एक्स्प्लोर

Horoscope Today, October 18, 2022 : मिथुन, कर्कसह ‘या’ राशींना मिळणार आर्थिक लाभ! जाणून घ्या आजचे राशीभविष्य

Horoscope Today, October 18, 2022 : मेष राशीच्या लोकांचे मन आध्यात्मिक कार्यात जास्त रमेल. वृषभ राशीच्या लोकांना व्यवसायात फायदा होईल. वाचा आजचे संपूर्ण राशीभविष्य...

Horoscope Today, October 18, 2022 : आज पुष्य नक्षत्र असून चंद्र कर्क राशीत आहे. शनि आज मकर राशीत आहे. गुरु मीन राशीत आहे. सूर्य तूळ राशीत आहे. मेष राशीच्या लोकांचे मन आध्यात्मिक कार्यात जास्त रमेल. वृषभ राशीच्या लोकांना व्यवसायात फायदा होईल. वाचा आजचे संपूर्ण राशीभविष्य...

मेष (Aries Horoscope) : आज तुमचे मन आध्यात्मिक कार्यात जास्त रमेल. नोकरीच्या ठिकाणी आनंददायी वाटेल. व्यवसायात बदलाची संधी मिळू शकते. आत्मविश्वास भरपूर असेल. मुलांकडून काही चांगली बातमी मिळू शकते. लव्ह लाईफ चांगले असेल. राजकारण्यांना फायदा होईल. मात्र, व्यवसायात व्यत्यय येऊ शकतो. कौटुंबिक बाबींमध्ये पैसा खर्च अधिक होईल. पैशाच्याबाबतीत सावधगिरी बाळगा.

वृषभ (Taurus Horoscope) : आज तुम्हाला तुमच्या मित्राकडून काही महत्त्वाची माहिती मिळू शकते. नोकरी सोडून कोणताही व्यवसाय करायचा असेल, तर आजचा दिवस त्याच्यासाठी चांगला आहे. सामाजिक कार्यात सक्रिय सहभाग घ्याल, त्यामुळे तुमची विश्वासार्हताही सर्वत्र पसरेल. कौटुंबिक संबंध दृढ होतील. नात्यांमध्ये आलेली कटुता आज दूर होईल. पैसा जपून खर्च करा.

मिथुन (Gemini Horoscope) : दिवसाच्या पूर्वार्धात लाभ होण्याची शक्यता आहे. नोकरी-व्यवसायाशी संबंधित काही प्रश्न सुटतील. कोणताही व्यवसाय छोटा किंवा मोठा नसतो, एकदा अनुभव आला की, तो समजून घ्या. संध्याकाळचा वेळ मित्र आणि कुटुंबियांसोबत आनंदात घालवला जाईल. व्यावसायिक प्रयत्नांना फळ मिळेल. शैक्षणिक स्पर्धेत अपेक्षित यश मिळेल. जोडीदाराचे सहकार्य मिळेल.

कर्क (Cancer Horoscope) : धनलाभ होऊ शकतो. दीर्घकाळ टिकणाऱ्या अशा कामातून फायदा होईल. आज अनेक मनोरंजक कल्पना आणि योजना बनवता येतील. अविवाहित लोकांचे लग्न देखील निश्चित केले जाऊ शकते. तुमच्या बुद्धीने तुम्ही तुमचे काम पूर्ण करू शकता. आज तुम्ही स्वतःला सिद्ध करून दाखवाल. आर्थिक बाजू मजबूत राहील. सर्जनशील कार्यात यश मिळेल. कार्यक्षेत्रात सुरू असलेले प्रयत्न फलदायी ठरतील.

सिंह (Leo Horoscope) : व्यवसायात बदल होऊ शकतो. लाभाच्या संधी मिळतील. पैसा वाढेल. आरोग्याबाबत सावध राहा. वाचनाची आवड निर्माण होईल. शैक्षणिक कार्यात मानसन्मान मिळू शकतो. व्यवसायात लाभाच्या संधी मिळतील. मन उदास राहील. एखाद्या अज्ञात भीतीने तुम्ही त्रस्त असाल. कुटुंबासोबत धार्मिक स्थळी सहलीचे नियोजन होऊ शकते. एखाद्या मित्राची मदत मिळू शकते.

कन्या (Virgo Horoscope) : उधार दिलेले पैसे परत मिळण्याची शक्यता आहे. विद्यार्थ्यांना अभ्यासात योग्य यश मिळेल. जमीन किंवा वाहन खरेदीसाठी संबंधित कर्ज घ्यावे लागू शकते. पण काळजी करू नका, हे कर्ज लवकरच फेडले जाईल. जमिनीशी संबंधित खरेदीही फायदेशीर ठरेल. नकारात्मक प्रवृत्ती असलेल्या लोकांपासून दूर राहा. कारण यामुळे तुमच्या सन्मानालाही हानी पोहोचू शकते. रागावर नियंत्रण ठेवणे खूप गरजेचे आहे.

