एक्स्प्लोर

Horoscope Today,  September 16, 2022 : मेष ते मीन राशींच्या लोकांसाठी कसा असेल आजचा दिवस? जाणून घ्या आजचे राशीभविष्य

Horoscope Today, September 16,  2022 : मेष राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस उत्साहाचा असेल. वृषभ राशीच्या लोकांना आज आर्थिक फायदा होऊ शकतो. वाचा संपूर्ण राशीभविष्य...

Horoscope Today, September 16,  2022 : आज कृतिका नक्षत्र आहे. चंद्र वृषभ राशीत आहे. शनि आज मकर राशीत आहे. गुरु मीन राशीत आहे आणि सूर्य सिंह राशीत आहे. मेष राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस उत्साहाचा असेल. वृषभ राशीच्या लोकांना आज आर्थिक फायदा होऊ शकतो. वाचा संपूर्ण राशीभविष्य...

मेष (Aries Horoscope) : आजच्या दिवसाची सुरुवात उत्साहाने होईल. शारीरिक आणि मानसिक आरोग्यही चांगले राहील. कौटुंबिक वातावरण आनंददायी राहील. मित्र, प्रियजनांशी गोड बोलाल. दुपारनंतर आरोग्यात बदल होऊ शकतो. कुटुंबातील सदस्यांसोबत मतभेद निर्माण होऊ शकतात. खाण्यापिण्यात संयम ठेवा. कोणाशीही बोलताना आक्रमक भाषा वापरू नका. बोलण्यावर संयम ठेवा.

वृषभ (Taurus Horoscope) : आजचा दिवस तुमच्यासाठी सामान्य असेल. व्यवसाय करणारे लोक आज आत्मविश्वासाने परिपूर्ण असल्यामुळे त्यांना भरपूर पैसे मिळतील. सरकारी नोकरीत असणाऱ्या लोकांना त्रास होऊ शकतो. स्वतःसाठी थोडा वेळ काढाल आणि काही महत्त्वाच्या गोष्टी खरेदी देखील करू शकता, ज्यामुळे तुमच्या कुटुंबातील एखाद्या सदस्याला तुमचा हेवा वाटू शकतो.

मिथुन (Gemini Horoscope) : बोलण्यात संयम ठेवा. नव्या नोकरीच्या संधी मिळू शकतात. मित्रांसोबत वैचारिक मतभेद होऊ शकतात. संपत्ती कमी होईल. भाऊ-बहिणीच्या सहकार्याने व्यवसायात वाढ होऊ शकते. मनःशांती असेल, पण नकारात्मकतेचा प्रभावही असू शकतो. सावध रहा. एखाद्या मित्राच्या मदतीने प्रॉपर्टीमध्ये गुंतवणूक करू शकता. शैक्षणिक कार्यात अनपेक्षित यश मिळेल. प्रवासाला जाऊ शकता.

कर्क (Cancer Horoscope) : विद्यार्थ्यांसाठी आजचा दिवस यशाचा आहे. कोणतीही प्रलंबित कामे पूर्ण होतील. मनात आत्मविश्वास राहील. पण, अतिराग करणे टाळा. बोलण्यावर नियंत्रण ठेवा. व्यवसायात वाढ होईल. कार्यक्षेत्रात प्रगती होईल. शैक्षणिक स्पर्धेत अपेक्षित यश मिळेल. एखाद्या विशिष्ट व्यक्तीसोबत वादामुळे तणाव निर्माण होऊ शकतो. पैसा जपून खर्च करा.

सिंह (Leo Horoscope) : कौटुंबिक आणि व्यावसायिक क्षेत्रात आजचा दिवस चांगला जाईल. दोन्ही ठिकाणी आवश्यक चर्चा होण्यास थोडा वेळ लागेल. कामाचा ताण वाढल्यामुळे तब्येत थोडीशी सुस्त राहील. मात्र, प्रिय मित्राच्या भेटीने दिवस आनंदात जाईल. प्रवास किंवा पर्यटनाचे आयोजन केले जाईल. सामाजिक कार्यात सहभागी होण्याची इच्छा पूर्ण होऊ शकते.

कन्या (Virgo Horoscope) :  आजचा दिवस तुमच्यासाठी काही समस्या घेऊन येईल. आरोग्याच्या काही समस्यांमुळे तुम्ही चिंतेत असाल. विरोधक आज तुमच्या कामात अडथळे आणण्याचा पुरेपूर प्रयत्न करतील, त्यामुळे तुम्हाला सावध राहावे लागेल. आज तुम्हाला धावपळ करावी लागेल, तरच यश येताना दिसत आहे. विद्यार्थी आपला अभ्यास सोडून इकडे-तिकडे लक्ष देतील.

तूळ (Libra Horoscope) : आजचा दिवस आळसाचा असेल. बोलण्यात उग्रपणा दिसून येईल. कुटुंबाच्या सहकार्याने व्यवसायात वाढ होऊ शकते. प्रलंबित कामे पूर्ण होतील. मन प्रसन्न राहील. मित्राच्या मदतीने नोकरीच्या संधी मिळू शकतात. उत्पन्न वाढेल. आरोग्याची काळजी घ्या. आत्मविश्वास वाढेल. सरकारी कामात यश मिळेल. नोकरीत कामाच्या ठिकाणी अनुकूल परिस्थिती राहील.

