Horoscope Today, May 2, 2022 : ‘या’ राशींचं नशीब पालटणार, फायदा होणार! जाणून घ्या आजचं राशीभविष्य
Horoscope Today, May 2, 2022 : आज वैशाख महिन्याच्या शुक्ल पक्षाची दुसरी तिथी आहे. चंद्र वृषभ राशीत आणि रोहिणी नक्षत्रात आहे. शनि कुंभ, मकर राशीत आहे. जाणून घेऊया आजचं राशीभविष्य...
Horoscope Today, May 2, 2022 : आज वैशाख महिन्याच्या शुक्ल पक्षाची दुसरी तिथी आहे. चंद्र वृषभ राशीत आणि रोहिणी नक्षत्रात आहे. शनि कुंभ, मकर राशीत आहे. जाणून घेऊया आजचं राशीभविष्य...
मेष (Aries Horoscope) : आज तुमच्या मनात काही नवीन विचार येतील, ज्याचा परिणाम सकारात्मक असेल. व्यवसायात गुंतवणूक करणाऱ्यांना विचारपूर्वक निर्णय घ्यावे लागतील. तुमच्या मनात काही नवीन कल्पना येतील, ज्याचा तुम्हाला ताबडतोब पाठपुरावा करावा लागेल. गुंतवणूक करण्यासाठी आजचा दिवस चांगला आहे. कार्यक्षेत्रात तुम्हाला अधिक धावपळ करावी लागू शकते.
वृषभ (Taurus Horoscope) : आज व्यवसायासाठी यशाचा दिवस आहे. आर्थिक आवक वाढू शकते. नोकरीत पदोन्नतीकडे वाटचाल कराल. कुटुंबातील एखाद्या सदस्याकडून काही चांगली माहिती ऐकायला मिळेल. कामाच्या ठिकाणीही तुमच्या शब्दांचा आदर केला जाईल. सरकारी नोकरीत वेतनवाढ मिळू शकते. राजकारणाशी संबंधित लोकांच्या प्रतिष्ठेत वाढ होईल. कुटुंबातील सदस्यांना जास्तीत जास्त वेळ द्याल.
मिथुन (Gemini Horoscope) : आज तुम्हाला अनावश्यक खर्च टाळावे लागतील, कारण ते तुमच्यासाठी त्रासदायक ठरू शकतात. शिक्षणाशी संबंधित लोकांसाठी आजचा दिवस शुभ आहे. प्रदीर्घ प्रलंबित काम पूर्ण होऊ शकते. स्वतःच्या पायावर उभे राहण्याची संधी मिळेल. आरोग्य चांगले राहील. नवीन व्यवसायाकडे वाटचाल करू शकाल. उत्पन्नाच्या स्रोतात वाढ होईल.
कर्क (Cancer Horoscope) : आज तुम्हाला धनप्राप्ती होण्याची शक्यता आहे. समाजात मान-सन्मान वाढेल. कामाच्या ठिकाणी मागील काही चुकांसाठी तुम्हाला माफी मागावी लागू शकते. परदेशात राहणाऱ्या कुटुंबातील सदस्याकडून काही चांगली माहिती ऐकायला मिळेल. मन विचलित करणाऱ्या छोट्या छोट्या गोष्टींकडे दुर्लक्ष करा. समाजात तुमचा सन्मान वाढेल. धार्मिक कार्यात व्यस्त राहाल.
सिंह (Leo Horoscope) : व्यवसायात नवीन करारामुळे फायदा होईल. आज कोणतीही व्यवसाय योजना पुढे ढकलणे योग्य नाही. घरातील वातावरण उत्साहाने भरलेले असेल. एखाद्या नातेवाईकाकडून फोनवर चांगली माहिती मिळू शकते. तुमचे आरोग्य चांगले राहील. गुंतवणुकीचा फायदा होईल. प्रदीर्घ प्रलंबित कामे पूर्ण होतील, ज्यामुळे तुम्ही आनंदी व्हाल. शिक्षणाशी संबंधित लोकांना काही चांगली बातमी मिळू शकते.
