Horoscope Today, November 19, 2022 : वृश्चिक, कुंभ आणि मीन राशीच्या लोकांसाठी आज प्रगतीचा दिवस, वाचा राशीभविष्य
Horoscope Today, November 19, 2022 : आज तुम्हाला कोणत्या आव्हानांचा सामना करावा लागू शकतो किंवा तुम्हाला कोणत्या प्रकारच्या संधी मिळू शकतात? वाचा राशीभविष्य

Horoscope Today, November 19, 2022 : शनिवारचा दिवस अनेक राशींसाठी खास असणार आहे. ज्योतिष शास्त्रानुसार आज अनेक राशींना धनासोबतच व्यवसायात फायदा होणार आहे. जाणून घ्या राशीनुसार आजचा दिवस कसा राहील? आजचे राशीभविष्य (Todays Horoscope) तुम्हाला नोकरी, व्यवसाय, व्यवहार, कुटुंब आणि मित्रांसोबतचे संबंध, आरोग्य आणि दिवसभरातील शुभ-अशुभ घटनांचे भाकीत देते. हे राशीभविष्य वाचून तुम्ही तुमच्या दैनंदिन योजना यशस्वी करू शकाल. ग्रह आणि नक्षत्राच्या हालचालीवर आधारित या दिवशी तुमचे तारे तुमच्यासाठी अनुकूल आहेत की नाही? आज तुम्हाला कोणत्या आव्हानांचा सामना करावा लागू शकतो किंवा तुम्हाला कोणत्या प्रकारच्या संधी मिळू शकतात? दैनंदिन राशीभविष्य वाचून तुम्ही संधी आणि आव्हाने या दोन्ही परिस्थितीसाठी तयार होऊ शकता.
मेष
आजचा दिवस तुमच्यासाठी आत्मविश्वासाने भरलेला असेल. तुमच्या क्षेत्रात तुम्ही आज चांगले स्थान निर्माण करू शकाल. विद्यार्थ्याच्या उच्च शिक्षणाचा मार्ग मोकळा होईल. कोणतेही काम उत्साहाने करा, त्यात तुम्हाला नक्कीच यश मिळेल. तुमच्यावर काही जबाबदाऱ्या असतील तर त्या वेळेत पूर्ण कराव्यात. तुम्ही तुमच्या उद्दिष्टांवर ठाम राहा, प्रॉपर्टीशी संबंधित कोणताही व्यवहार काळजीपूर्वक करावा लागेल,
वृषभ
आजचा दिवस तुमच्यासाठी सामान्य असेल. तुम्ही तुमच्या कुटुंबातील सदस्यांसह एखाद्या शुभ कार्यक्रमात सहभागी होऊ शकता. करिअरबाबत काही चिंता असेल, तर त्यातून तुमची सुटका होईल. खूप दिवसांनी एखाद्या मित्राला भेटण्याची संधी मिळेल. शेअर बाजार किंवा लॉटरीत पैसे गुंतवणाऱ्यांसाठी आजचा दिवस चांगला असणार आहे.
मिथुन
आजचा दिवस तुमच्यासाठी व्यस्त असणार आहे. अनेक दिवसांपासून अडकलेले पैसे मिळू शकतील. घरातील सदस्यांमध्ये काही मतभेद झाले असतील, तर ते चर्चेतूनच संपुष्टात येतील. तुम्ही तुमच्या व्यवसायात काही नवीन तंत्रांचा अवलंब करून नवीन कामे सुरू करू शकता, ज्यामध्ये कोणाचा सल्ला घेणे चांगले राहील. कोणाशीही उद्धटपणे बोलू नका, तुम्ही घरातील काही कामांकडेही पूर्ण लक्ष द्याल.
कर्क
आजचा दिवस तुमच्यासाठी प्रगतीचा दिवस असेल. तुमचे कौटुंबिक संबंध मजबूत होतील, तसेच काही नवीन संपर्कांचाही तुम्हाला फायदा होईल. आज सहलीला जाण्याचा योग येऊ शकतो. तुम्हाला तुमच्या जोडीदारापासून काहीही लपवले असेल तर ते आजच स्पष्ट सांगा. तुमचा कोणताही जुना व्यवहार तुमच्यासाठी अडचणीचा ठरू शकतो. घरातील सदस्याची तब्येत अचानक बिघडल्यामुळे तुम्ही थोडे चिंतेत असाल.
सिंह
आजचा दिवस तुमच्यासाठी आनंदाचा असणार आहे. तुमच्या आयुष्याच्या जोडीदाराला दिलेले वचन पूर्ण कराल. नोकरीच्या ठिकाणी तुमचा आदर वाढल्यामुळे तुमचे मन प्रसन्न राहील. घरातील कोणत्याही शुभ कार्यक्रमामुळे तुमचा सहभाग असेल. व्यवहारात आज तुम्ही चांगला नफा मिळवू शकाल.
