Horoscope Today, May 17, 2022 : काहींना प्रमोशन तर काही लोकांना नव्या नोकरीच्या संधी मिळण्याची शक्यता! जाणून घ्या आजचे राशीभविष्य...
Horoscope Today, May 17, 2022 : कर्क, सिंह, कन्यासह अनेक राशींना आज नव्या नोकरीच्या संधी चालून येतील. काही राशींसाठी आजचा दिवस आरोग्याच्या दृष्टीने महत्त्वाचा ठरणार आहे.
Horoscope Today, May 17, 2022 : आज अनुराधा नक्षत्र आणि वृश्चिक राशी आहे. गुरु मीन राशीत आहे. शनि कुंभ राशीत आणि सूर्य वृषभ राशीत आहे. कर्क, सिंह, कन्यासह अनेक राशींना आज नव्या नोकरीच्या संधी चालून येतील. काही राशींसाठी आजचा दिवस आरोग्याच्या दृष्टीने महत्त्वाचा ठरणार आहे. जाणून घ्या आजचे राशीभविष्य...
मेष (Aries Horoscope) : मनःशांती मिळेल. शैक्षणिक कार्यात रस घ्याल. केलेल्या मेहनतीचे सकारात्मक फळ मिळेल. कुटुंबाकडून एखादी चांगली बातमी मिळू शकते. सरकारी नोकरीत काम करणाऱ्या लोकांना प्रमोशन मिळण्याची शक्यता आहे. आजची महत्त्वाची कामे उद्यासाठी पुढे ढकलल्याने तुमच्यासाठी समस्या निर्माण होऊ शकतात. कोणाशीही बोलताना असभ्य भाषा वापरू नका.
वृषभ (Taurus Horoscope) : मन चंचल राहील. भावनांवर नियंत्रण ठेवा. नोकरी, कामाशी संबंधित लोकांना चांगले आर्थिक लाभ मिळतील. धार्मिक कार्यात रस घ्याल. रागावर नियंत्रण ठेवा, अन्यथा वाद होऊ शकतात. व्यावसायिकांनी पैशाच्या व्यवहारात सावधगिरी बाळगावी. नोकरदार लोकांसाठी देखील आजचा दिवस खूप शुभ आहे. प्रगतीच्या बातम्या मिळू शकतात.
मिथुन (Gemini Horoscope) : निरुपयोगी गोष्टींमध्ये पैसे गुंतवू नका, नाहीतर तुमचा जमा झालेला पैसा व्यर्थ खर्च होईल. कोणतीही मोठी संधी हातातून जाऊ देऊ नका. पैसे गुंतवणुकीसाठी दिवस अनुकूल आहे. कामात निष्काळजीपणामुळे नुकसान होऊ शकते. मेहनतीमुळे व्यवसायात प्रगती शक्य आहे. आरोग्याच्या समस्या उद्भवू शकतात. कौटुंबिक वाद होऊ शकतो. रखडलेली कामे पूर्ण होतील.
कर्क (Cancer Horoscope) : जमीन, घर आणि वाहने खरेदी करू शकता. मन शांत राहील. संभाषणात संयम ठेवा. कार्यक्षेत्रात वाढ होऊ शकते. प्रगतीचा मार्ग मोकळा होईल. नोकरीत बदल होण्याची शक्यता आहे. विद्यार्थी त्यांच्या करिअरबद्दल उत्साही आणि आनंदी राहतील. अविवाहित लोकांना विवाहाचे प्रस्ताव येऊ शकतात. कुटुंबातील सदस्यांनाही आनंद होईल.
सिंह (Leo Horoscope) : अनेक दिवसांपासून रखडलेल्या कामांना गती मिळेल. विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाची संधी मिळेल. नोकरीच्या ठिकाणी नवीन काम सोपवले जाईल, जे काळजीपूर्वक पूर्ण करावे. एखाद्याला दिलेले पैसे परत मिळण्याची शक्यता कमी आहे. तुमच्या गोड वागण्याने लोक प्रभावित होऊ शकतात. नोकरीच्या नवीन संधी मिळू शकतात. नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी आजचा दिवस चांगला आहे.