कन्या (Virgo Horoscope) : आज सुरू केलेल्या कामात यश मिळेल, नशीब पूर्ण साथ देईल. या राशीच्या व्यावसायिकांना आज अपेक्षेपेक्षा जास्त फायदा होऊ शकतो. व्यवसायात अचानक धनलाभ होऊ शकतो. कार्यक्षेत्रात तुम्हाला काही अडचणींचा सामना करावा लागेल. एखाद्या स्पर्धेत भाग घेण्याचा निर्णय घ्याल. संध्याकाळी बाहेर जाण्याचा प्लॅन बनवू शकता. वैवाहिक जीवनात भरपूर गोडवा राहील. नोकरीत यश मिळाल्याने आनंदी राहाल.
तूळ (Libra Horoscope) : आज मित्रांचे सहकार्य मिळेल. खर्चावर नियंत्रण ठेवा. व्यवसायात मोठ्यांचा सल्ला फायदेशीर ठरेल. उत्पन्नासोबत घराचा खर्चही वाढेल. आज तुम्हाला तुमच्या आरोग्याकडेही लक्ष द्यावे लागेल. जोडीदारासोबत कुठेतरी बाहेर जाऊ शकता. कुटुंबातील सदस्यांकडून आर्थिक पाठबळ मिळू शकते. या राशीच्या व्यावसायिकांनी पैशाच्या व्यवहारात काळजी घ्यावी.
वृश्चिक (Scorpio Horoscope) : अचानक आर्थिक लाभ होऊ शकतो, व्यवसायाशी संबंधित लोकांना दिलेले पैसे परत मिळू शकतात. नोकरीत सावधगिरी बाळगा, कार्यालयीन कामातील निष्काळजीपणा घातक ठरू शकतो. आजचा दिवस समाजात तुमचे स्थान आणि प्रतिष्ठा वाढवणारा असेल. जर, तुम्हाला नवीन अभ्यासक्रम शिकायचा असेल तर, आजचा दिवस अनुकूल ठरेल. नवीन प्रयत्न कराल, त्यात यश नक्कीच मिळेल.
धनु (Sagittarius Horoscope) : नोकरीबाबत चांगली बातमी मिळेल. व्यवसायात प्रगतीची चिन्हे आहेत. नातेवाईकांकडून मान-सन्मान मिळेल. ज्यामुळे तुम्हाला अभिमान वाटेल. एखाद्या मित्राकडून भेटवस्तू मिळू शकते. तुमची आर्थिक बाजू मजबूत असेल. नियोजित कामे लवकरात लवकर पूर्ण होतील. न्यायालयीन खटल्यात यश मिळण्याची शक्यता आहे.
मकर (Capricorn Horoscope) : आर्थिक स्थिती मजबूत राहील. अचानक आर्थिक लाभ संभवतो. या राशीच्या व्यावसायिकांना आज सरप्राईज मिळू शकते. कुटुंबात धार्मिक कार्यक्रमही आयोजित करू शकता. व्यवसायात गुंतवणूक करणार्यांसाठी दिवस खूप चांगला आहे. आरोग्याबाबत जागरूक रहा. ऑफिसशी संबंधित कोणत्याही गोष्टीचा अतिविचार करू नका. एखाद्या निर्णयाबाबत संभ्रमात राहाल.
कुंभ (Aquarius Horoscope) : व्यवसायात नवीन काम सुरू होईल. कोणताही महत्त्वाचा निर्णय घेण्यापूर्वी त्याचा विचार करणे उचित ठरेल. आज तुम्ही तुमचे काम कमी वेळेत पूर्ण कराल. कुटुंबासोबत वेळ घालवाल. तुम्ही आज कोणतीही मालमत्ता खरेदी-विक्री करण्याचा विचार करत असाल, तर तुम्हाला आवश्यक कागदपत्रांची काळजीपूर्वक तपासणी करावी लागेल. आरोग्याशी संबंधित समस्या उद्भवू शकतात.
मीन (Pisces Horoscope) : शिक्षणाशी संबंधित कामात यश मिळेल. जोडीदाराकडून काही चांगली बातमी ऐकायला मिळेल. पैशाच्या व्यवहारात सावधगिरी बाळगा. यामुळे तुमचे उत्पन्न मजबूत होईल. लेखनाची आवड वाढेल. एखाद्या खास प्रिय व्यक्तीच्या घरी भेट होऊ शकते. नोकरीत काही टेन्शन येण्याची शक्यता आहे. धार्मिक कार्यात व्यस्त राहाल. आरोग्याच्या दृष्टीने आजचा दिवस उत्साही राहील.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. यासाठी संबंधित तज्ज्ञाचा सल्ला घ्यावा.)
महत्वाच्या बातम्या :