वृश्चिक (Scorpio Horoscope) : आजचा दिवस तुमच्यासाठी शुभ परिणाम घेऊन येईल. आर्थिक परिस्थितीची चिंता आज संपेल. कामाच्या ठिकाणी मन प्रसन्न राहील आणि तुमची सर्व कामे सहज पूर्ण होतील. काही लोकांना नव्या नोकरीची ऑफरही मिळू शकते. तुम्ही तुमच्या कुटुंबातील सदस्यांशी संवाद साधण्यात थोडा वेळ घालवाल. आज तुम्हाला वरिष्ठांशी वादविवाद टाळावे लागतील.

धनु (Sagittarius Horoscope) : आज तुम्हाला अनेक दिवसांपासून व्यवसायात अडकलेले पैसे परत मिळतील. कुटुंबासोबत प्रवासाचे योगही आहेत. जोडीदाराचे सहकार्य मिळेल. भौतिक सुखांमध्ये वाढ होऊ शकते. लाभाच्या संधी मिळतील. संयमाचा अभाव राहील. स्वावलंबी व्हा. सरकारी यंत्रणेकडून सहकार्य मिळेल. नात्यात जवळीकता वाढेल. कौटुंबिक जीवन आनंदी राहील. आर्थिक बाजू मजबूत राहील.

मकर (Capricorn Horoscope) : आज तुम्ही मानसिकदृष्ट्या अस्वस्थ आणि गोंधळलेले असाल. कोणताही ठोस निर्णय घेऊ शकणार नाही. त्यामुळे तुम्ही तणावाखाली राहाल. तुम्हाला नशिबाची साथ मिळणार नाही. निराशाचे भावना मनात येईल. कुटुंबातील सदस्यांच्या चिंता सतावेल. घरातील ज्येष्ठांचे आरोग्य बिघडू शकते. तुम्ही शारीरिकदृष्ट्या अस्वस्थ राहू शकता. आज वादात न पडणे हिताचे राहील.

कुंभ (Aquarius Horoscope) : आजचा दिवस आर्थिकदृष्ट्या चांगला जाईल. उत्पन्न वाढेल. आरोग्याची काळजी घ्या. शैक्षणिक कार्यात अडचणी येऊ शकतात. कुटुंबाचे सहकार्य मिळेल. उत्पन्नाचे नवीन स्रोत विकसित होऊ शकतात. खर्चही वाढतील. नोकरीत अधिकार्‍यांचे सहकार्य लाभेल. कार्यक्षेत्रात बदल होऊ शकतो. कामाचा व्याप वाढू शकतो. अनावश्यक गोष्टींमध्ये पैसा खर्च करू नका.

मीन (Pisces Horoscope) : आज कुटुंबातील वाद आणि दुरावा मिटेल. काही नवीन काम सुरू केले, तर त्याचा लाभ मिळेल. नोकरी करणाऱ्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला राहील. त्यांच्यावर अधिकाऱ्यांची कृपा राहील. आज कोणतेही महत्त्वाचे काम पुढे ढकलणे टाळावे लागेल, अन्यथा ते तुमच्यासाठी अडचणीचे ठरू शकते. महत्त्वाच्या कामांवर लक्ष केंद्रित करावे लागेल.

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. यासाठी संबंधित तज्ज्ञाचा सल्ला घ्यावा.) 

महत्वाच्या बातम्या

महत्त्वाच्या बातम्या

Shani Nakshatra Parivartan 2026 : दोन ग्रहांच्या दरम्यान शनिचं नक्षत्र परिवर्तन; 'या' 3 राशींच्या अडचणींत होणार डबल वाढ, वेळोवेळी सावधानतेचा इशारा
दोन ग्रहांच्या दरम्यान शनिचं नक्षत्र परिवर्तन; 'या' 3 राशींच्या अडचणींत होणार डबल वाढ, वेळोवेळी सावधानतेचा इशारा
Guru Gochar 2026 : बुधच्या नक्षत्रात गुरुची एन्ट्री, 'या' 4 राशींसाठी ऑक्टोबरपर्यंतचा काळ असणार शुभ, तुमची रास यात आहे?
बुधच्या नक्षत्रात गुरुची एन्ट्री, 'या' 4 राशींसाठी ऑक्टोबरपर्यंतचा काळ असणार शुभ, तुमची रास यात आहे?
Mangalagaur 2026: यंदा मंगळागौर कधीपासून आहे? लग्नानंतर पहिली 5 वर्षे व्रताची परंपरा काय? व्रताचे फळ? धार्मिक महत्त्व, पूजा पद्धत, तिथी, पौराणिक कथा... 
यंदा मंगळागौर कधीपासून आहे? लग्नानंतर पहिली 5 वर्षे व्रताची परंपरा काय? व्रताचे फळ? धार्मिक महत्त्व, पूजा पद्धत, तिथी, पौराणिक कथा... 
Shravan 2026 : भगवान शंकराला बेलपत्र प्रिय; पण घरात बेलपत्राचं रोप लावणं शुभ की अशुभ? वास्तूशास्त्रात म्हटलंय...
भगवान शंकराला बेलपत्र प्रिय; पण घरात बेलपत्राचं रोप लावणं शुभ की अशुभ? वास्तूशास्त्रात म्हटलंय...