कन्या
आजचा दिवस तुमच्यासाठी संमिश्र जाणार आहे. आज तुम्हाला काही गोष्टीत ताबडतोब निर्णय घ्यावा लागेल आणि यात तुम्हाला कुटुंबातील सदस्यांचा पूर्ण पाठिंबा मिळेल. तुम्ही तुमच्या जबाबदाऱ्या चांगल्या प्रकारे पार पाडाल. अधिक कामामुळे तणाव येण्याची शक्यता आहे. आज जोडीदारासोबत वाद होण्याची शक्यता आहे. तुमची प्रलंबित कामेही तुम्हाला सांभाळावी लागतील.
तूळ
आजचा दिवस तुमच्यासाठी संमिश्र जाणार आहे, जे लोक प्रेमविवाहाची तयारी करत आहेत, त्यांना कुटुंबातील सदस्यांकडून मान्यता मिळू शकते. पोटाशी संबंधित समस्यांकडे दुर्लक्ष करू नये. काही व्यावसायिक योजना आज पुन्हा सुरू होऊ शकतात. आज तुम्हाला तुमच्या मुलाच्या करिअरशी संबंधित एखादा महत्वाचा निर्णय घ्यावा लागेल. जर तुम्हाला आर्थिक परिस्थितीबद्दल काळजी वाटत असेल तर त्यात सुधारणा होईल. तुम्हाला तुमच्या खर्चावर नियंत्रण ठेवावे लागेल.
वृश्चिक
आजचा दिवस तुम्हाला कार्यक्षेत्रात नवीन संधी मिळत राहतील. तुम्ही तुमच्या करिअरबद्दल विनाकारण चिंता कराल. ज्यांना परदेशात शिक्षण घ्यायचे आहे, त्यांची इच्छा पूर्ण होताना दिसत आहे. आर्थिक बाबतीत सतर्कता ठेवा, अन्यथा कोणीतरी चुकीच्या योजनेत तुम्हाला अडकवू शकते. ऑनलाइन काम करणाऱ्या लोकांना आज मोठ्या ऑर्डर मिळाल्याने आनंद होईल.
धनु
आजचा दिवस तुमच्यासाठी महत्त्वाचा असणार आहे. व्यवसायात चांगला नफा मिळाल्यास तुम्ही आनंदी व्हाल, तसेच आज कुटुंबातील तुमच्या काही जबाबदाऱ्या वाढू शकतात. घरापासून दूर नोकरी मिळाल्यामुळे तुमच्या कुटुंबातील सदस्याला बाहेर जावे लागू शकते, परंतु सरकारी नोकरीत काम करणारे लोक चांगली प्रगती करू शकतात. आज कौटुंबिक कामावर पूर्ण भर द्याल. कोणत्याही बाबतीत वरिष्ठ सदस्यांचा सल्ला घेणे आवश्यक आहे,
मकर
आजचा दिवस तुमच्यासाठी भाग्याच्या दृष्टीकोनातून फलदायी असणार आहे. व्यावसायिक बाबतीत अनुभवी व्यक्तीचा सल्ला घ्यावा लागेल. संपत्ती, धान्य आणि सुख-समृद्धी यांनी परिपूर्ण असल्याने तुम्ही न डगमगता पुढचे पाऊल टाकाल. कार्यक्षेत्रातील कनिष्ठ सहकाऱ्यांच्या चुका तुम्हाला माफ कराव्या लागतील. तुम्ही तुमच्या मित्रांसोबत कार्यक्रमात सहभागी होऊ शकता. पैशाशी संबंधित बाबींमध्ये धोका पत्करणे टाळावे लागेल, अन्यथा तुमचे पैसे अडकू शकतात.
कुंभ
कामाच्या शोधात असलेल्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला जाणार आहे. तुमच्या आरोग्यावर परिणाम होत असल्याने तुम्ही काळजीत राहाल. आपल्या दैनंदिन दिनचर्येवर लक्ष केंद्रित करा. तुमच्यात सहकार्याची भावना निर्माण होईल. कोणतेही नवीन कार्य सुरू करताना तुम्हाला कुटुंबातील सदस्यांचे पूर्ण सहकार्य मिळेल. पालकांच्या सेवेत थोडा वेळ घालवाल.
मीन
आज व्यवसाय करणाऱ्या लोकांना आज धोका पत्करावा लागू शकतो, त्यामुळे आज कोणताही व्यवहार करू नका. तुमच्या मालमत्तेशी संबंधित काही प्रकरण चालू असेल तर त्यास गती मिळेल. तुम्हाला तुमच्या जवळच्या व्यक्तींशी सावधगिरी बाळगावी लागेल, तुम्ही आधी कोणाकडून पैसे घेतले असतील तर ते तुम्हाला परत मिळू शकतात.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
संबंधित बातम्या
Geeta Gyan : या दोन गोष्टी माणसाला दुबळे बनवतात, जाणून घ्या गीतेमधील अनमोल विचार




















