एक्स्प्लोर

Horoscope Today, September 25, 2022 : मेष ते मीन राशींच्या लोकांसाठी कसा असणार रविवारचा दिवस? जाणून घ्या आजचे राशीभविष्य

Horoscope Today September 25, 2022 : मेष राशीच्या लोकांना आज व्यवसायाच्या चांगल्या संधी मिळतील. वृषभ राशीच्या लोकांच्या घरातील वातावरण आनंदी राहील. वाचा संपूर्ण राशीभविष्य...

Horoscope Today September 25, 2022 : आज उत्तर भाद्रपद नक्षत्र असून, चंद्र सिंह राशीत आहे. दुपारनंतर चंद्र कन्या राशीत प्रवेश करेल. शनि आज मकर राशीत आहे. तर, गुरु मीन राशीत आहे. मेष राशीच्या लोकांना आज व्यवसायाच्या चांगल्या संधी मिळतील. वृषभ राशीच्या लोकांच्या घरातील वातावरण आनंदी राहील. वाचा संपूर्ण राशीभविष्य...

मेष (Aries Horoscope) : आज दिवसभर तुमचे मन आनंदी राहील. काही नवीन व्यवसायाचे प्रस्ताव मिळू शकतात. शासकीय कामात मोठ्या व्यक्तीची मदत मिळेल. पैसे कमावण्याच्या चांगल्या संधी मिळतील. कुटुंबियांसोबत मोकळा वेळ घालवाल. मित्र तुमच्याकडून कोणत्याही बाबतीत सल्ला घेऊ शकतात. जोडीदाराला तुमचा वेळ द्या. कौटुंबिक संबंध दृढ होतील.

वृषभ (Taurus Horoscope) : आजचा दिवस तुमच्यासाठी आनंदाचा आहे. आज कुटुंबातील वातावरण आनंददायी असेल. तुमच्या मनातील एखादी इच्छा पूर्ण होईल. नोकरीत असलेल्या लोकांना अनुभवी व्यक्तीचा सल्ला घेणे फायदेशीर ठरेल. मनातील योजना कुणालाही सांगू नका, अन्यथा त्यांचा फायदा घेतला जाईल. आर्थिक गोष्टींमध्येही काळजीपूर्वक निर्णय घ्या.

मिथुन (Gemini Horoscope) : आजचा दिवस तुमच्यासाठी संमिश्र असणार आहे. नकारात्मक विचार टाळा. व्यवसायात जास्त मेहनत घ्यावी लागेल. आरोग्याबाबत काळजी घेणे गरजेचे आहे. अनावश्यक खर्च वाढतील. साठवलेला पैसा खर्च होऊ शकतो. कौटुंबिक जीवन आनंदी राहील. एखाद्या व्यक्तीसोबत वैचारिक मतभेद होऊ शकतात. बोलण्यात संयम बाळगा.

कर्क (Cancer Horoscope) : आजचा दिवस तुमच्यासाठी महत्त्वाचा ठरणार आहे. महत्त्वाचे निर्णय आजच घ्यावे लागतील. मनातील विचारांच्या गोंधळामुळे तणाव आणि अस्वस्थतेचा सामना करावा लागू शकतो. परदेशात व्यापार् करणाऱ्यांना धनहानी होण्याची शक्यता आहे, त्यामुळे या दिवशी सावधपणे आणि विचारपूर्वक निर्णय घ्या. रागावर नियंत्रण ठेवा. एखाद्या बाबतीत आज तुमचा गैरसमज होऊ शकतो.

सिंह (Leo Horoscope) : आजचा दिवस तुमच्यासाठी अत्यंत काळजीचा असणार आहे. कार्यक्षेत्रात किंवा घरात नुकसान होण्याची शक्यता आहे, प्रत्येक काम काळजी घेऊनच करा. आज कोणत्याही व्यवसायात गुंतवणूक करू नका किंवा अनावश्यक गोष्टींवर पैसा खर्च करू नका. आर्थिक बाबतीत थोडीशी प्रगती होईल. काठीर प्रयत्नांना फळ मिळेल. सरकारी कामात सहकार्य मिळेल.