तूळ (Libra Horoscope) : तुमची कल्पनाशक्ती आणि अंतर्ज्ञान यामुळे आज अनेक चांगल्या गोष्टी घडतील. त्यातून फायदा होण्याची शक्यता आहे. आज तुम्ही असे काम करावे, ज्यामुळे तुमची प्रशंसा होईल. असे केल्याने तुम्हाला आराम आणि समाधान वाटू शकते. कोणतेही महत्त्वाचे काम दुपारपूर्वीच करा. याआधीचा काळ तुमच्यासाठी शुभ आहे. कोणत्याही गोष्टीला दिरंगाई करू नका.

वृश्चिक (Scorpio Horoscope) : आजचा दिवस तुमच्यासाठी सकारात्मक परिणाम देईल. आज तुमच्या व्यवसायाशी संबंधित काही योजनांना गती मिळू शकते, ज्यामुळे तुम्हाला चांगला फायदा होईल. आजचा दिवस तुमच्यासाठी भाग्याच्या दृष्टीकोनातून चांगला असणार आहे. लांबच्या प्रवासाला जाण्याची संधी मिळणार आहे. यातून काही चांगली माहितीही ऐकायला मिळेल.

धनु (Sagittarius Horoscope) : राग आणि उत्कटतेचा अतिरेक टाळा. मित्राच्या मदतीने नोकरीच्या संधी मिळू शकतात. कार्यक्षेत्र वाढेल. संतती सुखात वाढ होईल. धर्माबद्दल आदर राहील. कुटुंबात सुख-शांती नांदेल. मान-प्रतिष्ठेत वाढ होईल. संयमाचा अभाव राहील. जोडीदाराला आरोग्याच्या समस्या असू शकतात. खर्च जास्त होईल.पैसा जपून वापर अन्यथा आर्थिक संकट येऊ शकते.

मकर (Capricorn Horoscope) : अचानक एखाद्या जुन्या मित्राला भेटण्याची शक्यता आहे. जे तुम्हाला एक सुखद अनुभूती देईल. परंतु विद्यार्थ्यांसाठी आजचा दिवस कठीण जाऊ शकतो. वैयक्तिक आणि व्यावसायिक जीवनात सावध राहावे लागेल. जेव्हा तुम्हाला कोणत्याही प्रकारचा अडथळा येतो, तेव्हा त्याला हुशारीने सामोरे जाण्याचा प्रयत्न करा. राग व्यक्त करणे टाळा.

कुंभ (Aquarius Horoscope) : आज तुम्हाला स्वावलंबी व्हावे लागेल. आरोग्याबाबत सावध राहा. शैक्षणिक कामात अडचणी येऊ शकतात. नोकरीत बदल होण्याची शक्यता आहे. मनात विचारांचे काहूर असेल. शैक्षणिक कामात व्यत्यय येऊ शकतो. खर्च जास्त होईल. मित्रांचे सहकार्य मिळेल. स्वभावात चिडचिडेपणा राहील. कुटुंबात धार्मिक कार्ये होऊ शकतात.  

मीन (Pisces Horoscope) : तुम्ही उत्साहाने काम पूर्ण कराल, त्यामुळे तुमचे मनोबलही उंचावेल. परंतु, आज तुमच्यावर काही अतिरिक्त जबाबदाऱ्यांचा भार पडू शकतो, ज्यामुळे घाबरून जाण्याची गरज नाही. तुमच्या वागण्याने प्रत्येकजण प्रभावित होईल आणि काम करणाऱ्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला असेल. वडीलधार्‍यांचे ऐकल्याने तुम्हाला काही कामात चांगला फायदा होऊ शकतो.

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.) 

महत्वाच्या बातम्या

महत्त्वाच्या बातम्या

Hindu Religion : शिवलिंगासमोर उभं राहून टाळी वाजविणे पुण्य की पाप? जाणून घ्या 3 टाळ्यांमागचं खरं रहस्य
शिवलिंगासमोर उभं राहून टाळी वाजविणे पुण्य की पाप? जाणून घ्या 3 टाळ्यांमागचं खरं रहस्य
Shravan 2026 : श्रावणापासून ते कार्तिकपर्यंत चुकूनही खाऊ नका 'या' 4 गोष्टी; अन्यथा...आरोग्य आणि ग्रहांवर पडू शकतो परिणाम  
श्रावणापासून ते कार्तिकपर्यंत चुकूनही खाऊ नका 'या' 4 गोष्टी; अन्यथा...आरोग्य आणि ग्रहांवर पडू शकतो परिणाम  
Rahu Gochar 2026 : शनिच्या मकर राशीत राहूची एन्ट्री; वर्षाच्या शेवटी 'या' 3 राशींवर कोसळणार संकट, नोकरी, करिअर, प्रेम सगळंच...
शनिच्या मकर राशीत राहूची एन्ट्री; वर्षाच्या शेवटी 'या' 3 राशींवर कोसळणार संकट, नोकरी, करिअर, प्रेम सगळंच...
Baba Vanga Prediction : बाबा वेंगाची भविष्यवाणी! पुढच्या 7 दिवसांत 'या' 5 राशींवर होणार धनवर्षाव; नोकरीत प्रमोशनची मोठ्ठी संधी, वाचा लकी राशी
बाबा वेंगाची भविष्यवाणी! पुढच्या 7 दिवसांत 'या' 5 राशींवर होणार धनवर्षाव; नोकरीत प्रमोशनची मोठ्ठी संधी, वाचा लकी राशी