कन्या (Virgo Horoscope) : मानसिकदृष्ट्या आनंदी राहाल. शैक्षणिक कार्यात रस घ्याल. घरगुती कामात अनावश्यक धावपळ होईल. व्यवसायात फायदा होईल. नोकरीच्या नवीन संधी मिळू शकतात. व्यापाऱ्यांना मोठी संधी मिळू शकते. प्रॉपर्टीशी संबंधित गुंतवणुकीसाठी दिवस शुभ आहे. व्यावसायिक योजनांचे अनुकूल परिणाम मिळतील. कुटुंबात उत्साहाचे वातावरण राहील. वैवाहिक सुखात वाढ होईल.
तूळ (Libra Horoscope) : कार्यक्षेत्रात बदल होण्याची शक्यता निर्माण होत आहे. अधिकाऱ्यांचे सहकार्य मिळेल. खर्च वाढतील. आरोग्यामुळे तुम्ही त्रस्त असाल. व्यवसाय करणाऱ्या लोकांना चांगली संधी मिळू शकते, ज्यामुळे त्यांच्या जुन्या रखडलेल्या योजनांना चालना मिळेल. व्यवसायात अपेक्षेप्रमाणे लाभ होईल. मित्रांच्या मदतीने धनलाभ होईल. विद्यार्थ्यांनी आपल्या करिअरवर लक्ष केंद्रित करणे आवश्यक आहे.
वृश्चिक (Scorpio Horoscope) : कार्यालयात अधिकाऱ्यांचे सहकार्य मिळेल. व्यवसायात सामान्य लाभ होईल. आज विरोधकही तुमच्या कृतीची प्रशंसा करतील. छोट्या व्यावसायिकांना पैशाचे व्यवहार करणे टाळावे लागेल. भागीदारीत व्यवसाय केल्यास नफा मिळेल. जुन्या मित्राची भेट होण्याची शक्यता आहे. आपल्याला आवश्यक असलेली प्रत्येक गोष्ट आज उपलब्ध असेल. आरोग्याची काळजी घ्या.
धनु (Sagittarius Horoscope) : कुटुंबासमवेत कोणत्याही धार्मिक स्थळी जाण्याची योजना आखाल. प्रवास सुखकर होईल, खर्चात वाढ होईल. कामाच्या ठिकाणी तुम्हाला प्रतिकूलतेचा सामना करावा लागू शकतो. मित्रांच्या मदतीने उत्पन्नाचे स्रोत विकसित करता येतील. एखाद्या कामात गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल, तर प्रथम अनुभवी व्यक्तीचा सल्ला घ्या. आज सुरू केलेल्या कामात यश मिळेल.
मकर (Capricorn Horoscope) : सामाजिक कार्यात आवड निर्माण होईल. मान-प्रतिष्ठेत वाढ होईल. आज केलेली गुंतवणूक फायदेशीर ठरेल. नोकरीत बदल होण्याची शक्यता आहे. व्यवहारातील काही छोट्या-मोठ्या समस्या सोडल्यास धनलाभ संभवतो. तुमची आर्थिक स्थिती मजबूत असेल. आज तुम्हाला काही चांगली बातमी मिळू शकते. प्रवास लाभदायक ठरू शकतो.
कुंभ (Aquarius Horoscope) : अनावश्यक राग टाळा. कुटुंबात शांतता राखण्याचा प्रयत्न करा. मित्राच्या मदतीने नोकरीच्या संधी मिळू शकतात. उत्पन्न वाढेल. व्यवसायात अडचणी येऊ शकतात. बोलण्याने लोकांना प्रभावित करू शकाल. समाजात मान-सन्मान वाढेल. आपल्या कामांवर लक्ष केंद्रित करा. धार्मिक कार्यात रुची राहील. कोणतेही काम पूर्ण झाल्याने मन प्रसन्न राहील.
मीन (Pisces Horoscope) : तुमचे काही महत्त्वाचे काम पूर्ण होऊ शकते. खूप दिवसांपासून अडकलेले उधारीचे पैसे मिळू शकतात. व्यवसायात मोठा नफा होईल. कौटुंबिक जबाबदाऱ्या वाढू शकतात. नोकरीच्या नव्या संधी मिळू शकतात. विद्यार्थ्यांना परीक्षेत यश मिळेल. मन प्रसन्न राहील. वैवाहिक सुखात वाढ होईल. नोकरीत उच्च पद मिळण्याची शक्यता आहे. मित्रांचे सहकार्य मिळेल.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. यासाठी संबंधित तज्ज्ञाचा सल्ला घ्यावा.)
महत्त्वाच्या बातम्या :