कन्या (Virgo Horoscope) : आजचा दिवस तुम्च्य्साठी आनंदाचा असणार आहे. नवीन तंत्रज्ञानाचा अवलंब केल्यास व्यवसायात वाढ होईल. उत्पादन कार्य देखील वाढू शकते. अधिकाऱ्यांशी समन्वय साधावा लागेल. कुटुंबात तुमच्या गुणांची प्रशंसा होईल. संगीत क्षेत्राशी निगडित व्यक्तींना आपली कला सादर करण्याची संधी मिळेल. जीवनसाथीसोबत मतभेद होऊ शकतात. आरोग्य चांगले राहील.

तूळ (Libra Horoscope) : आजचा दिवस तुमच्यासाठी खास असणार आहे. नोकरीच्या शोधात असलेल्या लोकांना नोकरीची नवीन ऑफर येऊ शकते. व्यवसाय करणाऱ्या लोकांना मोठ्या नफ्याच्या लालासेकडे दुर्लक्ष करावे लागेल. एखाद्या मंगल कार्याला हजेरी लावाल. ऑफिसमध्ये काम करणारे लोक व्यस्त वेळापत्रकातून वेळ काढून सहलीला जाऊ शकतात. मित्राकडून काही चांगली माहिती ऐकायला मिळेल.

वृश्चिक (Scorpio Horoscope) : आजचा दिवस तुमच्यासाठी संमिश्र फलदायी असणार आहे. आज तुमच्यात खूप आत्मविश्वास असेल. पण तरीही मन अस्वस्थ होऊ शकते. नोकरीत अधिकाऱ्यांशी विनाकारण वाद टाळा. एखाद्या जुन्या मित्राची भेट होऊ शकते. आरोग्याची काळजी घ्या. कामाच्या ठिकाणी बदल घडण्याची शक्यता आहे. अभ्यासात रस वाढेल. उत्पन्नात कमी आणि खर्च जास्त अशी परिस्थिती उद्भवेल.

धनु (Sagittarius Horoscope) : आजचा दिवस तुमच्यासाठी शुभ फलदायी असणार आहे. आर्थिक जीवनात आज आनंद राहील. याच्या मदतीने तुम्ही कर्जापासून मुक्त होऊ शकता. घरातील कामांमध्ये व्यस्त राहाल. जोडीदाराला नेहमी समजून घेण्याचा प्रयत्न करा. घरामध्ये एखाद्या मंगल कार्याचे आयोजन केले जाईल. अनावश्यक गोष्टींवर पैसे खर्च करताना नीट विचार करा.

मकर (Capricorn Horoscope) : आजच्या दिवशी तुम्हाला खूप काळजी घ्यावी लागणार आहे.  तुमच्या एखाद्या छोट्याशा चुकीमुळे कुटुंबाच्या प्रतिष्ठेवर वाईट परिणाम होऊ शकतो. यामुळे आज घरगुती वातावरण अशांत राहील. कार्यक्षेत्रातील मंदीनंतरही गरजेनुसार नफा नक्कीच मिळेल. कोणताही महत्त्वाचा निर्णय घेण्यापूर्वी एकदा नफा-तोट्याचा आढावा नक्की घ्या. वडीलधाऱ्यांचे सहकार्य मिळेल.

कुंभ (Aquarius Horoscope) : धनप्राप्तीसाठी आजचा दिवस तुमच्यासाठी चांगला आहे. जुन्या मित्रांना भेटून तुम्हाला आनंद होईल. व्यवसाय करणार्‍या लोकांसाठी आजचा दिवस महत्त्वाचा असणार आहे. तुमचे काही अनुभव क्षेत्रातील काही लोकांना उपयोगी पडू शकतात. व्यवसाय करणाऱ्या लोकांनी कोणताही किरकोळ फायद्याचा सौदा हाताबाहेर जाऊ देऊ नये. तुम्ही एखाद्या मंगल कार्यक्रमात सहभागी होऊ शकता.

