होऊ शकता. कामाच्या ठिकाणी बढती किंवा पगारवाढ यासारखी चांगली बातमी मिळू शकते. अनावश्यक खर्च वाढू शकतो. नोकरीच्या ठिकाणी पूर्वी केलेल्या आर्थिक योजनांचा लाभ मिळेल. आगामी काळात आर्थिक आणि लाभ होण्याची शक्यता आहे. वाचनाची आवड निर्माण होईल.

तूळ (Libra Horoscope) : आज द्विधा मानसिक स्थितीत असाल. अशा परिस्थितीत कोणताही महत्त्वाचा निर्णय घेऊ नका. नवीन काम सुरू करू नका. कामाच्या ठिकाणी तुमचे मन रमणार नाही. संयम गमावल्याने नुकसान होण्याची शक्यता राहील. वाणीवर संयम ठेवून घरातील व्यक्तींशी वाद होणार नाहीत, याची काळजी घ्या. कोणत्याही गोष्टीबद्दल हट्ट करू नका. आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे.

वृश्चिक (Scorpio Horoscope) : आज तुम्ही आत्मविश्वासाने परिपूर्ण असाल. आर्थिक स्थिती मजबूत राहील, लाभाच्या संधी उपलब्ध होतील. सकारात्मक विचारसरणी आणि कार्यक्षेत्रात पूर्ण आत्मविश्वास यामुळे तुम्हाला चांगली संधी मिळू शकते. वरिष्ठ अधिकारी तुमच्यावर प्रभावित होतील. नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी आजचा दिवस फायदेशीर ठरेल. धार्मिक कार्यात रुची वाढेल.

धनु (Sagittarius Horoscope) : आज मन अस्वस्थ होऊ शकते. एखाद्या धार्मिक स्थळी जाऊ शकता. कामाचा व्याप वाढेल. खर्च वाढतील. आरोग्याचीही काळजी घ्या. उत्पन्नातही सुधारणा होईल. नोकरीत उच्च पद मिळू शकते. कुटुंबापासून दूर जावे लागण्याची शक्यता आहे. नोकरीत अधिकाऱ्यांशी चांगले संबंध ठेवा. शैक्षणिक कार्यात यश मिळण्याची शक्यता आहे. नात्यात गोडवा येईल.

मकर (Capricorn Horoscope) : मन प्रसन्न राहील. खूप आत्मविश्वास असेल. मात्र, काही प्रकरणांमध्ये सावध रहा. मित्राच्या मदतीने व्यवसाय वाढू शकतो. उत्पन्न वाढेल. व्यवसायाचे नवे प्रस्ताव प्राप्त होऊ शकतात. खूप मेहनत करावी लागेल. संतती सुखात वाढ होईल. जोडीदाराच्या तब्येतीत सुधारणा होईल. अनियोजित खर्च वाढतील. कुटुंबातील एखाद्या ज्येष्ठ व्यक्तीकडून आर्थिक मदत मिळण्याची शक्यता आहे.

कुंभ (Aquarius Horoscope) : तुम्ही सर्व कामे सहजतेने पूर्ण करू शकाल. नोकरी-व्यवसायात प्रगती होईल. सरकारी कामे सहज पूर्ण होतील. वरिष्ठांकडून मदत मिळत राहील. आरोग्य चांगले राहील. आज कोणत्याही गोष्टीची चिंता दूर झाल्यामुळे तुमचे मन प्रसन्न राहील. आर्थिक प्रगती होईल. तुमचे वैवाहिक जीवन आनंदी राहील आणि लोकांमध्ये तुमच्याबद्दल आदर वाढेल. विद्यार्थ्यांसाठीही आजचा दिवस शुभ आहे.

मीन (Pisces Horoscope) : आज तुम्हाला अस्वस्थ वाटू शकते. शारीरिक कमजोरी राहील. कामं अपूर्ण राहिल्यामुळे निराश व्हाल. नशीब तुम्हाला साथ देणार नाही, असे वाटेल. ऑफिसमधील अधिकारी आणि सहकाऱ्यांशी संवाद साधताना सावधगिरी बाळगा. अनावश्यक खर्च होऊ शकतो. आजचा दिवस तुम्ही संयमाने घालवाल. मात्र, काही काळाने परिस्थिती सुधारेल आणि मनात सकारात्मक विचार येतील.

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. यासाठी संबंधित तज्ज्ञाचा सल्ला घ्यावा.) 

महत्वाच्या बातम्या

Name Astrology: 'O' अक्षराच्या नावाचे लोक असतात लोकप्रिय आणि प्रतिष्ठित, सहजासहजी हार मानत नाहीत