व्हिडीओ

Sanjay Raut Delhi PC : बिहारमधील निकालावरून संजय राऊतांचा भाजपवर हल्लाबोल
Prashant Kishor Bankipur Bypoll Election : बांकीपूर पोटनिवडणुकीत भाजपचा पराभव अहंकारामुळे झाला
Tukaram Mundhe News: तुकाराम मुंढेंच्या FDA ला मुंबई हायकोर्टाचा दणका; नेमकं काय घडलं?
Liquor Brands Banned: भारतात कोणत्या ब्रँड्सच्या रम आणि व्हिस्कीवर बंदी?, A टू Z माहिती
BMC Corrupt Officer : कारवाई झालेले २०७ पैकी ११२ अधिकारी सेवेत, प्रकरण काय? | Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Trisha Krishnan : 'पाणी तिथे पोहोचलं पाहिजे...' त्रिशा कृष्णनवर उदयनिधी स्टॅलिन यांचे डबल मिनिंग वक्तव्य; हायकोर्टाचा मोठा आदेश
'पाणी तिथे पोहोचलं पाहिजे...' त्रिशा कृष्णनवर उदयनिधी स्टॅलिन यांचे डबल मिनिंग वक्तव्य; हायकोर्टाचा मोठा आदेश
Air India Flight Turbulence: एअर इंडियाचे विमान थांबले, उलटे-सुलटे झाले; अचानक भीषण टर्ब्युलन्स, अनेकजण जखमी, प्रवाशाने सांगितला थरारक प्रसंग
एअर इंडियाचे विमान थांबले, उलटे-सुलटे झाले; अचानक भीषण टर्ब्युलन्स, अनेकजण जखमी, प्रवाशाने सांगितला थरारक प्रसंग
तानाजी सावंत अन् मोटेंचं समर्थक भिडले; धाराशिवमध्ये महायुतीत राडा, शिवसेना-राष्ट्रवादी भिडले, 10 गाड्या फोडल्या
तानाजी सावंत अन् मोटेंचं समर्थक भिडले; धाराशिवमध्ये महायुतीत राडा, शिवसेना-राष्ट्रवादी भिडले, 10 गाड्या फोडल्या
Maharashtra Goverment Cabinet Decision: पिंपरी-चिंचवडमध्ये विशेष मोटार वाहन न्यायालय होणार; मंत्रिमंडळाच्या बैठकीत राज्य सरकारचे 7 धडाकेबाज निर्णय
पिंपरी-चिंचवडमध्ये विशेष मोटार वाहन न्यायालय होणार; मंत्रिमंडळाच्या बैठकीत राज्य सरकारचे 7 धडाकेबाज निर्णय
काँग्रेसकडून 'गुंगी गुडिया' टीकेचं समर्थन; हर्षवर्धन सपकाळांनी सांगितलं कारण, सुनेत्रा पवारांना मोलाचा सल्ला
काँग्रेसकडून 'गुंगी गुडिया' टीकेचं समर्थन; हर्षवर्धन सपकाळांनी सांगितलं कारण, सुनेत्रा पवारांना मोलाचा सल्ला
Arvind Kejriwal: E20 इंधनाविरोधात दिल्लीत अरविंद केजरीवाल यांचा एल्गार, पंतप्रधान मोदींच्या निवासस्थानाकडे आपचा मोर्चा; अमेरिकेच्या दबावाखाली देशावर निर्णय थोपवल्याचा आरोप
E20 इंधनाविरोधात दिल्लीत अरविंद केजरीवाल यांचा एल्गार, पंतप्रधान मोदींच्या निवासस्थानाकडे आपचा मोर्चा; अमेरिकेच्या दबावाखाली देशावर निर्णय थोपवल्याचा आरोप
DY Patil Passed Away : पहिली IPL फायनल, महिला विश्वविजेतेपदाला गवसणी, नवी मुंबईतील डी वाय पाटील क्रिकेट स्टेडियमच्या निर्मितीची कहाणी!
पहिली IPL फायनल, महिला विश्वविजेतेपदाला गवसणी, नवी मुंबईतील डी वाय पाटील क्रिकेट स्टेडियमच्या निर्मितीची कहाणी!
बीडमधील व्हिडिओ, सुनेत्रा पवारांना 'गुंगी गुडिया' म्हणत काँग्रेसची बोचरी टीका; राष्ट्रवादीचा पलटवार, एकनाथ शिंदेंनीही सुनावलं
बीडमधील व्हिडिओ, सुनेत्रा पवारांना 'गुंगी गुडिया' म्हणत काँग्रेसची बोचरी टीका; राष्ट्रवादीचा पलटवार, एकनाथ शिंदेंनीही सुनावलं
Embed widget