मीन (Pisces Horoscope) : तुमचा दिवस चांगला जाईल. काही महत्त्वाचे काम पूर्ण होऊ शकते. आर्थिक बाजूत सुधारणा होईल. आई-वडिलांच्या पाठींब्याने आयुष्यात पुढे जाण्याचा प्रयत्न कराल. एखादा जुना मित्र तुम्हाला अचानक घरी भेटायला येऊ शकतो. वैवाहिक जीवन चांगले होईल. विद्यार्थ्यांना अभ्यासात वरिष्ठांचे सहकार्य मिळेल. अनावश्यक पैसा खर्च करण्यावर बंधने घालावी लागतील.

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. यासाठी संबंधित तज्ज्ञाचा सल्ला घ्यावा.) 

महत्वाच्या बातम्या

महत्त्वाच्या बातम्या

Raksha Bandhan 2026 : यंदा 27 की 28 ऑगस्ट? रक्षाबंधन नेमकी कधी? वाचा रक्षाबंधनाचा शुभ मुहूर्त आणि धार्मिक महत्त्व
यंदा 27 की 28 ऑगस्ट? रक्षाबंधन नेमकी कधी? वाचा रक्षाबंधनाचा शुभ मुहूर्त आणि धार्मिक महत्त्व
Lucky Zodiac Signs : 6 ऑगस्टचा दिवस ठरणार गेमचेंजर! दत्तगुरुंच्या कृपेने पुण्याचं फळ लवकरच मिळणार; धनसंपत्तीत भरभराट, वाचा लकी राशी
6 ऑगस्टचा दिवस ठरणार गेमचेंजर! दत्तगुरुंच्या कृपेने पुण्याचं फळ लवकरच मिळणार; धनसंपत्तीत भरभराट, वाचा लकी राशी
Lord Shiv: भगवान महाकाल यांची भस्म आरती फक्त ब्रह्ममुहूर्तावरच का केली जाते? यामागील रहस्य काय? कमी लोकांना माहित, धार्मिक, पौराणिक महत्त्व...
भगवान महाकाल यांची भस्म आरती फक्त ब्रह्ममुहूर्तावरच का केली जाते? यामागील रहस्य काय? कमी लोकांना माहित, धार्मिक, पौराणिक महत्त्व...
Surya Grahan 2026 : 11 किंवा 12 ऑगस्ट? वर्षातलं दुसरं सूर्यग्रहण नेमकं कधी दिसणार? भारतात सूर्यग्रहणाची वेळ काय? वाचा A to Z माहिती
11 किंवा 12 ऑगस्ट? वर्षातलं दुसरं सूर्यग्रहण नेमकं कधी दिसणार? भारतात सूर्यग्रहणाची वेळ काय? वाचा A to Z माहिती

व्हिडीओ

Sunil Tatkare On Congress : काँग्रेसने वैचारिक दिवाळखोरी दाखवली; सुनील तटकरेंचा घणाघाती हल्ला
Mumbai Police Salary Scam | पोलिसात ‘घुसखोरी’ पगारात चोरी | ABP Majha Special Report
Congress On Sunetra Pawar : गूंगी गुडियाचा टोला, वाद विकोपाला | Special Report ABP Majha
Ketan Agarwal Case Update : सियाचं कांड, लग्नाआधीच गुप्तहेरांना डिमांड | Special Report ABP Majha
Sanjay Raut Delhi PC : बिहारमधील निकालावरून संजय राऊतांचा भाजपवर हल्लाबोल