व्हिडीओ

Chandrapur Flood : पुराच्या वेढ्यात चंद्र'पूर', वर्धा नदीच्या पाणीपातळीत मोठी वाढ | Special Report
Amit Thackeray : समोर उत्साह...आणि अमित ठाकरे भाषणच विसरले, का होतेय चर्चा? | Special Report
Raj Thackeray Mumbai Speech : मोदीजी, दुसऱ्यांना आया आहेत विसरु नका, UNCUT Speech
Narendra Modi On Jantar Mantar : मला आणि माझ्या आईला शिवीगाळ, मोदींकडून नवीन व्हिडिओ पोस्ट
Shinde vs Thackeray Abhijeet Dipke : दिपकेंची क्रेझ वाढली शिवसेनेत जुंपली Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ajinkya Rahane: अजिंक्य रहाणेच्या निवृत्तीने केकेआरमध्ये नेतृत्वाची पोकळी, नव्या कॅप्टनसाठी तीन नावे समोर! किंग खान कोणाला मान देणार?
अजिंक्य रहाणेच्या निवृत्तीने केकेआरमध्ये नेतृत्वाची पोकळी, नव्या कॅप्टनसाठी तीन नावे समोर! किंग खान कोणाला मान देणार?
Arvind Kejriwal: E-20 पेट्रोलविरोधात अरविंद केजरीवालांचा एल्गार; सरकारकडे तीन मागण्या अन् थेट पीएम मोदींच्या निवासस्थानापर्यंत 4 ऑगस्टला किती लोकांचा मोर्चा नेणार हे सुद्धा सांगितलं
E-20 पेट्रोलविरोधात अरविंद केजरीवालांचा एल्गार; सरकारकडे तीन मागण्या अन् थेट पीएम मोदींच्या निवासस्थानापर्यंत 4 ऑगस्टला किती लोकांचा मोर्चा नेणार हे सुद्धा सांगितलं
Kaas Pathar Satara : पर्यटनाचा हंगाम सुरू होण्याआधीच रानहळदीचा बहर, साताऱ्याचं कास पठार वेगवेगळ्या रंगांनी फुललं
पर्यटनाचा हंगाम सुरू होण्याआधीच रानहळदीचा बहर, साताऱ्याचं कास पठार वेगवेगळ्या रंगांनी फुललं
Raj Thackeray and Ameet Satam: राज ठाकरेंचा एकही खासदार-आमदार नाही, फक्त 6 नगरसेवक; त्यांच्याच मेंदूचे फूटप्रिंट काढायला हवेत: अमित साटम
राज ठाकरेंचा एकही खासदार-आमदार नाही, फक्त 6 नगरसेवक; त्यांच्याच मेंदूचे फूटप्रिंट काढायला हवेत: अमित साटम
राम-लक्ष्मणाच्या जोडीसारखीच आज देशप्रेमी जनता 'मोदी-शाह' जोडीकडे पाहते : एकनाथ शिंदे
राम-लक्ष्मणाच्या जोडीसारखीच आज देशप्रेमी जनता 'मोदी-शाह' जोडीकडे पाहते : एकनाथ शिंदे
मोदी म्हणतात, ज्यांनी ट्रोलिंग केलंय, त्यांना मी माफ करतो, मग NEET पेपर फुटल्यानं ज्या मुलांनी आयुष्य संपवलं त्यांच्या आई-वडिलांची कोण माफी मागणार? डोकी फोडली त्यांचं काय करणार? राज ठाकरेंचा सवाल
मोदी म्हणतात, ज्यांनी ट्रोलिंग केलंय, त्यांना मी माफ करतो, मग NEET पेपर फुटल्यानं ज्या मुलांनी आयुष्य संपवलं त्यांच्या आई-वडिलांची कोण माफी मागणार? डोकी फोडली त्यांचं काय करणार? राज ठाकरेंचा सवाल
Ajit Doval Pune : भारताच्या सुरक्षाव्यवस्थेचा कायापालट करणाऱ्या अजित डोवालांचं पुण्यातील भाषण, जेन झीला सुनावलं, म्हणाले...
भारताच्या सुरक्षाव्यवस्थेचा कायापालट करणाऱ्या अजित डोवालांचं पुण्यातील भाषण, जेन झीला सुनावलं, म्हणाले...
Raj Thackeray on PM Modi: दुसऱ्यांच्याही आया आहेत हे मोदींनी विसरु नये, भाजपने 12 वर्षात जे पेरलं, त्याच शिव्या वाट्याला आल्या, राज ठाकरेंचा हल्लाबोल
दुसऱ्यांच्याही आया आहेत हे मोदींनी विसरु नये, भाजपने 12 वर्षात जे पेरलं, त्याच शिव्या वाट्याला आल्या, राज ठाकरेंचा हल्लाबोल
Embed widget