Astrology : आयुष्यात प्रगती आणि आनंद हवा असेल, तर रविवारी करा हे 6 सोपे उपाय 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Donald Trump : तर संविधान बदलावं लागेल! डोनाल्ड ट्रम्प यांनी दुसऱ्यांदा निवडून येताच थेट देशाच्या संविधानालाच हात घातला
तर संविधान बदलावं लागेल! डोनाल्ड ट्रम्प यांनी दुसऱ्यांदा निवडून येताच थेट देशाच्या संविधानालाच हात घातला
Video: 'राहुल गांधींनीच मला राष्ट्रवादीत जाण्याचा प्रस्ताव दिला'; माझा कट्टावर राधाकृष्ण विखे पाटलांचा गौप्यस्फोट
Video: 'राहुल गांधींनीच मला राष्ट्रवादीत जाण्याचा प्रस्ताव दिला'; माझा कट्टावर राधाकृष्ण विखे पाटलांचा गौप्यस्फोट
Purva Walse Patil : शरद पवारांनी आंबेगावच्या सभेत दिलीप वळसे पाटील यांना गद्दार म्हटलं, पूर्वा वळसे पाटील पाण्याचा मुद्दा काढत म्हणाल्या.. होय...
शरद पवार यांच्याकडून दिलीप वळसे पाटील यांच्यावर आंबेगावत गद्दारीचा शिक्का मारला, पूर्वा वळसे पाटील म्हणाल्या...
Sharad Pawar In Kolhapur : कोल्हापूर जिल्ह्यात उद्या शरद पवारांच्या सभांचा धडाका; हसन मुश्रीफ पुन्हा टार्गेटवर असणार!
कोल्हापूर जिल्ह्यात उद्या शरद पवारांच्या सभांचा धडाका; हसन मुश्रीफ पुन्हा टार्गेटवर असणार!
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Muddyache Bola Amaravati| बडनेराचा गड राणा दाम्पत्य राखणार की नवीन चेहऱ्याला संधी मिळणार?Pankaja Munde : महाराष्ट्रात 'बटेंगे तो कटेंगे' घोषणांची गरज नाही : पंकजा मुंडेAshish Deshmukh : गडकरींच्या गावात भाजपची हवा;आशिष देशमुखांच्या रॅलीत लोकांचा उत्साहCM Shinde Speech Chatrapati Sambhajinagar | मोदींसाठी शायरी, 23 तारखेला मोठे फटाके फोडायचे- शिंदे

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Donald Trump : तर संविधान बदलावं लागेल! डोनाल्ड ट्रम्प यांनी दुसऱ्यांदा निवडून येताच थेट देशाच्या संविधानालाच हात घातला
तर संविधान बदलावं लागेल! डोनाल्ड ट्रम्प यांनी दुसऱ्यांदा निवडून येताच थेट देशाच्या संविधानालाच हात घातला
Video: 'राहुल गांधींनीच मला राष्ट्रवादीत जाण्याचा प्रस्ताव दिला'; माझा कट्टावर राधाकृष्ण विखे पाटलांचा गौप्यस्फोट
Video: 'राहुल गांधींनीच मला राष्ट्रवादीत जाण्याचा प्रस्ताव दिला'; माझा कट्टावर राधाकृष्ण विखे पाटलांचा गौप्यस्फोट
Purva Walse Patil : शरद पवारांनी आंबेगावच्या सभेत दिलीप वळसे पाटील यांना गद्दार म्हटलं, पूर्वा वळसे पाटील पाण्याचा मुद्दा काढत म्हणाल्या.. होय...
शरद पवार यांच्याकडून दिलीप वळसे पाटील यांच्यावर आंबेगावत गद्दारीचा शिक्का मारला, पूर्वा वळसे पाटील म्हणाल्या...
Sharad Pawar In Kolhapur : कोल्हापूर जिल्ह्यात उद्या शरद पवारांच्या सभांचा धडाका; हसन मुश्रीफ पुन्हा टार्गेटवर असणार!
कोल्हापूर जिल्ह्यात उद्या शरद पवारांच्या सभांचा धडाका; हसन मुश्रीफ पुन्हा टार्गेटवर असणार!
'ऑडी' इंडियाकडून नवीन लॅव्हिश ऑडी क्‍यू 7 चं बुकिंग सुूरू, लाँचिंगची तारीख ठरली; ताशी 250 चा हायस्पीड
'ऑडी' इंडियाकडून नवीन लॅव्हिश ऑडी क्‍यू 7 चं बुकिंग सुूरू, लाँचिंगची तारीख ठरली; ताशी 250 चा हायस्पीड
kolhapur dakshin Vidhan Sabha : कोल्हापूर दक्षिणमध्ये कोण मारणार बाजी? महाडिक पाटलांमध्ये पुन्हा एकदा निकराची लढाई
कोल्हापूर दक्षिणमध्ये कोण मारणार बाजी? महाडिक पाटलांमध्ये पुन्हा एकदा निकराची लढाई
... तर शेतकऱ्यांप्रमाणे आपण पण आत्महत्या केलेल्या बऱ्या; उद्धव ठाकरेंचा मोदी-शाहांवर हल्लाबोल, दिलं आव्हान
... तर शेतकऱ्यांप्रमाणे आपण पण आत्महत्या केलेल्या बऱ्या; उद्धव ठाकरेंचा मोदी-शाहांवर हल्लाबोल, दिलं आव्हान
Karad North Assembly Election 2024 : बाळासाहेब पाटील सहाव्यांदा रिंगणात, मनोज घोरपडेंना भाजपकडून संधी, कराड उत्तरचे मतदार कुणाला संधी देणार?
बाळासाहेब पाटील सहाव्यांदा रिंगणात, मनोज घोरपडेंना भाजपकडून संधी, कराड उत्तरचे मतदार कुणाला संधी देणार?
Embed widget