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
विलास घुले मृत्यू प्रकरण! खासदार बजरंग सोनवणेंच्या मुलाला अटक करा नाहीतर आम्ही… बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर घुले कुटुंबीयांचे आमरण उपोषण 
विलास घुले मृत्यू प्रकरण! खासदार बजरंग सोनवणेंच्या मुलाला अटक करा नाहीतर आम्ही… बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर घुले कुटुंबीयांचे आमरण उपोषण 
मुख्यमंत्र्यांनी 3 वर्षांपूर्वी उद्घाटन केलेला पूल गेला वाहून; ठेकेदारावर गुन्ह्याची मागणी, रोहित पवारांची खोचक टीका
मुख्यमंत्र्यांनी 3 वर्षांपूर्वी उद्घाटन केलेला पूल गेला वाहून; ठेकेदारावर गुन्ह्याची मागणी, रोहित पवारांची खोचक टीका
Video: 'ज्यांनी आमचं संरक्षण केलं पाहिजे तेच आम्हाला चोपून काढत आहेत' मुंबई पोलिसांची गाडी भर रस्त्यात अडवणाऱ्या रियासह देशातील तरुणी राहुल गांधींच्या भेटीला
Video: 'ज्यांनी आमचं संरक्षण केलं पाहिजे तेच आम्हाला चोपून काढत आहेत' मुंबई पोलिसांची गाडी भर रस्त्यात अडवणाऱ्या रियासह देशातील तरुणी राहुल गांधींच्या भेटीला
Shiv Sena Symbol Case : शिंदेंच्या 31 आमदारांनी स्वेच्छेने शिवसेना सोडली, पाठीशी महाशक्ती असल्याचा दावा म्हणजे पक्षविरोधी कारवाई; शिवसेनेच्या सुनावणीतील 25 मोठे मुद्दे
शिंदेंच्या 31 आमदारांनी स्वेच्छेने शिवसेना सोडली, पाठीशी महाशक्ती असल्याचा दावा म्हणजे पक्षविरोधी कारवाई; शिवसेनेच्या सुनावणीतील 25 मोठे मुद्दे
सावजी जेवणाच्या वक्तव्यावरुन वाद, तुकाराम मुंढेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, माफी मागण्याचा प्रश्नच नाही
सावजी जेवणाच्या वक्तव्यावरुन वाद, तुकाराम मुंढेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, माफी मागण्याचा प्रश्नच नाही
आता तर विधिमंडळ पक्ष दुसऱ्याच राजकीय पक्षात विलीन होत आहेत, लोकशाही मूल्यांचे रक्षण कसे करायचे, याचा निर्णय तुम्हालाच घ्यावा लागेल; कपिल सिब्बलांची 'सर्वोच्च' साद
आता तर विधिमंडळ पक्ष दुसऱ्याच राजकीय पक्षात विलीन होत आहेत, लोकशाही मूल्यांचे रक्षण कसे करायचे, याचा निर्णय तुम्हालाच घ्यावा लागेल; कपिल सिब्बलांची 'सर्वोच्च' साद
इकडं जंतर मंतरवर विद्यार्थ्यांना अमानुष मारहाण, राम मंदिर लुटीवर चर्चेसाठी विरोधक एकवटले अन् तिकडं संसदेत पराभव होऊन सुद्धा केंद्र सरकार मतदारसंघ पुनर्रचना विधेयक पुन्हा आणण्याच्या तयारीत
इकडं जंतर मंतरवर विद्यार्थ्यांना अमानुष मारहाण, राम मंदिर लुटीवर चर्चेसाठी विरोधक एकवटले अन् तिकडं संसदेत पराभव होऊन सुद्धा केंद्र सरकार मतदारसंघ पुनर्रचना विधेयक पुन्हा आणण्याच्या तयारीत
Tukaram Mundhe: ॲनालॉग पनीर काय आहे, 1 वर्षांनंतरही बंदी वाढवणार का? तुकाराम मुंढेंनी सगळं सांगितलं, म्हणाले, आरोग्याशी तडजोड नाही
ॲनालॉग पनीर काय आहे, 1 वर्षांनंतरही बंदी वाढवणार का? तुकाराम मुंढेंनी सगळं सांगितलं, म्हणाले, आरोग्याशी तडजोड नाही
Embed widget